
Farmer Loan Waiver Maharashtra राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारकडून मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदत देण्यात आली आहे. ही मदत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यांत जमा करण्यात आली असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.
हिवाळी अधिवेशनाच्या अंतिम आठवड्यात प्रस्तावावरील चर्चेदरम्यान ते बोलत होते. त्यांनी सांगितले की, आतापर्यंत सुमारे 15 हजार 7 कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यांत जमा करण्यात आले आहेत. या मदतीचा लाभ सुमारे 92 लाख शेतकऱ्यांना झाला आहे.
Maharashtra Farmer Relief अतिवृष्टीमुळे राज्यातील अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. विशेषतः सिंचन विहिरींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. यासाठी सरकारने 27 हजार विहिरींच्या दुरुस्तीसाठी 80 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. प्रति विहीर 30 हजार रुपयांपर्यंत मदत दिली जात आहे. Farmer Loan Waiver Maharashtra
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, यापूर्वी राज्य सरकारने 32 हजार कोटी रुपयांचे विशेष मदत पॅकेज जाहीर केले होते. यामध्ये 10 हजार कोटी रुपये पायाभूत सुविधांसाठी देण्यात आले. 2 हजार कोटी रुपये नरेगा अंतर्गत कामांसाठी मंजूर करण्यात आले. उर्वरित रक्कम थेट शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून देण्यात आली.
या योजनेत तीन हेक्टरपर्यंत जमीनधारणा असलेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यात आली. एनडीआरएफच्या निकषांनुसार मदत दिल्यानंतरही रब्बी हंगामासाठी प्रति हेक्टर 10 हजार रुपये अतिरिक्त मदत देण्याचा निर्णय सरकारने घेतला होता.
पशुपालक शेतकऱ्यांसाठीही सरकारने मदतीचे निर्णय घेतले आहेत. पशुधनहानी झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात आली आहे. ग्रामीण भागात नरेगा अंतर्गत विविध कामे सुरू करण्यात आली असून, रोजगार उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला आहे. Maharashtra Government Schemes for Farmers
Farmer Loan Waiver Maharashtra शेती पिकांच्या नुकसानीसाठी आणि बियाणे खरेदीसाठी सरकारने दोन स्वतंत्र शासन निर्णय काढले होते. पहिला निर्णय सुमारे 10 हजार 516 कोटी रुपयांचा होता. दुसरा निर्णय 9 हजार 611 कोटी रुपयांचा होता. यापैकी मोठा निधी थेट शेतकऱ्यांच्या खात्यांत जमा करण्यात आला आहे.
काही ठिकाणी 10 हजार रुपयांची मदत मिळाली नाही, असा आरोप होत आहे. मात्र प्रत्यक्षात 91 ते 92 लाख शेतकऱ्यांच्या खात्यांत ही रक्कम जमा झाल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.
कर्जमाफी करणार पण..
Farmer Financial Aid Maharashtra कर्जमाफीच्या मुद्द्यावर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, सरकार कर्जमाफी करणार आहे. मात्र त्याचा फायदा थेट शेतकऱ्यांनाच झाला पाहिजे, बँकांना नाही. 2017 आणि 2020 मध्ये कर्जमाफी देऊनही शेतकरी पुन्हा कर्जमाफीची मागणी करत आहेत. त्यामुळे दीर्घकालीन उपाय आवश्यक आहेत.
यासाठी सरकारने एक समिती नेमली असून, कर्जमाफीबाबतचे पुढील धोरण 1 जुलैपर्यंत जाहीर केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.