Airtel Personal Loan: घरबसल्या एअरटेलकडून मिळवा पर्सनल लोन, ही आहे संपूर्ण अर्ज प्रक्रिया?

आर्थिक अडचण कधी येईल काही सांगता येत नाही. वैद्यकीय असो किंवा शैक्षणिक कारण असो आपल्याला पैसा उभा करण्यासाठी तत्काळ कोणी मदत करीत असेल तर त्यावेळी आपले काम झटपट होते. म्हणूनच Airtel कंपनी देत आहे झटपट पर्सनल लोन. चला तर मग हे लोन मिळविण्याची प्रक्रिया आणि एअरटेल देत असलेल्या पर्सनल लोनची वैशिष्ट्ये या लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊ. Airtel Personal Loan

Airtel Personal Loan मिळविण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

  • पॅन कार्ड, आधार कार्ड, रेशनकार्ड
  • रहिवासाचा पुरावा
  • अर्ज करणार व्यक्ती नोकरी करीत असेल तर मागील 3 महिन्यांची पेमेंट स्लिप
  • अर्ज करणारी व्यक्ती व्यवसायिक असेल तर ITR प्रमाणपत्र

Airtel कंपनीकडून वैयक्तिक कर्ज मिळविण्यासाठीची पात्रता

Airtel कंपनीकडून वैयक्तिक कर्ज मिळविण्यासाठी अर्जदाराला पात्रता निकष पूर्ण करणे आवश्यक असते. ते नक्की कोणते पात्रता निकष आहेत ते पुढे जाणून घेऊ. Airtel Personal Loan

  • अर्जदार भारताचा नागरिक असावा
  • अर्जदाराचे व्य 21 वर्षे पूर्ण असावे.
  • अर्जदाराचे मासिक उत्पन्न किमान 25,000/- असावे.
  • अर्जदाराचा सिबिल स्कोअर 750 ते 900 असणे आवश्यक आहे.
  • एअरटेल वैयक्तिक कर्ज मिळविण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
  • पॅन कार्ड, आधार कार्ड, रेशनकार्ड
  • अर्जदार व्यवसायिकाने मागील तीन वर्षाचे ITR प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असते.

असा करा अर्ज Airtel Personal Loan मिळविण्यासाठी

तुम्हाला Airtel Personal Loan मिळवायचे असल्यास पुढील प्रक्रिये नुसार अर्ज करा.

  • https://play.google.com/store/apps/details?id=com.myairtelapp या लिंकवर क्लिक करुन एअरटेल थँक्स ॲप डाऊनलोड करा.
  • डाउनलोड केलेले ॲप  ओपन करा. आता तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर त्या ॲप मध्ये टाकावा लागेल आणि OTP व्हॅलिडेशन करावे लागेल.
  • यानंतर त्याचा डॅशबोर्ड तुमच्या समोर येईल.
  • त्यानंतर तुम्हाला You Are This Close To Your Money ची इमेज दिसेल त्यावर क्लिक करा.
  • त्यानंतर खाली दिलेल्या Avail Up To ₹ 5 Lakh येथे दिलेल्या Apply Now बटणावर क्लिक करा.
  • लगेचच तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल
  • आता तुम्हाला येथे तळाशी यावे लागेल जिथे तुम्हाला Proceed चा पर्याय मिळेल ज्यावर तुम्हाला क्लिक करावे लागेलआता तुम्हाला हा अर्ज काळजीपूर्वक भरावा लागेल,
  • तुमची कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा.
  • यानंतर तुम्हाला E KYC पूर्ण करून सबमिट पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  • त्यानंतर तुमच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाईल आणि तुम्हाला अधिकाऱ्यांकडून  कर्जासंबंधीत पुढील कारवाईसाठी फोन केला जाईल.

Airtel कंपनीकडून वैयक्तिक कर्जावर किती व्याजदर आकारला जातो

एअरटेल कंपनीकडून देण्यात येणाऱ्या वैयक्तिक कर्जावर लावण्यात येणार व्याजदर हा 11.5% पासून पुढे सुरु होतो.

Airtel कंपनीकडून मिळणाऱ्या वैयक्तिक कर्जाचा कालावधी

एअरटेल कंपनी देत असलेल्या वैयक्तिक कर्जाच्या परतफेडीचा कालावधी हा 12 ते 60 महिन्यांपर्यंतचा असतो. वैयक्तिक कर्ज मंजूर झाल्यानंतर ग्राहक कर्जाची परतफेड EMI च्या माध्यमातून किंवा एकरकमी देखील करु शकतात परंतु अर्जात नमूद केल्या प्रमाणे 12 ते 60 महिन्यांत हे पैसे व्याजासह कंपनीला परत करणे आवश्यक असते. तसे न केल्यास कर्जाच्या रकमेवर जास्तीचे व्याज चढते. Airtel Personal Loan

Airtel कंपनीकडून मिळणाऱ्या वैयक्तिक कर्जाचे फायदे

  • एखाद्या आर्थिक संकटात आपण झटपट लोन मिळविण्यासाठी Airtel कंपनी ही विश्वसनीय कंपनी आहे.
  • या कंपनीच्या Airtel Thanks App च्या मदतीने ऑनलाईन पद्धतीने घरबसल्या देखील अर्ज करुन कर्ज मिळविता येते.
  • त्यासाठी Airtel च्या कोणत्याही कंनीच्या कार्यालयात जाण्याची गरज नसते.
  • अर्जदार ग्राहकांना Airtel कंपनीकडून झटपट कर्ज उपलब्ध करुन दिले जाते.
  • अर्जाची पडताळणी केल्यानंतर 24 तासांच्या आत कर्ज वितरीत केले जाते.
  • कर्जमिळविण्यापासून ते वितरीत करण्यापरंय्त 100% संपूर्ण डिजिटल प्रक्रिया

या कारणांसाठी मिळवा वैयक्तिक कर्ज

Airtel कंपनीकडून तुम्ही पुढील विविध कारणांसाठी वैयक्तिक कर्जाची मागणी करु शकता. अर्जदाराची कागदपत्रे योग्य असतील आणि पात्रतेच्या निकषांमध्ये अर्जदार बसत असेल तर फक्त 24 तासांच्या आत Airtel कंपनीकडून वैयक्तिक कर्ज मजूर केले जाते.

  • अचानक आलेले वैद्यकीय खर्च भागवण्यासाठी
  • घर दुरुस्ती करण्यासाठी
  • लग्नाचा खर्च करण्यासाठी
  • वाहनांची खरेदी करण्यासाठी
  • सुट्टीमध्ये परदेशी टूर करण्यासाठी
  • उच्च शिक्षणासाठीचे खर्च