आपला भारत देश हा शेतीप्रधान देश आहे. आपल्याकडे पारंपारिक पध्दतीने शेती केली जाते. तेव्हा बैलाच्या साहाय्याने नांगरणी केली जात असे. परंतु त्यानंतर तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शेती केली जाऊ लागली. व आधुनिक पध्दतीने शेती करण्यासाठी ट्रॅक्टरचा वापर केला जाऊ लागला. परंतु सर्वच शेतकऱ्यांना आधुनिक पध्दतीने शेती करणे शक्य नसते. ट्रॅक्टर घेणे सर्व शेतकऱ्यांना शक्य नसते. शेतीला व शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकार विविध योजना राबवित असते. त्यातील एक महत्वाची योजना म्हणजे ट्रॅक्टर योजना. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ट्रॅक्टर घेण्यासाठी ५ लाखापर्यत अनुदान मिळु शकणार आहे. त्याची सर्व माहिती आपण या लेखात घेऊया. Tractor anudan yojana 2024
ट्रॅक्टर अनुदान योजना २०२४ या योजनेची उद्दिष्टे
ट्रॅक्टर अनुदान योजनेच्या मदतीने सरकार काही उद्दिष्टे साध्य करण्याच्या मानसिकतेत आहे. ती उद्दिष्टे पुढील प्रमाणे.
- सरकारच्या ट्रॅक्टर अनुदान योजनेमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होऊ शकेल आणि निर्यात वाढू शकेल.
- पारंपरिक शेतीमध्ये लागणारा वेळ पाहता ट्रॅक्टरच्या मदतीने केल्या जाणाऱ्या शेतीच्या तुलनेत जास्तच असल्याने शेतकऱ्यांचा वेळ वाचेल. पावसाच्या ऋतुपूर्वी वेळीच त्यांना त्यांची कामे करता येतील.
- आधुनिक पद्धतीने शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना या योजनेमुळे प्रोत्साहन मिळू शकेल असे भारत सरकारचे मत आहे.
- शेतकऱ्याचे आर्थिक सक्षमीकरण होण्यासाठी 1.25 लाख इतक्या अनुदानामुळे मदत होणार आहे, त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना शेतीसाठी उपयुक्त असा ट्रॅक्टर खरेदी करता येणार आहे.
- आताच्या तरुणाईला प्रगत तंत्रज्ञानाच्या वापरानने कोणतेही काम करणे आवडते. या गोष्टीचा विचार करता पारंपरिक शेती न करता आधुनिक पद्धतीने शेती करुन, शेती व्यवसायाकडे प्रमुख व्यवसाय म्हणून पाहण्याचा तरुणाईचा कल या योजनेअंतर्गत वाढणार आहे.
- शेतकऱ्यांच्या शेती उत्पादन आणि विविध प्रकारचे धान्य पिकवण्याच्या कामाला गती देण्याचे काम ट्रॅक्टर अनुदान योजनेअंतर्गत मिळू शकेल. Purpose of Tractor Anudan Yojana Maharastra 2024
आवश्यक कागदपत्रे
ट्रॅक्टर अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी किंवा योजनेसाठी अर्ज करताना शासनाने ठरवून दिलेली काही महत्त्वाची कागदपत्रे अर्जदाराने सादर करणे आवश्यक आहे. ती पुढीलप्रमाणे
- आधार कार्ड, रेशन कार्ड
- रहिवासी दाखला
- अर्जदाराचे जमिनीचा सात बारा
- अर्जदाराच्या जमिनीचा अट अ
- मोबाईल नंबर
- ई-मेल आयडी
- पासपोर्ट साईजचे दोन फोटो
- स्वयंघोषित प्रतिज्ञापत्र
- जातीचा दाखला Tractor Anudan Yojana Maharastra 2024
असा करा ट्रक्टर अनुदानासाठी अर्ज
ट्रॅक्टर सारखे अवजारे शेतीसाठी खुप उपयोगी असतात. परंतु ते अतिशय महाग असल्याने अनेक शेतकरी इच्छा असुनही ते खरेदी करु शकत नाही. त्यामुळे शासनाने आता शेतकऱ्यांसाठी ५० टक्के व ४० टक्के याप्रमाणे अनुदान देत आहे. तुम्ही जर शेतकरी असाल किंवा तुमच्या ओळखीत कुणी शेतकरी असेल तर त्यांच्यापर्यत ही माहिती जरुर पोहचवा. परंतु त्यासाठी तुम्हांला महाडीबीटी या वेबसाईटवर नाव नोंदणी करावी लागेल. Tractor Anudan Yojana Maharastra 2024
महाडीबीटी वेबसाईटवर नोंदणी
महाडीबीटी या वेबसाईटवर नोंदणी केली कि मग तुम्हांला युजर आयडी व पासवर्ड मिळतो. त्याद्वारे लॉगीन करुन तुम्ही ट्रॅक्टर सहित विविध योजनांचा लाभ घेवु शकता. तसेच जर तुम्ही महाडीबीटी वेबसाईटवर तुषार, ठिंबक किंवा इतर कोणत्याही योजनेसाठी अर्ज केला असेल तर पुन्हा नव्याने नोंदणी करावी लागत नाही tractor anudan yojana 2024 . ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अवघ्या 10 मिनिटांपेक्षा कमी कालावधी लागु शकतो जर वेबसाईट सुरळीत सुरु असेल तर. महाडीबीटी वेबसाईटची लिंक पुढीलप्रमाणे- https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/SchemeData/SchemeData?str=E9DDFA703C38E51AD61F6F45B7D0D582
अधिक माहिती
योजनेसंबंधीत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही पुढील टोल फ्री क्रमांकावर फोन करु शकता.
योजनेसाठीचा हेल्प लाईन नंबर- 1800-120-8040
जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेसाठी अर्ज सादर करुन योजनेचा लाभ घ्यावा. आधुनिक शेतीच्या मार्गाने जास्ती जास्त उत्पादन घेता येते. भारत सरकार सध्या शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवित आहे. त्या योजनांचे उद्दिष्ट आहे की शेतकरी वर्गाला आधुनिक पद्धतीने शेती करण्याचे महत्त्व पटवून देणे. Tractor Anudan Yojana Maharastra 2024