
Air India Express Offer 2025: आजच्या काळात स्वस्तात विमान प्रवास करणे म्हणजे जणू काही एक दिवा स्वप्नच झालं आहे. पण आता हे स्वप्न सत्यात उतरणार आहे. हो, एअर इंडिया एक्सप्रेसने प्रवाशांसाठी एक भन्नाट ऑफर जाहीर केली आहे. या नुसार ‘Pay Day Sale’ या विशेष ऑफर अंतर्गत, देशांतर्गत प्रवासासाठी फक्त ₹1200 पासून आणि आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी ₹3724 पासून तिकीट बुक करण्याची सुवर्णसंधी सर्व प्रवाशांना मिळणार आहे. ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी असल्याने ज्यांना विमान प्रवासाची इच्छा आहे त्यांनी ही संधी अजिबात सोडू नये.
बुकिंग आणि प्रवासाचा कालावधी
या ऑफर (Cheapest Flight Tickets) अंतर्गत बुकिंग 28 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर 2025 या कालावधीत करता येणार आहे. सोबतच प्रवासाची वैधता ही 12 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर 2025 अशी निश्चित करण्यात आली आहे. म्हणजेच, जर तुम्ही दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये किंवा नोव्हेंबर महिन्यात कुठे फिरायला जाण्याची योजना आखत असाल तर ही ऑफर तुमच्यासाठी एक उत्तम संधी ठरणार आहे.
फॅबडील्समधे मिळणाऱ्या विशेष सुविधा
एअर इंडिया एक्सप्रेसने या ऑफरसोबतच प्रवाशांना काही विशेष सुविधा देखील उपलब्ध करून दिल्या आहेत. यामध्ये,
- हॉट मील्स: प्रवासादरम्यान चविष्ट जेवणाचा आनंद सुद्धा तुम्हाला घेता येणार आहे.
- सीट सिलेक्शन: आपल्या पसंतीनुसार जागा निवडण्याची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे.
- एक्सेस बॅगेज ऑफर: अतिरिक्त सामानासाठी सवलतीचे दर ठेवले गेले आहेत.
- प्रायोरिटी सर्व्हिसेस (Express Ahead): जलद चेक-इन आणि इतर सोयी सुद्धा यामध्ये देण्यात आल्या आहेत.
या सुविधा प्रवासाला केवळ स्वस्त नाही तर अधिक सुखद आणि सोयीस्कर बनवणार आहेत.
ऑफर कोडचा वापर
या सेलमध्ये सहभागी होण्यासाठी प्रवाशांना “FLYAIX” हा ऑफर कोड वापरावा लागणार आहे. ही ऑफर एअर इंडिया एक्सप्रेसच्या अधिकृत वेबसाइट आणि मोबाईल ॲपवर (Flight Ticket Booking Online) उपलब्ध आहे. विशेष म्हणजे, मोबाईल ॲपवरून बुकिंग केल्यास कन्वीनियन्स फी माफ करण्यात आली आहे. म्हणजेच, प्रवाशांना अजूनही अतिरिक्त बचत करण्याची संधी मिळणार आहे.
दरांची रचना
देशांतर्गत उड्डाणांसाठी दर
- Express Lite: ₹1200 (चेक-इन बॅगेज समाविष्ट नाही)
- Express Value: ₹1300 पासून (बॅगेजसह)
आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी दर
- Express Lite: ₹3724 पासून
- Express Value: ₹4674 पासून
बॅगेजसाठीही सवलतीचे दर ठेवण्यात आले आहेत. देशांतर्गत उड्डाणांसाठी 15 किलो बॅगेजसाठी फक्त ₹1500, तर आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी 20 किलो बॅगेजसाठी ₹2500 आकारले जातील.
या ऑफरचे फायदे काय?
- या ऑफरमुळे स्वस्त प्रवास होतो आणि प्रत्येक ट्रिपवर हजारो रुपयांची बचतही होते.
- यासोबतच कमी खर्चात विमान प्रवास करणं शक्य होणार आहे.
- ऑनलाइन बुकिंगची सोय उपलब्ध असल्याने घरबसल्या मोबाईलवर बुकिंग करता येणार आहे.
- अतिरिक्त सुविधा जसे की जेवण, बॅगेज, सीट सिलेक्शनवर देखील ऑफर उपलब्ध आहेत.
- तसेच ॲप बुकिंगवर कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही.