Birsa Munda Krishi Kranti Yojana 2025: मंडळी, शेतकऱ्यांचं सगळ्यात मोठं स्वप्न म्हणजे त्यांच्या शेतात भरपूर पाणी असावं, जेव्हा पाहिजे तेव्हा त्यांना सिंचन करता यावं. पण अनेक आदिवासी कुटुंबांपैकी बहुतांश शेतकऱ्यांकडे आजही विहीर किंवा सिंचनाचं साधन उपलब्ध नाही. आर्थिक अडचणीमुळे आणि योग्य माहिती नसल्यामुळे हे शेतकरी वर्षानुवर्षे नुसत्या पावसाच्या भरोशावर शेती करत आहेत. पण आता शासनाने (Government schemes for tribal farmers) त्यांच्यासाठी एक मोठी संधी समोर आणली आहे. बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना विहीर खोदकामासाठी तब्बल ४ लाखांपर्यंत अनुदान देण्यात येणार आहे. ही योजना केवळ आदिवासी बांधवांसाठी असून यासाठीची अर्जाची प्रक्रिया देखील सुरू झाली आहे.
योजनेअंतर्गत मिळणाऱ्या उपयोजना आणि अनुदान
बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेत अनेक उपयोजनांचा समावेश आहे आणि प्रत्येकासाठी दिलं जाणारं अनुदान हे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात दिलं जातं:
- नवीन विहीर खोदकाम: ₹4,00,000
- जुनी विहीर दुरुस्ती: ₹1,00,000
- शेततळे प्लास्टिक अस्तरीकरण: ₹2,00,000
- वीज जोडणीसाठी अनुदान: ₹20,000
- ठिबक सिंचन संच: ₹97,000
- डिझेल पंप: ₹40,000
- पीव्हीसी पाईप: ₹50,000
- परसबाग अनुदान: ₹5,000
या योजनेसाठी पात्र असण्यासाठी काय अटी आहेत?
- अर्जदार हा अनुसूचित जमाती प्रवर्गातील असावा हे बंधनकारक असणार आहे.
- अर्जदाराकडे वैध जात प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे.
- जमिनीचा 7/12 आणि 8-अ उतारा सादर करणं गरजेचं असणार आहे.
- वार्षिक उत्पन्नाची मर्यादा रु. 1.5 लाखांपर्यंत असणं बंधनकारक आहे.
- तसेच अर्जासोबत उत्पन्नाचा दाखला जोडणे देखील आवश्यक ठरणार आहे.
- जमिनधारणा 0.20 हेक्टर ते 6 हेक्टर दरम्यान असावी, आणि नवीन विहिरीसाठी ती किमान 0.40 हेक्टर आवश्यक असणार आहे.
- एकदा लाभ घेतल्यास, पुढील ५ वर्षांपर्यंत त्या लाभार्थीला किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणालाही पुन्हा हा लाभ (Maharashtra Birsa Munda Scheme apply online) दिला जाणार नाही.
प्रत्येक उपयोजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
1. नवीन विहीर खोदकामासाठी
- जातीचा वैध दाखला
- 7/12 आणि 8-अ उतारा
- उत्पन्नाचा दाखला
- तलाठी यांचा दाखला (0.40 ते 6 हेक्टर जमिनधारणा, विहीर नसल्याबाबत, 500 फूट अंतराचं प्रमाणपत्र)
- भूजल सर्वेक्षण विभागाचा पाणी उपलब्धतेचा दाखला
- कृषि अधिकारी आणि गट विकास अधिकाऱ्यांचे शिफारसपत्र
- जागेचा व लाभार्थ्यासह फोटो
- या पूर्वी योजनेचा लाभ न घेतल्याचं प्रमाणपत्र (SCA/275-A अंतर्गत)
- ग्रामसभेचा ठराव
- 100/500 रु. स्टॅम्पवर प्रतिज्ञापत्र
2. जुनी विहीर दुरुस्ती / इनवेल बोअरिंगसाठी
- वर दिलेल्या सगळ्या कागदपत्रांसोबतच संबंधित विहीरीचा कामाआधीचा फोटो
- तसेच इनवेल बोअरींगसाठी Feasibility Report (Mahadbt farmer schemes 2025)
3. शेततळे अस्तरीकरण / वीज जोडणी / सूक्ष्म सिंचन संचासाठी
- उत्पन्न प्रमाणपत्र / BPL कार्ड
- विद्युत पंप नसल्याबाबत हमीपत्र
- शेततळ्याचं मापन व मोजमाप नकाशा
- मंडळ कृषि अधिकाऱ्यांचे अंदाजपत्रक
- काम सुरू होण्यापूर्वीचा फोटो
अर्ज करताना या गोष्टी लक्षात ठेवा | Birsa Munda Yojana Application Form
- अर्ज करताना तो फक्त पुढे दिलेल्या महाडीबीटी पोर्टलवरूनच करावा: https://mahadbt.maharashtra.gov.in
- सर्व कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करताना ती स्पष्ट दिसायला हवीत याची काळजी घ्या.
- जर तुमच्याकडे एखादं प्रमाणपत्र नसेल, तर आधी ते तयार करून घ्या आणि मगच अर्ज सादर करा.
- अर्ज सादर केल्यानंतर त्याची प्रिंटआऊट स्वतःकडे सुरक्षित ठेवा.
बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना ही केवळ अनुदान देणारी योजना नाही, तर ती शेतकऱ्यांच्या आयुष्याला नवी दिशा देणारी संधी आहे. या योजनेतून तुम्ही नवीन विहीर, सिंचन जोडणी, शेततळं, पाईप्स अशा विविध गोष्टींचं आर्थिक (Free well construction scheme in Maharashtra) पाठबळ मिळवू शकता. फक्त पात्रता ओळखा, योग्य कागदपत्रांची तयारी ठेवा आणि वेळ वाया न घालवता आजच महाडीबीटी पोर्टलवर अर्ज भरा.