Anganwadi Bharti महाराष्ट्र राज्यात महिला व बालविकास विभागामार्फत अंगणवाडी सेविका मदतनीससाठी पदभरती सुरु करण्यात आली आहे. ही पदभरती जिल्हा निहाय होत असून काही जिल्ह्यामध्ये भरतीला सुरुवात झाली आहे.
महाराष्ट्र राज्यामध्ये कुपोषणामुळे बालमृत्यूंचे प्रमाण वाढत आहे. यावर्षीही सात महिन्यांमध्ये राज्यात 6215 बालमृत्यूंची नोंद करण्यात आली. महाराष्ट्र राज्याती विविध तालुक्यांमधील गावांमध्ये मुलांना आरोग्य आणि शिक्षण या दोन्ही स्तरांवर पहिल्या टप्प्यात मदत देणा-या अंगणवाडी सेविकांसह मदतनीस, बालविकास प्रकल्प अधिकारी यांचा महत्त्वाचा सहभाग असतो. परंतु या मदतनीस व सेविकांची तब्बल 11 हजार 731 पदे रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे. Anganwadi Bharti2023-24
महाराष्ट्र राज्यात अंगणवाडी सेविका, मदतनीसांची एकूण किती पदे रिक्त आहेत?
महाराष्ट्र राज्य शासनाच्या महिला बाल विकास विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या अंगणवाड्यांमध्ये लहान मुलांच्या शिक्षण व आरोग्य या पातळ्यांवर काळजी घेण्याचे काम सुरु आहे. मात्र राज्यातील 553 प्रकल्पांत 1,10,444 अंगणवाड्या आहेत, मुख्य अंगणवाड्यांची संख्या 97,437 तर 12,971 इतक्या मिनी अंगणवाड्या राज्यभर कार्यरत आहेत. त्यामधील रिक्त पदांचा प्रश्न आजही सुटलेला नाही. या अंगणवाड्यांमध्ये 11 हजार 731 पदे रिक्त आहेत. ऑक्टोबर 2023 च्या आयसीडीएसच्या अहवालानुसार राज्यात अंगणवाडी मदतनीस ते बालविकास प्रकल्प अधिका-यांची एकूण 11,731 इतकी पदे रिक्त असल्याचे सांगण्यात आले होते.
अंगणवाडी प्रकल्पांतर्गत रिक्त पदांची एकूण संख्या
- अंगणवाडी सेविका 5,015
- मिनी अंगणवाडी सेविका 448
- मदतनीस 4564
- अंगणवाडी पर्यवेक्षिका 1395
- बालविकास प्रकल्प अधिकारी 309
महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्र्यांची जाहीर घोषणा
बाल विकास विभागामार्फत अंगणवाडी मदतनीस आणि सेविकांची सुमारे 20 हजार 186 पदे रिक्त पदे भरण्यासाठीची घोषणा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. महाराष्ट्र राज्यात ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम राबवला जात आहे. या उपक्रमातून आतापर्यंत 13 जिल्ह्यांमध्ये सुमारे एक कोटीहून अधिक नागरिकांना लाभ पोहोचवण्यासाठी या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची मदत घेण्यात येणार असल्याचे देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले आहे. अंगणवाडी हा ग्रामिण तसेच शहरी भागात तळागाळातील नागरिकांपर्यंत आरोग्य आणि शिक्षण पोहोचविण्यासाठीचा प्रकल्प असून या प्रकल्पाच्या केंद्रस्थानी असलेल्या अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि सेविका यांना योग्य मानधन देत आर्थिकदृष्ट्या स्थिर करणे हे देखील शासनाचे कर्तव्य आहे.
अंगणवाडी मदतनीस पदासाठी अर्ज करताना लागणारी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- रेशनकार्ड
- जात प्रमाणपत्र
- उत्पन्नाचा दाखला
- मूळ गावचा रहिवासी दाखला.
- 12 वी पास असल्याचे प्रमाणपत्र.
- शाळा सोडल्याच्या दाखल्याची छायांकित प्रत
अंगणवाडी मदतनीस पदासाठी वय मर्यादा
अंगणवाडी मदतीनस पदासाठी अर्ज करणारी महिला ही 18 ते 40 वर्षे वयोगटातील असावी. Maharashtra Anganwadi Recruitment 2023-2024
किती असेल मानधन?
अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधन वाढीचा निर्णय राज्यसरकाने याआधीच घेतला होता,. त्यानुसार सेविकांना 10 हजार रुपये तर मिनी अंगणवाडी सेविकांना 7200 आणि मदतनीस असलेल्यांना 5000 रुपयांपर्यंतचे मानधन देण्याता निर्णय घेण्यात आला. यानुसारच 2023-24 च्या या अंगणवाडी सेविका, मदतनीस भरतीमध्ये मानधन देण्यात येणार आहे. Anganwadi Bharti2023-24
अंगणवाडी प्रकल्पाच्या माध्यमातून राज्यातील सक्षम पिढी घडविण्याचे काम होते
महाराष्ट्र राज्य महिला व बालविकास विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या अंगणवाडी या प्रकल्पामार्फत 0 ते 12 वर्ष वयोगटतील मुलांचे आरोग्य आणि शिक्षणासंदर्भात शासन सुविधा पुरवित असते. अंगणवाडी कर्मचारी Maharashtra Anganwadi Bharti 2023-24 हे फक्त पोषण आहार देणे व बालकांचे संगोपन करणे एवढेच काम करीत नसून सुदृढ बालक आणि सक्षम पिढी घडविण्याचे काम देखील करीत असतात. 2023 यावर्षी स्वातंत्र्य दिनानिमित्त महाराष्ट्र शासनातर्फे डॉ. आनंदीबाई जोशी आरोग्य शिबिरांचे आयोजन केले होते. यामध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली होती. यापुढे होणाऱ्या शिबिरांमध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांबरोबरच त्यांच्या कुटुंबीयांचाही समावेश केला जाणाप असल्याचे शासनातर्फे जाहीर करण्यात आले आहे. राज्यातील प्रत्येक बालक सुदृढ होण्यासाठी अंगणवाडी कर्मचारी अत्यंत प्रामाणिकपणे काम करतात त्यांना पाठबळ देण्यासाठी शासन प्रयत्नशील राहील.