PM Surya Ghar Yojana: फक्त एकदा इंस्टॉल करा आणि आयुष्यभर वीज फ्री, सोलर पॅनलवर सरकार देत आहे जबरदस्त सबसिडी!

PM Surya Ghar Yojana: देशभरातील लाखो कुटुंबांना महागड्या वीजबिलाचा ताण दर महिन्याला जाणवतच असतो. तसेच ज्या पद्धतीने आणि वेगाने वीजदर वाढत आहेत, त्यात घरगुती खर्च सांभाळताना सर्वसामान्य माणसाची अक्षरशः तारेवरची कसरत होताना बघायला मिळते. अशा वेळी केंद्र सरकारने सुरू केलेली PM Surya Ghar Yojana म्हणजे खऱ्या अर्थाने दिलासा देणारी योजना आहे. या योजनेमुळे आपल्या घराच्या छतावर सोलर पॅनल बसवले की दरमहा 300 युनिटपर्यंत वीज पूर्णपणे मोफत (Free Electricity Scheme India) मिळू शकते, आणि त्यासाठी सरकारकडून मोठी सबसिडीदेखील देण्यात येते. अनेक राज्यांमध्ये तर ही सबसिडी (Rooftop Solar Subsidy) आणखी वाढवून देण्यात येत असल्याने सामान्य घरांना या योजनेचा मोठा फायदा होत आहे.

योजना नेमकी कोणासाठी आणि ती कशी मदत करते?

प्रधानमंत्री सूर्य घर योजना ही पूर्णपणे रूफटॉप सोलर आधारित योजना आहे. आपल्या घराच्या छतावर जागा असेल आणि जर तिथे सूर्यप्रकाश पुरेसा मिळत असेल, तर हे प्लांट सहज बसवता येतात. एकदा प्लांट इंस्टॉल केला की वीज निर्मिती थेट तुमच्या घरात होते. त्यामुळे महागड्या वीजबिलाचा प्रश्नच राहत नाही. या योजनेचा उद्देश फक्त घरगुती वीजबचत करणे इतकाच नाही, तर देशातील कार्बन उत्सर्जन कमी करणे, 24 तास वीज उपलब्धता सुनिश्चित करणे आणि भारताला पर्यावरणपूरक उर्जेकडे नेणे हा देखील आहे. सरकारने या योजनेतून देशातील 1 कोटी घरांना मोफत वीज देण्याचे लक्ष्य ठेवले आहे. अनेक घरांनी ही योजना (Solar Panel Subsidy 2025) स्वीकारली असून त्यांच्या वीजबिलाचे हजारो रुपये वाचत असल्याचे दिसत आहेत.

रजिस्ट्रेशन कसे करायचे?

या योजनेसाठी अर्ज करणं अगदी सोपं आहे. फक्त काही मिनिटांत तुमचं रजिस्ट्रेशन (PM Solar Yojana Registration) पूर्ण होतं:

  • यासाठी सगळ्यात आधी पुढे दिलेल्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या pmsuryaghar.gov.in.
  • त्यानंतर Apply Now वर क्लिक करा, याठिकाणी मोबाईल नंबर टाका, कॅप्चा भरा आणि OTP द्वारे लॉगिन करा.
  • पुढे नाव, पत्ता, राज्य, जिल्हा, ईमेल यांसारखी माहिती भरा.
  • आता Apply for Solar Rooftop हा पर्याय निवडा.
  • त्यानंतर तुमचे राज्य, जिल्हा आणि DISCOM निवडा. पुढे तुमचा ग्राहक क्रमांक टाकून फॉर्म सबमिट करा.

तुमचा अर्ज सबमिट झाल्यावर DISCOM तुमची माहिती तपासते आणि सर्व काही योग्य असल्यास तुम्हाला Approval दिलं जातं.

कोणती आवश्यक कागदपत्रे लागतात?

  • आधार कार्ड
  • पत्त्याचा पुरावा
  • उत्पन्न प्रमाणपत्र
  • विजबिल
  • रेशन कार्ड
  • मोबाईल नंबर
  • पासपोर्ट साइज फोटो
  • बँक पासबुक

अर्ज केल्यानंतर पुढची प्रक्रिया काय आहे?

एकदा का तुम्हाला Approval मिळालं की मग तुम्हाला तुम्ही पोर्टलवरून इच्छित Vendor निवडायचा आहे. हा Vendor तुमच्या घरी भेट देऊन किती kW चा प्लांट बसवायचा ते ठरवतो. त्यानंतर इंस्टॉलेशन पूर्ण झाल्यावर DISCOM तुमच्या घरात नेट मीटर बसवते, आणि ग्रिड कनेक्शनची अंतिम तपासणी करते.

यांनंतर तुम्हाला Final Approval मिळतं आणि सब्सिडी थेट तुमच्या बँक खात्यात जमा होते. सब काही पूर्ण झाल्यावर तुमचं सोलर सिस्टीम सुरू होतं आणि दरमहा 300 युनिटपर्यंत (300 Units Free Electricity) मोफत वीज मिळू लागते.

किती सबसिडी मिळते?

सरकारकडून देण्यात येणारी सबसिडी:

  • 1 kW: ₹30,000
  • 2 kW: ₹60,000
  • 3 kW व त्यापुढे: ₹78,000 इतकी सबसिडी मिळते.

याशिवाय अनेक राज्ये स्वतंत्रपणे सबसिडी (Solar Plant Installation Subsidy) देत असल्याने तुमचा एकूण खर्च आणखी कमी होतो. त्यामुळे अनेक घरांमध्ये सोलर प्लांट अत्यंत कमी पैशात बसवले जात आहेत.

ही योजना विशेष का?

कारण या योजनेमुळे वीजबिलात मोठी बचत तर होतेच, पण सोबतच पर्यावरणपूरक वीज घरबसल्या मिळते. तसेच कार्बन उत्सर्जनात देखील यामुळे घट होत असल्याचं दिसून येतं. विशेष म्हणजे ही सोलर सिस्टम 25 वर्षे टिकणारी आहे त्यामुळे एकदाच गुंतवणूक करून वर्षानुवर्षे मोफत वीज मिळवता येते आणि वीजबिलासाठी लागणारा आर्थिक खर्च सुद्धा मोठ्या प्रमाणात कमी होतो.