लाडकी बहीण योजना: महिलांच्या खात्यात जानेवारीचे ₹१५०० जमा! पण ‘या’ ८४ लाख महिलांना हप्ता का मिळाला नाही? जाणून घ्या कारण

Ladki bahin yojna update

राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. काल संध्याकाळपासूनच पात्र महिलांच्या बँक खात्यात जानेवारी महिन्याचा १५०० रुपयांचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे. काही महिलांना मेसेज आले आहेत, तर काहींच्या खात्यात आज पैसे जमा होतील.

पण लक्षात घेण्यासारखी सर्वात मोठी बाब म्हणजे, सर्वच लाभार्थी महिलांना या वेळी हप्ता मिळणार नाही. राज्यभरातील तब्बल ८४ लाख महिला या जानेवारी महिन्याच्या लाभापासून वंचित राहणार आहेत. यामागे नेमकी काय कारणे आहेत, हे आपण सविस्तर जाणून घेऊया.

फक्त ‘याच’ महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ:

  • ज्या महिला या योजनेच्या सर्व अटींची पूर्तता करून पात्र ठरल्या आहेत, फक्त त्यांनाच हा हप्ता दिला जात आहे.
  • सर्वात महत्त्वाची अट म्हणजे केवायसी (KYC) पूर्ण करणे. ज्या महिलांनी बँक खात्याची केवायसी पूर्ण केली आहे, त्यांच्याच खात्यात जानेवारीचे पैसे जमा होत आहेत.

८४ लाख महिलांना जानेवारीचा हप्ता का मिळणार नाही?

शासनाने केवायसी करणे अनिवार्य करूनही अनेक महिलांनी त्याकडे दुर्लक्ष केले. खालील कारणांमुळे अनेक महिलांचा लाभ बंद किंवा तात्पुरता थांबवण्यात आला आहे:

  • केवायसी न करणे: ज्या महिलांनी अद्याप केवायसी केलेली नाही, त्यांच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत.
  • खोटी माहिती भरणे: केवायसी प्रक्रियेदरम्यान ज्या महिलांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे उघडकीस आले आहे, त्यांना या योजनेतून कायमचे बाद करण्यात आले असून त्यांचा लाभ बंद करण्यात आला आहे.
  • केवायसीमधील चुका: ज्या महिलांची केवायसी करताना काही तांत्रिक चूक झाली आहे, त्यांचा लाभ केवळ तात्पुरत्या स्वरूपात थांबवण्यात आला आहे. ही चूक दुरुस्त झाल्यानंतर काही दिवसांनी त्यांच्या खात्यात पैसे दिले जातील.

तुमचे पैसे जमा झाले की नाही?

काल संध्याकाळपासून पैसे वाटपाची प्रक्रिया सुरू झाली आहे. तुम्ही जर या योजनेसाठी पात्र असाल आणि तुमची केवायसी (KYC) पूर्ण असेल, तर तुमचे पैसे नक्कीच जमा होतील. ज्या महिला अपात्र आहेत किंवा ज्यांची केवायसी प्रलंबित आहे, त्यांच्या खात्यात हा हप्ता येणार नाही. त्यामुळे लवकरात लवकर आपली केवायसी तपासून घेणे आवश्यक आहे.