Bank of Maharashtra personal loan: बँक ऑफ महाराष्ट्र देत आहे 20 लाखाचे पर्सनल लोन; कर्जाचा कालावधी जाणून घ्या!

Bank of Maharashtra personal loan

Bank of Maharashtra personal loan बँक ऑफ महाराष्ट्र ही स्वतंत्र्य रित्या महाराष्ट्रातील नागरिकांसाठी काम करणारी बँक आहे. महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना आर्थिक व्यावहार उत्तम रहावे आणि व्यवसायिकांना वेळोवेळी आर्थिक योजनांचा लाभ व्हावा या हेतूने या बँकींग संस्थेची स्थापना झाली. आर्थिक व्यवहारांचे डिजिटलायझेशन आणि ई बँकिंग सोबत या बँकने ग्राहकांना अनेक सुविधा पुरविल्या आहेत. ग्राहकांच्या आर्थिक गरजांचा विचार करुन ही बँक अर्जदाराच्या निव्वळ मासिक उत्पन्नाच्या 20 पट कर्ज रक्कम म्हणजेच 20,00,000 रु. पर्यंत वैयक्तिक कर्ज देत आहे, चला तर मग हे पर्सनल लोन कसे मिळवायचे याबद्दल अधिक माहिती मिळवूया या लेखाच्या माध्यमातून.

वैयक्तिक कर्जाचे प्रकार

बँक ऑफ महाराष्ट्र येथून वैयक्तिक कर्ज मिळविण्याचे तीन प्रकार आहेत.

  1. पगारदार ग्राहकांसाठी महाराष्ट्र बँक पर्सनल लोन
  2. प्रोफेशनल्स ग्राहकांसाठी महाराष्ट्र बँक पर्सनल लोन
  3. बिझनेस क्लास ग्राहकांसाठी महाराष्ट्र बँक पर्सनल लोन

वैयक्तिक कर्जाचे प्रक्रिया शुल्क

बँक ऑफ महाराष्ट्र ग्राहकाला दिलेल्या कर्जावर  1.00% + GST इतके प्रक्रिया शुल्क आकारते.  

कर्ज परतफेडीचा कालावधी किती असतो

कर्ड परतफेडीचा कालावधी पगारदारांना 7 वर्षांचा आणि इतरांसाठी हा कालावधी 5 वर्षांचा असतो. Bank of Maharashtra personal loan

अर्जदाराचे किमान वार्षिक उत्पन्न किती हवे?

बँक ऑफ महाराष्ट्रकडे वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे किमान वार्षिक उत्पन्न हे 3 लाख रुपये इतके असावे. तरच 20 लाखापर्यंत कर्ज मिळवता येते. Bank of Maharashtra personal loan

वैयक्तिक कर्जासाठी लागणारे जामीनदार Bank of Maharashtra personal loan

कोणत्याही बँकेतून किंवा वित्तीय संस्थेमधून वैयक्तिक कर्ज मिळविताना अर्जदाराला स्वतःसोबत किमान दोन जामीनदार ठेवावे लागतात. या जामीन दारांच्या सही शिवाय वैयक्तिक कर्ज पास केले जात नाही. परंतु बँक ऑफ महाराष्ट्र येथे  जामीनदार देखील पुरेसा असतो.

वैयक्तिक कर्ज मिळविण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

बँक ऑफ महाराष्ट्र येथून वैयक्तिक कर्ज मंजूर करुन घेण्यासाठी पुढील कागदपत्रे आवश्यक आहेत.

  • ओळखीचा पुरावा – पॅनकार्ड, आधारकार्ड, मतदानकार्ड, वाहन परवाना, पासपोर्ट (कोणतेही एक)
  • निवासाचा पुरावा – विज बिल, मतदार कार्ड, आधार कार्ड, पासपोर्ट
  • पगारदार व्यक्तींनी जमा करावयाचे कागद – मागील तीन महिन्यांची पेमेंट स्लीप, मागील तीन वर्षांचे आयटी रिटर्न कागदपत्रे, बँकेच्या खात्याचे मागील 6 महिन्यांचे स्टेटमेंट
  • व्यवसायिक व्यक्तींनी जमा करावयाचे कागद – मागील तीन वर्षांचे व्यवसायाचे आणि व्यक्तिगत आयटी रिटर्न कागदपत्रं, शॉप ऍक्ट प्रमाणपत्र, कर नोंदणी प्रमाणपत्र, मागिल एक वर्षांचे बँक स्टेटमेंट. Bank of Maharashtra personal loan

वैयक्तिक कर्जाचा व्यजदर किती आहे?

बँक ऑफ महाराष्ट्र येथून कर्ज घेतल्यानंतर बँकेला कर्जाचे व्याज देखील द्यावे लागते. व्याजाचा आकडा बदलत असतो परंतू आम्ही तुमच्यासाठी बँकेच्या अधिकृत वेबसाईटवरील माहिती घेऊन आलो आहोत ती म्हणजे. वैयक्तिक कर्जासाठी व्याजाचा दर 10.00% वार्षिक इतका आहे. Bank of Maharashtra personal loan

वैयक्तिक कर्जासाठी अर्ज कुठे करायचा?

तुम्हाला बँक ऑफ महाराष्ट्र येथून वैयक्तिक कर्जा मिळवायचे असेल तर तुम्ही https://bankofmaharashtra.in/mar/personal-banking/loans/personal-loan या लिंकवर डाऊन अर्ज करु शकता.

बँक ऑफ महाराष्ट्रच्या वैयक्तिक कर्जाचे फायदे

बँक ऑफ महाराष्ट्र येथून वैयक्तिक कर्ज घेण्याचे अनेक फायदे आहेत. हे फायदे पुढील प्रमाणे. Bank of Maharashtra personal loan

  • कमी मासिक हप्ता
  • कर्जाची अधिक रक्कम
  • आपल्या कर्जरमेचा पाठपुरावा
  • कर्ज मिळविण्याची अत्यंत सोपी पद्धत
  • कमीत कमी कागदपत्रांमध्ये कर्ज
  • सर्वात कमी प्रक्रिया शुल्क
  • कोणतेही छुपे शुल्क आकारले जात नाही
  • आगाऊ परतफेडीवर दंड नाही