Divyang Kalyan Vibhag Bharti 2024: दिव्यांग कल्याण विभागात या पदांवर भरती सुरू.. 4थी, 10वी उत्तीर्ण उमेदवार पात्र! पगार ₹38,600/- ते ₹92,300/-

Divyang Kalyan Vibhag Bharti 2024

Divyang Kalyan Vibhag Bharti 2024: दिव्यांग कल्याण विभाग भरती 2024 अंतर्गत दिव्यांग कल्याण विभाग, मंत्रालयामार्फत पात्र उमेदवारांची नियुक्ती करण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. 4थी, 10वी आणि इतर पात्र उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठीची ही एक अतिशय उत्तम संधी निर्माण झाली आहे. जर तुम्ही या विभागात भरतीसाठी पात्र असाल, तर तुमच्यासाठी ही खूपच आनंदाची बातमी असणार आहे. सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या 4थी, 10वी व इतर पात्र उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी असणार आहे.  चला तर मग आता आपण, या भरतीबाबत आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया.

भरतीची संपूर्ण माहिती | Divyang Kalyan Vibhag Bharti 2024 Details

भरती विभाग: दिव्यांग कल्याण विभाग, मंत्रालय व परमहंस भगवंत माऊली शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या अंतर्गत ही भरती जाहिर झाली आहे.

पदाचे नाव: शिपाई, सफाई कर्मचारी, राखणदार, विशेष शिक्षक, कला शिक्षक, वाचा उपचार तज्ञ, भौतीक उपचार तज्ञ, काळजीवाहक अशा विविध पदांसाठी ही भरती आहे.

शैक्षणिक पात्रता | Divyang Kalyan Vibhag Bharti 2024 Eligibility Criteria

  • विशेष शिक्षक: HSC, D.Ed (HI) किंवा B.Ed (HI) सह RCI सोबतच HSC सांकेतिक भाषेतील डिप्लोमा स्तर नोंदणी. MSCIT सह 3 वर्षांचा कामाचा अनुभव असणे आवश्यक.
  • कला शिक्षक: HSC, C.T.C/A.T.D. किंवा B.P.Ed किंवा B.F.A. MSCIT प्रमाणपत्रासह 3 वर्षांचा कामाचा अनुभव आवश्यक आहे.
  • वाचा उपचार तज्ञ: मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून BSLP/MSLP किंवा DHLS सह RCI नोंदणीकृत आणि MSCIT सह 5 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक.
  • मा. वैद्यकीय अधिकारी: या पदासाठी MBBS/BAMS असणे आवश्यक असणार आहे.
  • राखणदार: 4थी किंवा 10वी उत्तीर्ण, ITI कॉम्प्युटरचा अनुभव असणे आवश्यक आहे.
  • सफाईगार: 4थी उत्तीर्ण आणि MSCIT प्रमाणपत्र आवश्यक आहे.
  • भौतीक उपचार तज्ञ: BPTh उत्तीर्ण.
  • काळजीवाहक: 4थी किंवा 10वी उत्तीर्ण, प्रथमोपचार कार्याचा अनुभव आवश्यक आहे.
  • शिपाई: 4थी किंवा 10वी उत्तीर्ण व ITI वेल्डिंग/इलेक्ट्रीशियनचा अनुभव आवश्यक आहे.
  • पाहरेकरी: 4थी किंवा 10वी उत्तीर्ण, MSCIT प्रमाणपत्रासह Eng & Marathi टायपिंगचा अनुभव आवश्यक आहे.

वेतनश्रेणी | Divyang Kalyan Vibhag Bharti 2024 Salary Details

प्रत्येक पदानुसार वेतनश्रेणी वेगवेगळी आहे:

  • विशेष शिक्षक: ₹29,200/- ते ₹92,300/-
  • कला शिक्षक: ₹29,200/- ते ₹92,300/-
  • वाचा उपचार तज्ञ: ₹38,600/- ते ₹92,300/-
  • राखणदार, सफाईगार, काळजीवाहक, शिपाई, पाहरेकरी: ₹15,000/- ते ₹47,600/-
  • भौतीक उपचार तज्ञ: ₹38,600/- ते ₹92,300/-

अर्ज स्विकारण्याची पद्धत:

  • अर्ज स्विकारण्याची पद्धत ही ऑफलाईनच (Offline) असणार आहे.
  • स्वतःची सही केलेला अर्ज, स्वतःचा पासपोर्ट फोटो, शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्रे, जात प्रमाणपत्र, अनुभव प्रमाणपत्रे साक्षांकित करून, अर्ज पोस्टाद्वारे दिलेल्या पत्त्यावर सादर करावा.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता: मुकबधिर व अपंग निवासी विद्यालय, तुळजापूर, मंगरुळपीर, ता. मंगरुळपीर, जि. वाशीम-४४४४०३
  • अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक: ऑक्टोबर 01, 2024
  • पदांची एकूण संख्या: 017 रिक्त पदांसाठी ही भरती आहे.

निवड प्रक्रिया |Divyang Kalyan Vibhag Bharti 2024 Selection Process

  • अर्ज प्राप्त झाल्यानंतर अर्जाची व्यवस्थित पडताळणी केली जाईल.
  • पात्र उमेदवारांची आधी मुलाखत घेण्यात येईल, आणि त्यानंतरच त्यांची अंतिम निवड केली जाईल.
  • लक्षात घ्या की निवड प्रक्रीयाबाबत अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार निवड समितीचा राहील.
  • नोकरी ठिकाण: वाशीम जिल्ह्यात ही नोकरी असणार आहे.

आवश्यक कागदपत्रांची यादी | Divyang Kalyan Vibhag Bharti 2024 Important Documents

  • स्वहस्ताक्षरातील अर्ज.
  • स्वतःचा पासपोर्ट फोटो.
  • शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्रे.
  • जात प्रमाणपत्र (जर लागू असेल तर).
  • अनुभव प्रमाणपत्रे.

महत्त्वाची सूचना | Divyang Kalyan Vibhag Bharti 2024 Important Note

  • उशीरा आलेले अर्ज हे कोणत्याही परिस्थितीत विचारात घेतले जाणार नाहीत, त्यामुळे वेळेत अर्ज करा.
  • खाली दिलेल्या लिंक वर भेट देऊन PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक असणार आहे.
  • निवड प्रक्रियेबाबत कोणत्याही प्रकारचा अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार हा निवड समितीकडेच असणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी.

Pdf जाहिरात

https://drive.google.com/file/d/1QvkR_zYZUg0Ls3VZr0vt4SuCgfXm1obA/view

अधिकृत वेबसाईट

https://divyangkalyan.maharashtra.gov.in