Sarkari Naukri 2024: या उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी.. परीक्षेशिवाय थेट मुलाखतीद्वारे निवड…

Sarkari Naukri 2024: सरकारी नोकरी मिळवण्याचं स्वप्न साकार बघत त्यासाठी तयारी करत असलेल्या उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे! डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (DRDO) ने विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे, आणि विशेष म्हणजे, या भरतीसाठी कोणतीही परीक्षा देण्याची देखील तुम्हाला आवश्यकता नसणार आहे. या भरती अंतर्गत थेट मुलाखतीतून तुमची निवड करण्यात येणार आहे, आणि सरकारी सेवेत नोकरी करण्याचं तुमचं स्वप्न नक्कीच साकार होऊ शकणार आहे.

भरतीची महत्त्वाची माहिती | Sarkari Naukri 2024 Details

DRDO ही भारताच्या संरक्षण क्षेत्रातील सर्वात महत्त्वाची संशोधन संस्था आहे, जिथे देशाच्या सुरक्षेसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित केलं जातं. अशा प्रतिष्ठित संस्थेमध्ये काम करण्याची संधी मिळणं, हे कोणत्याही उमेदवारासाठी अत्यंत अभिमानाची अशी बाब आहे. या भरती प्रक्रियेद्वारे रिसर्च असोसिएट (Research Associate) आणि ज्युनियर रिसर्च फेलो (Junior Research Fellow – JRF) या पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.

पदांची संख्या आणि शैक्षणिक पात्रता | Sarkari Naukri 2024 Post’s number and Educational Qualification

  • रिसर्च असोसिएट (RA) – केमिस्ट्री: 2 पदे

पगार: दरमहा ₹67,000

शैक्षणिक पात्रता: संबंधित विषयात पीएच.डी.

  • ज्युनियर रिसर्च फेलो (JRF) – केमिस्ट्री: 3 पदे

पगार: नियमांनुसार फेलोशिप

शैक्षणिक पात्रता: संबंधित शाखेत मास्टर्स डिग्री

  • ज्युनियर रिसर्च फेलो (JRF) – मेकॅनिकल इंजिनिअरिंग: 1 पद

पगार: नियमांनुसार फेलोशिप

शैक्षणिक पात्रता: संबंधित शाखेत इंजिनिअरिंग डिग्री

  • ज्युनियर रिसर्च फेलो (JRF) – बायोटेक्नॉलॉजी: 1 पद

पगार: नियमांनुसार फेलोशिप

शैक्षणिक पात्रता: संबंधित शाखेत मास्टर्स डिग्री

अर्जाची आणि मुलाखतीची प्रक्रिया | Sarkari Naukri 2024 Rrecruitment Process

या भरती प्रक्रियेत महत्वाचे म्हणजे, तुम्हाला कोणत्याही प्रकारची परीक्षा द्यावी लागणार नाही. या अंतर्गत थेट मुलाखतीतून निवड केली जाणार असून वॉक-इन इंटरव्ह्यू स्वरूपात मुलाखत घेतली जाणार आहे. या मुलाखतीसाठी उमेदवारांनी स्वतः हजर राहून सर्व आवश्यक कागदपत्रं सोबत आणणे गरजेचे असणार आहे.

मुलाखतीच्या तारखा | Sarkari Naukri 2024 Interview date

14 आणि 15 ऑक्टोबर 2024

यासोबतच ही मुलाखती DRDO च्या दिल्ली येथील कार्यालयात होणार आहेत.

वयोमर्यादा | Sarkari Naukri 2024 Age Limit

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा पदानुसार ठरवली गेली आहे. उमेदवारांनी भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याआधी अधिकृत जाहिराती मधे देण्यात आलेली वयोमर्यादा तपासावी.

अर्ज कसा करावा | How to apply for Sarkari Naukri 2024

  • DRDO च्या अधिकृत वेबसाइटवर जा आणि भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती वाचा.
  • यानंतर तुम्हाला तुमची पात्रता आणि वयोमर्यादा तपासावी लागणार आहे.
  • त्यांनतर तुम्हाला मुलाखतीसाठी अर्ज भरावा लागणार आहे आणि यासाठी लागणारी सर्व आवश्यक कागदपत्रं सुद्धा तयार ठेवायची आहेत.
  • मुलाखतीच्या दिवशी दिलेल्या ठिकाणी आणि दिलेल्या वेळी हजर राहणे आवश्यक ठरणार आहे.

अधिकृत वेबसाईट

https://www.drdo.gov.in