
Ahilyanagar Bribery Scam: अहिल्यानगरमध्ये नुकतीच भूमिअभिलेख विभागात घडलेली एक मोठी घटना समोर आली आहे आणि या घटनेतून पुन्हा एकदा प्रशासनातील भ्रष्टाचाराचे काळे सावट समोर आले असल्याचं बघायला मिळत आहे. अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांचे रस्ते, मोजणी, खुणा आणि फाईली यातून निर्माण होणाऱ्या अडचणी अनेक वेळा शेतकऱ्यांना आर्थिक आणि मानसिकरीत्या थकवणाऱ्या ठरतात. पण या वेळी मात्र परिस्थिती काही वेगळी होती, कारण एका तक्रारदाराने शांत बसण्याऐवजी धाडस केलं, आवाज उठवला आणि त्याच्यामुळे एक मोठं लाच प्रकरण उघड झालं आहे.
अहिल्यनगरच्या भूमिअभिलेख कार्यालयातील भूकरमापक अजयभानसिंग गुलाबसिंग परदेशी (वय 48) यांना नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने 1.5 लाखांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडलं असल्याचं दिसून येत आहे. सरकारकडून (Government Bribery News India) बऱ्याच वेळा याबाबतीत शेतकऱ्यांच्या नशीबी कायमच निराशा आणि अपेक्षाभंग आला आहे आणि आता अधिकाऱ्यावर करण्यात आलेली ही कारवाई जणू एक उत्तम उत्तरच ठरली आहे.
शेतकऱ्यांच्या हक्काच्या रस्त्यावर अडथळे आणि त्यातून सुरू झालेली भ्रष्टाचाराची कथा
पाथरवाला गायगव्हाण (नेवासा) या भागात तक्रारदार, त्याचे कुटुंब आणि इतर शेतकऱ्यांची शेती आहे. त्यांच्याकडे जाण्यासाठीचा शिवरस्ता हा अतिक्रमणामुळे बंद झाला होता. शेतकऱ्यांनी 31 जानेवारी 2022 ला नेवासा तहसीलदारांकडे रस्ता खुला करण्याचा अर्ज केला. त्यानंतर तहसीलदारांनी त्यांची जमीन मोजणीचा आदेश दिला होता, पण त्याचबरोबर मोजणीचा खर्च हा शेतकऱ्यांनीच भरावा (Land Records Bribery Scam) असे देखील त्यांनी पुढे सांगितले. हा निर्णय अन्यायकारक वाटल्याने शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयाची वाट धरली आणि त्यांच्या बाजूने मोठा दिलासा देत न्यायालयाने स्पष्ट आदेश दिला की शिवरस्त्याच्या मोजणीचा खर्च हा शासनानेच करावा.
यामुळे फेब्रुवारी 2023 मध्ये रस्ता मोजला गेला आणि सर्वांसाठी खुला सुद्धा करण्यात आला. परंतु ही समस्या इथेच संपली नाही, तर मार्च 2025 मध्ये रस्त्याच्या मजबुतीकरणाचं काम मंजूर झालं, आणि पुन्हा काही जणांनी नव्या मोजणीसाठी (Land Measurement Corruption Maharashtra) अर्ज केला. परिणामी 6 जून 2025 ला झालेल्या मोजणीत पुन्हा रस्त्याच्या मधोमध खुणा दाखवण्यात आल्या आणि रस्ता पुन्हा बंद करण्यात आला आणि शेतकरी पुन्हा एकदा समस्येत सापडले.
1.5 लाखांची मागणी
ज्यावेळी 30 जूनला तक्रारदाराच्या भावाने मोजणीसाठी अर्ज केला तेव्हा भूकरमापक अजयभानसिंग परदेशी यांनी त्यांच्या वैयक्तिक प्रभावाचा वापर करणार असल्याचे सांगत, मोजणी बदलून देण्याचे आश्वासन दिले. त्यासाठी त्यांनी 3 डिसेंबर रोजी 1.5 लाख लाचेची थेट मागणी त्यांच्याकडे केली. शेतकऱ्यांनी आतापर्यंत केलेला संघर्ष, न्यायालयात गेलेली प्रकरणं, रस्त्यासाठी चाललेली वर्षानुवर्षांची धडपड आणि या सगळ्यानंतरही अधिकारी लाच मागत असल्याने तक्रारदाराने शांत न बसता थेट लाचलुचपत प्रतिबंधक पथकाकडे तक्रार (ACB Trap Latest News) दाखल केली आणि इथून पुढेच मोठी कारवाई सुरू झाली.
गुरुवारी, पंचासमक्ष, 1.5 लाखांची लाच स्वीकारताना अजयभानसिंग परदेशी यांना LCB टीमने रंगेहात (Anti Corruption Bureau Trap Maharashtra) अटक केली. या कारवाईत नाशिक LCBचे पोलीस निरीक्षक (Nashik ACB Raid) राहुलकुमार नाईक आणि अंमलदार प्रफुल्ल माळी, विलास निकम, विनोद पवार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. अधिक तपास नगर LCBचे पोलीस निरीक्षक राजू आल्हाट यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. नेवासा पोलीस ठाण्यात परदेशी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेतकऱ्यांसाठी ही फक्त एक बातमी नसून हा एक संदेश ठरला आहे! सरकारी दारात होणारी भ्रष्टाचाराची मागणी, त्यातून निर्माण होणारी भीती, त्रास, मानसिक ताण या गोष्टी अनेक शेतकरी वर्षानुवर्षे सहन करतात मात्र त्याविरोधात आवाज उठवत नाहीत. पण या प्रकरणात तक्रारदाराने दाखवलेले धाडस हे नक्कीच कौतुकास्पद आहे. तसेच या प्रकरणामुळे सरकारच्या यंत्रणेत प्रामाणिकपणा (Farmer Rights Maharashtra) अजूनही अस्तित्वात असल्याचं सिद्ध झालं आहे.