Anukampa Bharti 2025 Latest News: 5 वर्षांपासून वाट पाहणाऱ्या 10,000 कुटुंबांना दिलासा! अनुकंपावर आता थेट जिल्हाधिकाऱ्यांकडून नियुक्ती!

Anukampa Bharti 2025 Latest News: अनुकंपावर नोकरी मिळेल का? किती वाट पाहावी लागेल? या प्रश्नांनी अनेक कुटुंबं गेली कित्येक वर्षं त्रासलेली होती. पण अखेर त्या सर्वांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम देणारा मोठा निर्णय राज्य सरकार द्वारे घेण्यात आला आहे. आता तब्बल 10,000 हून अधिक अनुकंपावरील पदांवर सप्टेंबरपासून भरती सुरू होणार असून या प्रक्रियेसाठी असणारे सर्वाधिकार जिल्हाधिकाऱ्यांकडे (Maharashtra Compassionate Appointment 2025) सोपवण्यात आले आहेत.

काय आहे अनुकंपा तत्वावर नोकरी देण्यामागचं धोरण?

अनुकंपा तत्वावरील नोकरी म्हणजे शासन किंवा निमशासकीय संस्थेमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सेवेत असताना मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबातील एका सदस्याला ही नोकरी देण्यात येते. ही संधी मुख्यतः गट ‘क’ आणि ‘ड’ श्रेणीतील पदांसाठी (Group D Group C Recruitment News) लागू असते. 1976 पासून हा नियम लागू केला गेलेला आहे. पण प्रशासनातील प्रक्रियेत असणाऱ्या बऱ्याच अडथळ्यांमुळे ही नोकरी मिळायला अनेक वर्षे वाट बघावी लागते. त्यातच कोविड, तांत्रिक अडथळे व नियमातील गुंतागुंती यामुळे गेले काही वर्ष हजारो अर्ज रखडले गेले होते. गेल्या पाच वर्षांपासून ही प्रक्रिया थांबलेली होती. परिणामी, जवळपास 9,658 उमेदवार प्रत्यक्ष नोकरीच्या प्रतीक्षेत होते. मात्र आता या सर्वांची एकाचवेळी नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

जिल्हानिहाय प्रतिक्षा यादी

  • नांदेड: सर्वाधिक 506 उमेदवार
  • पुणे: 348
  • गडचिरोली: 322
  • नागपूर: 320

या यादीत राज्य सरकारी कार्यालयातील 5228 जागा, महापालिका/नगरपालिकांमधील 725 आणि जिल्हा परिषदांतील 3705 जागांचा समावेश आहे.

अनुकंपा नियोजनात मोठे बदल

  • सप्टेंबर १५ पासून नियुक्ती प्रक्रिया सुरू: राज्य सरकारने या तारखेपासून जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून प्रत्यक्ष भरती सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.
  • अर्जाची मुदत आता तीन वर्षे: याआधी फक्त मृत्यूनंतर एक वर्षात अर्ज करणं अनिवार्य होतं, मात्र उमेदवारांना आता तीन वर्षांपर्यंत अर्ज करता येणार.
  • ४५ वर्षांनंतरही नोकरी मिळण्याची संधी: या आधी जर उमेदवार ४५ वर्षांच्या आत असेल तरच त्याला ही नोकरी मिळत होती, अन्यथा त्याचे नाव यादीतून काढून टाकले जायचे. मात्र आता जरी उमेदवारास ४५ वर्षापर्यंत ही नोकरी मिळाली नाही, तर कुटुंबातील दुसऱ्या पात्र सदस्याला ही संधी दिली जाणार आहे.
  • नाव बदलता येणार: पूर्वी अर्ज सादर केल्यानंतर नावे बदलता येत नव्हती, आता घरातील दुसऱ्या पात्र सदस्याचे नाव बदलून अर्ज करता येणार आहे.
  • विलंब माफ करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांकडे: म्हणजेच जर कोणत्या कुटुंबाला या योजनेची माहिती नसेल आणि त्यांनी तीन वर्षात अर्ज नाही केला तरीही त्या कुटुंबाला अजून दोन वर्षांपर्यंत अर्ज करता येऊ शकतो. याआधी मुख्य सचिवांच्या समितीकडे असलेला हा अधिकार, आता जिल्हाधिकाऱ्यांकडे दिला जाणार आहे.
  • गट ‘क’ उमेदवार, गट ‘ड’ साठी अर्ज करू शकणार: पूर्वी ड गटात जागा नसल्यामुळे 2,456 उमेदवार वाट पाहत होते. आता त्यांना सुद्धा नोकरी मिळणार आहे.

अर्ज करताना या गोष्टी लक्षात ठेवा

  • प्रमाणपत्रे अपूर्ण असतील, तरी तुमचा अर्ज नाकारला जाणार नाही, आता जिल्हाधिकारी स्तरावर योग्य सल्ला व मार्गदर्शन दिलं जाईल.
  • वर सांगितल्याप्रमाणे कुटुंबाला या योजनेबाबत माहिती नसेल, तरी अर्जाची मुदत वाढवली जाईल
  • नवीन अर्ज सिस्टिम (Anukampa Niyukti Process Start Date 2025) आता जिल्हा स्तरावर सुलभ करण्यात आली आहे.

प्रतीक्षेत असलेल्या हजारो कुटुंबांना हळूहळू दिलासा

हा निर्णय म्हणजे केवळ नोकरी नव्हे, तर त्या कुटुंबाच्या भविष्याला दिलेली दिशा आहे. अनेक कुटुंबांना या नोकऱ्यांच्या माध्यमातून पुन्हा उभारी मिळणार आहे. जिल्हाधिकारी या अधिकारांचा योग्य तो वापर करून (10,000 Compassionate Jobs Maharashtra) आपल्या जिल्ह्यात सरळ आणि पारदर्शक पद्धतीने ही प्रक्रिया राबवतील, अशी अपेक्षा आहे.