IBPS Recruitment 2025: देशभरातील बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आली आहे. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनल सिलेक्शन (IBPS) ने 2025 वर्षात सर्वात मोठ्या भरतींपैकी एक भरती जाहीर केली आहे. तब्बल 13,217 पदांसाठी ही मेगाभरती (IBPS Bharti 2025 Marathi) करण्यात येत असून, पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ही सुवर्णसंधी गमावू नये असे आवाहन देखील करण्यात आले आहे.
भरतीबाबत सविस्तर माहिती
या भरतीमध्ये विविध पदांचा समावेश केला गेला असून, पदवीधर उमेदवारांसाठी ही नोकरीची एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे, यासोबतच काही पदांसाठी अनुभवसुद्धा आवश्यक असणार आहे. पुढे पदांची नावं आणि उपलब्ध संख्या सविस्तर देण्यात आली आहे.
- ऑफिस असिस्टंट (बहुउद्देशीय): 7,972 पदे
- ऑफिसर स्केल-I (असिस्टंट मॅनेजर): 3,907 पदे
- ऑफिसर स्केल-II (जनरल बँकिंग ऑफिसर): 854 पदे
- ऑफिसर स्केल-II (आयटी, सीए, विधी, ट्रेझरी, मार्केटिंग, कृषी अधिकारी): 285 पदे
- ऑफिसर स्केल-III: 199 पदे
- म्हणजेच एकूण 13,217 पदे विविध विभागांमध्ये भरण्यात येणार आहेत.
अर्ज प्रक्रिया आणि अंतिम तारीख
या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया (IBPS Apply Online 2025) ऑनलाईन पद्धतीने आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरण्यासाठी अजिबात उशीर करू नये, कारण अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 21 सप्टेंबर 2025 आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी आयबीपीएसच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देणे आवश्यक असणार आहे.
परीक्षा फी
सामान्य/ओबीसी उमेदवारांसाठी: ₹850/-
एससी/एसटी/पीडब्ल्यूडी उमेदवारांसाठी: ₹175/-
परीक्षा फी ही केवळ ऑनलाइन पद्धतीने भरता येणार आहे.
परीक्षेचे वेळापत्रक
या भरतीसाठी दोन टप्प्यात परीक्षा (IBPS Exam Date 2025) घेण्यात येणार आहे:
पूर्व परीक्षा (Pre Exam): नोव्हेंबर / डिसेंबर 2025
मुख्य परीक्षा (Mains Exam): डिसेंबर 2025 / फेब्रुवारी 2026
या परीक्षेनंतर यशस्वी उमेदवारांची मुलाखत घेण्यात येईल आणि त्यानंतरच अंतिम निवड करण्यात येणार आहे.
शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा | IBPS Bharti 2025 Eligibility Criteria
ऑफिस असिस्टंट व ऑफिसर स्केल-I पदासाठी, कोणत्याही शाखेतील पदवीधर अर्ज करू शकणार आहेत.
तसेच इतर पदांसाठी, संबंधित क्षेत्रातील पदवीसोबत कामाचा अनुभव असणे सुद्धा आवश्यक आहे. (उदा. एमबीए, विधी पदवी, आयटी, सीए इत्यादी पदांसाठी).
आवश्यक वयोमर्यादा: 1 सप्टेंबर 2025 रोजी वय 18 ते 40 वर्षे दरम्यान असावे.
एससी/एसटी उमेदवारांना यासाठी 5 वर्षांची सूट देण्यात येईल आणि ओबीसी उमेदवारांना 3 वर्षांची सूट दिली जाईल.
ही संधी का महत्त्वाची?
IBPS द्वारे आयोजित केल्या जाणाऱ्या या मेगाभरतीमुळे हजारो पदवीधरांना बँकिंग क्षेत्रात स्थिर करिअर करण्याची संधी उपलब्ध होत आहे. सरकारी नोकरीसोबत सुरक्षित भविष्य, आकर्षक पगार आणि पदोन्नतीची संधी या भरतीमुळे (IBPS Clerk PO Vacancy 2025) मिळणार आहे. त्यामुळे जर तुम्ही बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पाहत असाल, तर ही संधी अतिशय योग्य आहे.
अर्ज कुठे कराल?
अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी आयबीपीएसच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.