Lekha Koshagar Vibhag Bharti 2025: लेखा व कोषागारे विभाग भरती 2025, ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु

महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागांतर्गत लेखा व कोषागारे विभागात कनिष्ठ लेखापाल (गट-क) पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. महाराष्ट्र शासन वित्त विभाग सहसंचालक, लेखा व कोषागारे कोकण विभागाद्वारे ही पदभरती जाहीर करण्यात आली आहे. Maharashtra Lekha Koshagar Recruitment 2025

पदाचे नाव आणि एकूण रिक्त पदे

कनिष्ठ लेखापाल (गट-क) पदासाठी एकूण १७९ रिक्त जागा उपलब्ध आहेत.

आर्जदाराची शैक्षणिक पात्रता

उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी असावी. तसेच, मराठी टंकलेखनाचे किमान ३० शब्द प्रति मिनिट किंवा इंग्रजी टंकलेखनाचे ४० शब्द प्रति मिनिट वेगाचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र आवश्यक आहे. Maharashtra Lekha Koshagar Recruitment 2025

अर्जदाराची वयोमर्यादा

महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागांतर्गत लेखा व कोषागारे विभागात कनिष्ठ लेखापाल (गट-क) पदांसाठी भरती प्रक्रियेत अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय १९ ते ४३ वर्षांच्या दरम्यान असावे. वयोमर्यादेबाबत शिथिलतेसाठी अधिकृत जाहिरात पाहावी. Maharashtra Finance Department Jobs

मासिक वेतन किती असेल?

निवड झालेल्या उमेदवारांना २९,२०० ते ९२,३०० रुपये मासिक वेतन दिले जाईल.

अर्ज प्रक्रिया पुढील प्रमाणे

अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीने स्वीकृत केले जातील. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी https://mahakosh.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर भेट द्यावी. अर्जाची प्रक्रिया ४ फेब्रुवारी २०२५ रोजी सायं ५:०० वाजता सुरू झाली आहे आणि अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ६ मार्च २०२५ रोजी रात्री ११:५९ वाजेपर्यंत आहे.

परीक्षा शुल्क किती असेल?

  • अराखीव (खुला) प्रवर्ग: १००० रुपये
  • राखीव प्रवर्ग: ९०० रुपये
  • माजी सैनिक: परीक्षा शुल्क माफ

निवड प्रक्रिया कशी असेल?

उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि मुलाखतीच्या आधारे केली जाईल. निवड प्रक्रियेतील अंतिम निर्णय घेण्याचे सर्व अधिकार अध्यक्ष, प्रादेशिक निवड समिती तथा सहसंचालक, लेखा व कोषागारे, कोकण विभाग यांच्याकडे असतील. Lekha Koshagar Bharti Notification

नोकरीचे ठिकाण

महाराष्ट्र शासनांतर्गत लेखा व कोषागारे विभागाच्या पदभरतीला निकाल लागल्यानंतर आणि उमेदवाराची नियुक्ती झाल्यानंतर उमेदवारांच्या मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये नियुक्त्या केल्या जातील. त्यामुळे कोकण विभागासाठी मुख्यत्वेकरुन ही जाहिरात जाहीर करण्यात आली असून तुम्ही या भागातील असाल आणि अजूनही अर्ज केला नसेल तर आजच नोकरीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करा. Maharashtra Lekha Koshagar Recruitment 2025

ही माहिती तुमच्यासाठी

उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पूर्णपणे वाचूनच अर्ज करावा. अधिक माहितीसाठी https://mahakosh.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध जाहिरात पाहावी. लेखा व कोषागारे विभागातील ही भरती प्रक्रिया सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी आहे. पात्र उमेदवारांनी वेळेत अर्ज सादर करून या संधीचा लाभ घ्यावा.

लेखा व कोषागारे विभागाची अधिक माहिती 

लेखा व कोषागारे विभागाची रचना

१. प्रधान सचिव, वित्त विभाग – विभागाचे प्रमुख अधिकारी.

२. कोषागार संचालक, महाराष्ट्र राज्य – राज्यभरातील कोषागार आणि लेखा व्यवहारांचे नियंत्रण.
३. सहाय्यक कोषागार अधिकारी व लेखाधिकारी – जिल्हा व तालुका स्तरावरील आर्थिक व्यवहारांचे नियंत्रण.

४. लेखापरीक्षक आणि वित्त सल्लागार – आर्थिक ताळेबंद आणि नियोजनावर देखरेख ठेवणारे अधिकारी.

लेखा व कोषागार विभागाशी संबंधित महत्त्वाच्या वेबसाईट्स

१. महाकोश (Mahakosh) पोर्टल – https://mahakosh.maharashtra.gov.in
२. GRAS (चालान व कर भरणा प्रणाली) – https://gras.mahakosh.gov.in
३. शासकीय कर्मचाऱ्यांसाठी सेवा सेतू पोर्टल – https://sevaarth.mahakosh.gov.in