
Ladki Bahin Yojana Loan 2025: महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी आत्तापर्यंत अनेक योजना राबवल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर आता लाडकी बहीण योजना लाभार्थी महिलांसाठी आणखी एक मोठं पाऊल उचललं गेलं आहे. आधीच या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 1500 रुपयांचं मानधन मिळत आहे. मात्र, फक्त मानधनाने महिलांचा संपूर्ण आर्थिक विकास होऊ शकत नाही. त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करून कुटुंबाला आधार देता यावा आणि समाजात एक नवा आदर्श निर्माण करता यावा, यासाठीच आता सरकारने आणि मुंबई बँकेने (Mumbai Bank Loan Scheme) मिळून एक विशेष कर्ज योजना जाहीर केली आहे.
या योजनेतून महिलांना 10 हजार ते 1 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज (Business Loan for Women 2025) उपलब्ध होणार आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे या कर्जाचे हप्ते महिलांना वेगळे भरावे लागणार नाहीत, तर शासनाकडून दरमहा मिळणाऱ्या लाडकी बहीण मानधनातूनच हे हप्ते थेट वळते केले जाणार आहेत. यामुळे महिलांना कर्ज फेडण्याची चिंता नसेल आणि त्यांना त्यांचा व्यवसाय कोणत्याही काळजीशिवाय पुढे नेता येईल.
महिलांना मिळणार नवीन संधी
मुंबई बँकेत आधीपासूनच लाडकी बहीण योजनेअंतर्गत 53,357 महिलांची शून्य शिल्लक बचत खाती उघडण्यात आली आहेत. या खात्यांमध्ये दरमहा मानधनाची रक्कम जमा केली जाते. आता याच खात्यांचा उपयोग करून महिलांना व्यावसायिक कर्जाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
या योजनेचा उद्देश महिलांना आर्थिकदृष्ट्या सबल करून त्यांना व्यवसाय, उद्योजकता आणि रोजगारनिर्मितीकडे वळवणे आहे, असे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलं आहे. ही योजना, 5 ते 10 महिला एकत्रित येऊन गट व्यवसाय सुरू करू शकतील, अशा पद्धतीने (Maharashtra Sarkari Yojana for Women) राबवली जाणार आहे.
हे कर्ज कोणकोणत्या व्यवसायांसाठी वापरता येईल?
या कर्जातून महिला आपला स्वयंपाकगृह व्यवसाय, शिवणकाम, किराणा दुकान, दुग्धव्यवसाय, भाजीपाला विक्री, लहान उत्पादन युनिट्स, कुक्कुटपालन, हस्तकला व्यवसाय अशा अनेक उपक्रमांची सुरुवात (Self Employment Loan Maharashtra) करू शकतात. विशेष म्हणजे, हे सर्व उपक्रम कमी भांडवलात सुरू करता येतात आणि त्यातून महिलांना नियमित उत्पन्नही मिळू शकतं.
यामुळे महिला केवळ स्वतःचाच नाही, तर आपल्या संपूर्ण कुटुंबाचा आर्थिक स्तर उंचावू शकणार आहेत. ग्रामीण भागात ही योजना महिलांना मोठा दिलासा देणारी ठरणार आहे कारण तिथे अजूनही महिलांना रोजगाराच्या संधी कमी प्रमाणात उपलब्ध होतात.
कर्ज योजनेत सहभागी असणाऱ्या संस्था
या उपक्रमामध्ये अनेक महामंडळांचा सहभाग आहे. त्यामध्ये,
- अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ
- महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ
- वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ
या संस्थांच्या माध्यमातून आधीपासूनच महिलांना व्याज परतावा, गट कर्ज आणि वैयक्तिक कर्जाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. यासोबतच आता मुंबई बँकेसोबत सामंजस्य करार करून हा उपक्रम आणखीनच बळकट करण्यात आला आहे.
ही योजना महिलांसाठी सुवर्णसंधी का ठरणार?
या कर्ज योजनेमुळे महिलांना तीन महत्त्वाचे फायदे होणार आहेत,
- आर्थिक स्वावलंबन वाढेल. कुटुंबावर अवलंबून न राहता महिला स्वतःचा व्यवसाय उभारू शकतील.
- रोजगार निर्मिती होईल, जसे की 5-10 महिलांनी गट व्यवसाय सुरू केल्यास त्याद्वारे इतरांनाही रोजगार मिळेल.
- सोबतच यामुळे महिलांचा आत्मविश्वासही वाढेल, समाजात त्यांचा सहभाग वाढेल आणि कुटुंबात त्यांची आर्थिक भूमिका अधिक बळकट होईल.
आतापर्यंत लाडकी बहीण योजना महिलांसाठी एक सामाजिक सुरक्षाकवच ठरली होती. पण आता या नव्या (Loan Scheme for Women) मुळे ती केवळ सुरक्षाकवच न राहता आर्थिक सबलीकरणासाठी एक उत्तम संधी ठरणार आहे. ही योजना हजारो महिलांना नवा आत्मविश्वास देईल आणि त्यांच्या आयुष्यातील प्रगतीची नवी दारे देखील उघडेल यात शंका नाही.