स्टेप 1: सगळ्यात आधी तर तुमच्या मोबाईल किंवा लॅपटॉपच्या ब्राउजरमध्ये पुढे दिलेली अधिकृत वेबसाईट उघडा: https://voters.eci.gov.in. वेबसाईटवर गेल्यावर खाली स्क्रोल करा आणि “Services” विभागात “Download Electoral Roll” या पर्यायावर क्लिक करा.
स्टेप 2: आता तुमच्या समोर एक फॉर्म दिसेल. त्यामध्ये पुढे दिलेली माहिती योग्यरित्या भरा, जसे की State (राज्य) Maharashtra निवडा, District (जिल्हा) निवडा
Assembly Constituency (विधानसभा क्षेत्र) निवडा, Language (भाषा) मराठी निवडा आणि Roll Type मध्ये Final Roll (अंतिम यादी) निवडा. यापुढे दिलेला Captcha कोड तिथे भरा.
स्टेप 3: आता अजून खाली स्क्रोल करा. इथे तुम्हाला तुमच्या निवडलेल्या विधानसभा क्षेत्रातील गावांची / वॉर्डची यादी येथे दिसेल.
स्टेप 4: एकावेळी साधारण 10 गावांची नावे दिसतात. जर तुमचं गाव पहिल्या पानावर नसेल तर (>) या बटणावर क्लिक करून पुढील यादी पहा.
स्टेप 5: तुमच्या गावाच्या नावासमोर टिक करा आणि वर दिसणाऱ्या “Download Selected PDFs” बटणावर क्लिक करा.
स्टेप 6: काही सेकंदातच तुमच्या गावाची संपूर्ण मतदार यादी PDF मध्ये उघडेल किंवा डाउनलोड होईल. यात तुम्हाला दिसेल,
मतदारांचे पूर्ण नाव
घर क्रमांक किंवा पत्ता
मतदान केंद्र कुठे आहे
वॉर्ड क्रमांक किंवा गावाची माहिती
1 thought on “मतदार यादी ऑनलाइन डाउनलोड करण्याची सोपी प्रक्रिया”
1 thought on “मतदार यादी ऑनलाइन डाउनलोड करण्याची सोपी प्रक्रिया”
Comments are closed.