
महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य-पोषणात वाढ व्हावी यासाठी राज्य सरकारतर्फे “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” योजना राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना थेट बँक खात्यावर Direct Benefit Transfer (DBT) माध्यमातून आर्थिक सहाय्य देण्यात येते.
या लाभासाठी सर्व पात्र महिलांचे Aadhaar Authentication करण्यासाठी e-KYC अनिवार्य ठेवण्यात आली होती. यापूर्वी सरकारने e-KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 18 नोव्हेंबर 2025 पर्यंत मुदत दिली होती. मात्र काही जिल्ह्यांमध्ये आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे तसेच अनेक महिलांना त्यांचे पती किंवा वडील दिवंगत झाल्याने OTP प्राप्त करण्यात आलेल्या अडचणीमुळे अनेक लाभार्थींनी e-KYC पूर्ण करू शकले नाही.
त्यामुळे राज्य शासनाने आता महत्त्वाचा निर्णय घेतला असून e-KYC साठीची अंतिम मुदत 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे.
GR Download करा. येथे क्लिक करा.
कोणाला e-KYC साठी सूट मिळू शकते?
ज्या लाभार्थी महिलांचे—
- पती हयात नाहीत
- किंवा वडील हयात नाहीत
- अथवा घटस्फोट झालेला आहे
अशा महिलांना पती/वडील यांच्या आधार OTP शिवाय e-KYC करण्यास सूट मिळू शकते.
त्याकरिता लाभार्थी महिलांनी खालील कागदपत्रे 31 डिसेंबर 2025 पर्यंत अंगणवाडी सेविकेकडे जमा करावीत:
- पती/वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र
- घटस्फोट प्रमाणपत्र / न्यायालयाचा आदेश (लागू असल्यास)
सर्वात प्रथम ही कागदपत्रे अंगणवाडी सेविका तपासून संबंधित बाल विकास प्रकल्प अधिकारी (CDPO) यांच्या मार्फत जिल्हा महिला व बाल विकास अधिकाऱ्यांकडे शिफारस पाठवतील. पुढे ही शिफारस आयुक्त कार्यालयामार्फत शासनाकडे पाठवली जाईल.
योजनेचे उद्दिष्ट
या योजनेमुळे राज्यातील महिलांना
- आर्थिक स्वावलंबन मिळावे
- कुटुंबात त्यांचा निर्णयक्षम सहभाग वाढावा
- आरोग्य व पोषण स्थितीत सुधारणा व्हावी
हे प्राथमिक उद्दिष्ट आहे.
महत्वाची सूचना
सर्व पात्र महिलांनी वेळ न दवडता e-KYC प्रक्रिया पूर्ण करावी, जेणेकरून योजनेचा आर्थिक लाभ मिळणे सुरू राहील. अंगणवाडी सेविका किंवा बाल विकास प्रकल्प कार्यालयाशी संपर्क करून अधिक माहिती मिळवता येईल.