Farmland on Lease आजही भारतात आणि राज्या राज्यांमध्ये असेही काही नागरिक आहेत ज्यांच्या नावे जमीन नाही. त्यामुळे त्यांना शेती करायची इच्छा असूनही ते शेती करु शकत नाही. म्हणूनच महाराष्ट्र शासनाने शेती महामंडळाची स्थापना केली. या विभागामार्फत निविदा काढल्या जाताता आणि ज्यांची जमीन नाही परंतु त्यांना शेती करायची आहे अशा नागरिकांना 10 वर्षांच्या भाडे तत्वावर जमीन दिली जाते. त्यासाठी योग्य ती रक्कम जमीन ज्यांना दिली जाणार आहे त्यांच्याकडून आकारली जाते.
महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाकडे सध्या 41 हजार एकर शेतजमीन भाड्याने देण्यासाठी उपलब्ध आहे. त्यापैकी जवळपास २३ हजार एकर शेतजमीन नियमानुसार 10 वर्षांच्या कालावधीसाठी भाड्याने देण्यात आलेली आहे.
महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाकडून भाडेतत्वावर जमीन मिळविण्यासाठी नेकमे कोणते नियम आहेत आणि जमीन मिळविण्यासाठी काय करावे लागते यासंदर्भात संपूर्ण माहिती या लेखाच्या माध्यमातून देण्यात आली आहे. लेख शेवटपर्यंत वाचा. Farmland on Lease
शेतजमीन भाडेतत्वावर मिळविण्यासाठी कोण अर्ज करू शकतो?
शेतकरी, खाजगी संस्था या महाराष्ट्र शेती महामंडळाकडून जमीन भाडेतत्वावर घेऊ शकतात. परंतु महामंडळाकडून ज्यांनी जमीन घेतली आहेत त्याच अवस्थेत शेतजमीन महामंडळाला परत करावी लागते.
शेती महामंडळाकडून जमीन भाड्याने घेण्यासाठी काय केले पाहिजे?
महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाकडून जमीन मिळविण्यासाठीची एक प्रक्रिया आहे, या प्रक्रियेनुसार अर्ज कल्यास शेतकरी किंवा खाजगी संस्थांना जमीन भाडे तत्वावर मिळविता येते. Farmland on Lease
- आधी यांनी भाडेतत्वावर जमीन घेतली आहे त्यांचा १० वर्षांचा करार संपला आहे, अशी शेतजमीन पुन्हा महामंडळाकडून ताब्यात घेतली जाते
- आणि त्याच जमिनीसाठी पुन्हा निविदा काढून जे शेतकरी जास्त भाडे देतील त्यांना भाडेकरारावर जमीन दिली जाते.
- तुम्हाला भाडेतत्वावर जमीन मिळवायची असल्यास सरकारच्या mahatenders.gov.in या संकेतस्थळावर भेट द्या.
- येथे महाराष्ट्र शेती महामंडळ या विभागांतर्गत शेती भाड्याने देण्याच्या निविदा निघतात.
- शासनाच्या माध्यमातून जमिनीच्या करारासाठीच्या निविदा निघाल्यानंतर शेतकऱ्यांनी शेतजमिनीची प्रत्यक्ष पाहणी करावी, जेणाकरून जमिनीचा अंदाज येतो.
- शेती महामंडळाकडून जमीन मिळविण्यासाठी तुमच्याकडे पाणी व्यवस्था, माती, रस्त्याची सोय, लाइटची सोय अशा गोष्टी तपासून निविदा भरणे आवश्यक ठरते.
निविदेमध्ये शेत जमिनीसंबंधीत कोण कोणती माहिती दिलेली असते
महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या जमीन भाड्याने देण्याबाबातच्या निविदा निघतात तेव्हा शेती भाड्याने देण्याच्या निविदेवर शेत जमिनीचा पत्ता, गट क्रमांक, नकाशा, जमिनीच्या ठिकाणी पाण्याची सोय असल्याचे पुरावे, रोड, जमिनीचा पोत, आसपास कोणती पिके घेतली जातात या प्रकारची माहिती निविदे मार्फत पुरवलेली असते. निविदा काढण्यात आलेल्या जमिनीचा नकाशा आणि सातबारा सोबत जोडलेला असल्यामुळे शेतकऱ्यांना जमिनीचा अंदाज घेता येतो. Farmland on Lease
शेती महामंडळाने भाड्याने शेतजमीन देण्याबाबतच्या अटी
महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ ज्यांना कसण्यासाठी जमीन नाही किंवा खाजगी कंपन्यांना उत्पादन घेण्यासाठी जमिन नसल्यास जमिन पुरविण्याचे काम केले जाते. परंतु ही जमीन 10 वर्षांच्या भाडेतत्वावर देताना शेती मंडळाच्या काही अटी व शर्ती असतात, त्या नेमक्या कोणत्या हे आपण पाहुया.
- ज्याने जमिन भाडेतत्वावर घेतली आहे त्याला शेतात लागवड होणाऱ्या पिकाबाबतची माहिती शेती महामंडळाला देणे बंधनकारक असते.
- भाडेतत्वावर घेतलेल्या जमीनीमध्ये दहा वर्षांपेक्षा जास्त काळ चालणारे पिके घेण्यास बंदी आहे.
- भाडेतत्वावर घेतलेल्या जमिनीवर घर, बंगला, शेड किंवा कायमस्वरूपाचे कोणतेही बांधकाम करता येत नाही.
- शेती महामंडळाकडून भाडे तत्वावर घेण्यात आलेल्या जमिनीवर फक्त आणि फक्त पिकांची लागवड करता येते.
- कोणताही व्यवसाय किंवा प्रक्रिया उद्योग करण्यास मनाई करण्यात आलेली आहे.
- भाडेतत्वावर देण्यात आलेल्या क्षेत्रावर लक्ष ठेवण्यासाठी शासनाचे अधिकारी तैनात केलेले असतात.
- शासकीय जमीनीवर अतिक्रमण टाळण्यासाठी आणि शेतीच्या सुरक्षेसाठी सरकारचे सुरक्षारक्षकही तैनात करण्यात आलेले असतात.
- महामंडळाकडून जमीन भाड्याने घेतल्यानंतर शेतकरी त्या जमिनीमध्ये पाण्याच्या व्यवस्थेसाठी शेततळे, बोअरवेल, विहीर खोदू शकतात. Farmland on Lease