Aadhar Card Mobile Number Link: आधार कार्डशी कोणता नंबर लिंक आहे हे जर तुम्हाला आठवत नसेल तर तुम्ही या पद्धतीने शोधू शकता.

Aadhar Card Mobile Number Linked भारत सरकारने 2016 मध्ये नागरिकांसाठी ही ओळख प्रणाली सुरु केली. भारतातील प्रत्येक नागरिकाला 12 अंकी एक युनिक ओळखपत्र देण्यात आले. तब्बल 140 करोड भारतीय नागरिकांकडे आधार कार्ड उपलब्ध आहेत आणि हे नागरिक त्याचा ओळखपत्र म्हणून वापर करीत आहेत म्हणूनच तर  आधार ही जगातील सर्वात मोठी बायोमेट्रिक आयडी प्रणाली आहे असे म्हटले जाते. परंतु या आधार कार्ड सोबत एक मोबाईलनंबर देखील लिंक असतो. सुरुवातीला जेव्हा आधार कार्ड बनविण्यात आले तेव्हाच व्यक्तिने दिलेल्या मोबाईल  क्रमांक त्याच्या आधार कार्डसोबत लिंक केला जातो. परंतु तुम्हाला जर का तुमच्या आधार कार्ड सोबत कोणता मोबाईल क्रमांक लिंक केला गेला आहे हे जाणून घ्यायचे असले तर आजचा हा लेख पूर्ण वाचा.

आधारकार्डशी लिंक असलेला नंबर तुमच्याकडे असणे का गरजेचे आहे?

भारत सरकारने प्रत्येक नागरिकाला दिलेला एक युनिक आयडेंटिफिकेशन नंबर म्हणजेच आधार कार्ड आहे. या आधार कार्डमध्ये प्रत्येक भारतीयाची ओळख असते. हे एक ओळखपत्र म्हणून देखील वापरले जाते. तसेच शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी हे आधार कार्ड अत्यंत महत्त्वाचे असते. त्यासाठी तुमच्या आधार कार्डसोबत लिंक असलेला मोबाईल नंबर सोबत असणे अत्यंत महत्त्वाचे असते. हल्ली विविध मोबाईल कंपन्यांच्या ऑफर्स असतात त्यामुळे अनेकजण  सिमकार्ड स्वस्तात खरेदी करतात आणि जुना नंबर विसरुन जातात. किंवा बरेचदा एक व्यक्ती दोन ते तीन नंबर एकाचवेळी वापरत असते. त्यामुळे आधार कार्ड सोबत कोणता नंबर लिंक केलेला आहे हे त्यांना कळतच नाहीत. किंवा ते विसरुन गेलेले असतात. मग अशा वेळी काय करायचे ते आम्ही या लेखात पुढे सांगत आहोत. लेख पूर्ण वाचा आणि तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळवा. Aadhar Card Mobile Number Linked

आधार कार्डशी कोणता मोबाईल नंबर लिंक आहे ते जाणून घ्या

तुमच्या आधारकार्डला कोणता नंबर लिंक आहे हे जाणून घेण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला आधार कार्डशी संबंधित शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.

  • https://uidai.gov.in/ या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्ही आधार कार्डच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊ शकता.
  • वेबसाईटच्या मुख्य पानावर तुम्हाला तुमची भाषा निवडावी लागेल
  • यानंतर तुम्हाला आधार अद्यावत करा, आधार सेवा असे विविध पर्याय दिसतील
  • त्यातील ‘आधार मिळव’ या पर्यायावर क्लिक करा.
  •  तुम्हाला तुमच्या आधार कार्डचा 12 अंकी क्रमांक टाकावा लागेल.
  • आता तुम्हाला आधारशी लिंक केलेला मोबाईल नंबर टाकावा लागेल.
  • यानंतर कॅप्चा भरुन सबमिट करावा लागेल
  • तुम्ही प्रविष्ट केलेला नंबर लिंक केला असेल तर तुम्हाला कळवले जाईल.
  • किंवा तुम्ही टाईप केलेला मोबाईल नंबर लिंक नसल्यास तुम्हाला स्क्रिनवर तसे दिसेल.
  • अशा प्रकारे तुम्ही तुमचा कोणता मोबाईल नंबर आधारशी लिंक आहे हे तपासू शकाल. Aadhar Card Mobile Number Linked

आधार कार्डचे फायदे

  • आधार कार्डवरील 12 अंकी नंबर हा  भारतातील प्रत्येक व्यक्तीची ओळख आहे.
  • आधार कार्डमुळे नागरिकांना  बँकिंग, मोबाईल फोन कनेक्शन आणि सरकारी आणि निमसरकारी सेवांच्या सुविधांसाठी अर्ज करणे सोपे होते.
  • आधार कार्डच्या मदतीने नागरिकांना विविध शासकीय निमशासकीय सेवा आणि योजनांचा लाभ घेता येतो.
  • आधार कार्डच्या मदतीने नागरिकांना आरोग्यसेवांचा लाभ घेता येतो.
  • आधार कार्ड हे ओळखपत्र म्हणून वापरात आणता येत असल्याने त्याचा बँकींग सेवा सुविधांचा लाभ घेण्यासाठी तसेच बँकेत अकाऊंट ओपन करण्यासाठी देखील वापर केला जातो.
  • भारतातली 30 टक्क्याहून जास्त नागरिक इनकम टॅक्स रिटर्न फाईल करतात तेव्हा पॅन कार्ड आधार कार्डसोबत लिंक असणे देखील तिककेच महत्त्वाचे असते. यावेळी इनकम टॅक्स रिटर्न फाईल करताना आधार कार्डला लिकं असलेल्या मोबाईलवर OTP येतो. ही प्रोसेस अत्यंत महत्त्वाची असते त्याशिवाय आयटी रिटर्न फाईल करताच येत नाही. Aadhar Card Mobile Number Linked