
Bank of Maharashtra Recruitment 2025: सरकारी नोकरीची स्वप्नं पाहणाऱ्या उमेदवारांसाठी बँक ऑफ महाराष्ट्रकडून एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. बँक ऑफ महाराष्ट्रने अधिकृतरित्या 350 जनरलिस्ट ऑफिसर (Bank of Maharashtra Generalist Officer Vacancy) पदांसाठी भरती जाहीर केली आहे. स्केल II ते स्केल VI या विविध स्तरांवर ही भरती करण्यात येणार असून, इच्छुक उमेदवारांसाठी ही करिअर घडवण्याची एक विशेष अनमोल संधी ठरू शकणार आहे.
या भरती प्रक्रियेअंतर्गत अर्ज प्रक्रिया ही 10 सप्टेंबर 2025 पासून सुरू करण्यात आली असून, उमेदवारांना 30 सप्टेंबर 2025 पर्यंत अर्ज सादर करण्याची संधी देण्यात आली आहे. सर्व उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी bankofmaharashtra.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन भेट द्यावी.
पात्रता काय आहे?
या भरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा तांत्रिक/वैज्ञानिक क्षेत्रातील उच्च पदवी असणे हे या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी आवश्यक असणार आहे. विशेषतः BE, B.Tech, M.Sc, MCA किंवा तत्सम पदवी धारक उमेदवारांना (Bank of Maharashtra Eligibility & Age Limit) या भरतीसाठी प्राधान्य दिले जाणार आहे.
- किमान वय: 25 वर्षे
- कमाल वय: 50 वर्षे ( तसेच सरकारी नियमांनुसार राखीव प्रवर्गांसाठी वयोमर्यादेत सूट सुद्धा दिली जाणार आहे.)
अर्ज कसा कराल? | Bank of Maharashtra Online Application 2025
- सर्वप्रथम उमेदवारांनी बँक ऑफ महाराष्ट्रच्या अधिकृत वेबसाइटला (bankofmaharashtra.in) भेट द्यावी.
- त्यानंतर “New Registration” या पर्यायावर क्लिक करा आणि तुमची नोंदणी प्रक्रिया सुरू करा.
- रजिस्ट्रेशन करताना तुमचं नाव, मोबाईल नंबर, ईमेल आयडी अशी सगळी माहिती भरल्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन पूर्ण होईल.
- सोबतच उमेदवारांनी त्यांचा फोटो आणि सही स्कॅन करून अपलोड करणे आवश्यक आहे.
- त्यानंतर उमेदवारांनी निश्चित अर्ज फी भरल्यानंतर फॉर्म सबमिट करावा.
- शेवटी, अर्जाची प्रिंट काढून स्वतःजवळ सुरक्षित ठेवावी.
अर्ज फी:
- OBC/EWS उमेदवार: ₹1180
- SC/ST उमेदवार: ₹118
- अर्ज फी भरताना Debit Card / Credit Card / Net Banking वापरता येईल.
निवड प्रक्रिया कशी होणार?
या भरतीमध्ये उमेदवारांची निवड ही दोन टप्प्यांत केली जाणार आहे:
- लेखी परीक्षा (Online Exam)
- मुलाखत (Interview)
लेखी परीक्षेत यश मिळवणाऱ्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. त्यानंतर परीक्षा आणि मुलाखतीतील गुणांच्या आधारे अंतिम गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल.
पगार किती मिळेल?
या भरतीत निवड होणाऱ्या उमेदवारांना आकर्षक पगार देण्यात येणार आहे. स्केलनुसार पगार हा (Bank of Maharashtra Salary Structure) पुढीलप्रमाणे असणार आहे:
- Scale VI: ₹1,40,500 ते ₹1,56,500 प्रतिमहिना
- Scale V: ₹1,20,940 ते ₹1,35,020 प्रतिमहिना
- Scale IV: ₹1,02,300 ते ₹1,20,930 प्रतिमहिना
- Scale III: ₹85,920 ते ₹1,05,280 प्रतिमहिना
- Scale II: ₹64,820 ते ₹93,960 प्रतिमहिना
याशिवाय, महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि इतर शासकीय सुविधांचा लाभही उमेदवारांना मिळणार आहे.
महत्वाच्या तारखा
- अर्ज सुरू होण्याची तारीख: 10 सप्टेंबर 2025
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 सप्टेंबर 2025
खाली दिलेल्या लिंक वर या भरतीचे नोटिफिकेशन पहा:
(https://bankofmaharashtra.in/writereaddata/documentlibrary/34e5d288-8ca4-400f-b7af-60fe7a44d286.pdf)
अर्ज करण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात ठेवा:
अर्ज करण्यापूर्वी अधिकृत अधिसूचना नीट वाचणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच शैक्षणिक प्रमाणपत्रे, ओळखपत्र, फोटो, सही यासारखी कागदपत्रे आधीच तयार ठेवावीत. वेळेत अर्ज न केल्यास ही सुवर्णसंधी हातून जाऊ शकते.
लक्षात घ्या ही भरती केवळ नोकरीसाठी (Sarkari Bank Jobs 2025) नसून तर स्थिर भविष्य घडवण्यासाठी एक उत्तम संधी ठरू शिकणार आहे. ज्यांना बँकिंग क्षेत्रात करिअर करायचे आहे, त्यांनी ही संधी अजिबात वाया घालवू नये.