मोठी बातमी! सोन्याच्या किमतीत पुन्हा वाढ; विदर्भात थंडीचा कडाका आणि तुमचे आजचे राशीभविष्य (९ जानेवारी २०२६)

gold silver rate today

मोठी बातमी! सोन्याच्या किमतीत पुन्हा वाढ; विदर्भात थंडीचा कडाका आणि तुमचे आजचे राशीभविष्य (९ जानेवारी २०२६)


आजच्या ‘डेली अपडेट’मध्ये आपण जाणून घेणार आहोत सराफा बाजारातील सोन्या-चांदीचे ताजे भाव, राज्यातील हवामानाची स्थिती आणि तुमच्या राशीनुसार आजचा दिवस कसा असेल. लग्नसराईच्या काळात सोन्याचे भाव गगनाला भिडले असून ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ बसत आहे. चला तर मग, सविस्तर माहिती पाहूया.

१. सोन्याच्या किमतीत मोठा बदल (Gold & Silver Rate Update)

मुंबई सराफा बाजारात गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे भाव गगनाला भिडले आहेत. सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने ग्राहकांच्या खिशाला कात्री लागत आहे. अशातच ८ जानेवारी २०२६ रोजी भारतीय बाजारात सोन्याच्या दरात मोठा फेरबदल झाल्याचे पाहायला मिळाले आहे.

बुलियन मार्केट वेबसाईटनुसार, ८ जानेवारी २०२६ रोजी देशात सोन्या-चांदीचे दर खालीलप्रमाणे नोंदवले गेले आहेत:

  • २४ कॅरेट सोने (१० ग्रॅम): ₹ १,३७,८६०/-
  • २२ कॅरेट सोने (१० ग्रॅम): ₹ १,२६,३७२/-
  • चांदी (१ किलो): ₹ २,४८,९७०/-
  • चांदी (१० ग्रॅम): ₹ २,४९०/-

(टीप: उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग चार्जेसमुळे तुमच्या शहरातील सोन्याच्या दागिन्यांच्या किमती बदलू शकतात.)


२. विदर्भातील हवामान आणि तापमान (Maharashtra Weather Update)

विदर्भात थंडीचा जोर चांगलाच वाढला आहे. गोंदिया आणि भंडारा येथे तापमानाचा पारा १० अंशांवर आला असून हुडहुडी वाढली आहे. प्रमुख शहरांचे आजचे कमाल आणि किमान तापमान खालीलप्रमाणे आहे:

शहरकमाल तापमान (°C)किमान तापमान (°C)
नागपूर२८.८१०.६
वाशीम३०.२१०.६
अकोला३१.११४.५
बुलडाणा२९.५१३.४
अमरावती३०.८११.६
यवतमाळ३०.०११.०
वर्धा२९.२११.५
चंद्रपूर२९.८१२.८
गडचिरोली२९.४१०.६
भंडारा२८.०१०.०
गोंदिया२७.६१०.०

अमरावती, यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यातही किमान तापमान ११ अंशांच्या आसपास असल्याने रात्रीच्या वेळी चांगलीच थंडी जाणवत आहे.

आजचे राशीभविष्य (Daily Horoscope / Rashi Bhavishya)

ग्रहमानानुसार आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या १२ राशींचे सविस्तर भविष्य:

  • मेष (Aries): उपजत कला-गुणांना उत्तम वाव मिळेल. व्यवसायात नवे करार मार्गी लागतील. बाकी चिंता नसावी.
  • वृषभ (Taurus): एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करा. महत्त्वाच्या निर्णयात धरसोडपणा टाळावा. जुनी येणी वसूल होतील.
  • मिथुन (Gemini): अपेक्षित साध्य झाल्याने समाधान लाभेल. स्वमताग्रह टाळायला हवा. आप्तेष्टांच्या/नातलगांच्या भेटी होतील.
  • कर्क (Cancer): कसल्याही आमिषाला बळी पडू नका. अनुभवींचा सल्ला लक्षात घ्यावा. जोडीदाराचे सहकार्य लाभेल.
  • सिंह (Leo): आजचा दिवस तुमच्यासाठी उत्तम राहील. साऱ्या गोष्टी मनाप्रमाणे घडतील. व्यवसायात उत्कर्ष होईल.
  • कन्या (Virgo): दिलासादायक घटना घडतील. नव्या योजनांना गती मिळेल. नोकरीसाठी मुलाखतीत यश मिळेल.
  • तूळ (Libra): सरकारी कामे मनाजोगी होतील. कारकिर्दीत नवा उत्साह राहील. प्रियजनांच्या भेटीचे योग आहेत.
  • वृश्चिक (Scorpio): व्यवसायात अचानक अडचणी येतील. मन विचलित होऊ शकेल. पुरेसा संयम बाळगायला हवा.
  • धनु (Sagittarius): कामाची योग्य आखणी करून घ्या. चैनीवर खर्च करणे टाळायला हवे. प्रेम प्रकरणात वाद संभवतात.
  • मकर (Capricorn): कौटुंबिक प्रश्न चिंता वाढवतील. नवे करार तूर्तास करू नयेत. निराशा वाढवणाऱ्या घटना संभवतात.
  • कुंभ (Aquarius): नोकरीत वरिष्ठांची मर्जी राहील. घरातील ज्येष्ठांच्या प्रकृतीची काळजी वाटेल. विचाराने राहायला हवे.
  • मीन (Pisces): अपेक्षित वार्ता कानी येईल. पती-पत्नीच्या नात्यात सुसंवाद ठेवावा. मानसिक स्वास्थ्य लाभेल.