Bhu Nakasha Maharashtra फक्त २ मिनिटांत, गट क्रमांकासह तुमच्या गावाचा संपूर्ण नकाशा असेल तुमच्या हातात..!

Bhu Nakasha Maharashtra

Bhu Nakasha Maharashtra: जर तुम्हाला शेतीसाठी नवीन रस्ता बांधायचा असेल किंवा कोणत्याही जमिनीची हद्द जाणून घ्यायची असेल, तर त्यासाठी तुमच्याकडे संबंधित जमिनीचा नकाशा असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. परंतु जमिनीचा नकाशा मिळवण्यासाठी तुम्हाला मोजणी कार्यालय किंवा नगर सर्वेक्षण कार्यालयात सतत चकरा माराव्या लागतील. मात्र, आता सरकारने सातबारा आणि 8-अ उताऱ्या सोबतच जमिनीचा/जागेचा नकाशा देखील ऑनलाइन उपलब्ध करून दिला आहे, ज्यामुळे नागरिकांचा बराच वेळ आणि पैसा देखील यामधे वाचणार आहे. Bhu Nakasha Maharashtra

इतर गोष्टींसोबतच राज्यातील सरकारी यंत्रणेत देखील डिजिटलायझेशन झाले आहे, हे तुम्हाला माहीत असेलच. त्यामुळे शासकीय अर्ज भरण्यासाठी किंवा शासकीय कागदपत्रे घेण्यासाठी तासनतास रांगेत उभे राहण्याची गरज आता राहिलेली नाही. आता तर तुम्ही तुमच्या मोबाईल फोन किंवा होम कॉम्प्युटरच्या मदतीने तुमच्या शेताचा किंवा जमिनीचा नकाशाही पाहू शकता.

आता त्यासाठी ही सर्व प्रक्रिया ऑनलाइन (Bhu Nakasha Maharashtra) करावी लागणार आहे. ही प्रक्रिया अगदी सोपी आहे आणि त्यामुळे तुम्ही फक्त 2 मिनिटात मोबाईल किंवा कॉम्पुटर वर जमिनीचा नकाशा पाहू शकता. चला तर मग याबद्दल सविस्तर जाणून घेऊया…

तुम्ही जमिनीचा नकाशा कशासाठी वापरू शकता? | What can you use a land map for?
तुम्ही या ऑनलाइन पद्धतीने काढलेल्या जमिनीचा नकाशा फक्त माहितीच्या उद्देशाने वापरू शकता.

ऑनलाइन डाऊनलोड केल्या गेलेल्या जमिनीच्या नकाशामध्ये, जमीन मालकाचे नाव, त्या जमिनीचे क्षेत्रफळ आणि त्या ठिकाणची दिशा याविषयीची माहिती दिलेली असते.

जमिनीवर असणारी मालकी दाखवण्यासाठी आणि विशिष्ट हेतूसाठी प्रमाणित नकाशाची गरज असेल.

हा नकाशा बँकिंग उद्देशांसाठी वैध मानला जात नाही.

किसान क्रेडिट कार्ड किंवा इतर सरकारी योजनांशी लिंक होण्यासाठी तलाठी किंवा लेखपाल यांनी प्रमाणित केलेला जमिनीचा नकाशाच वैध मानला जातो.

जमिनीचा नकाशा ऑनलाइन कसा डाउनलोड करायचा? सगळ्यात आधी यासाठीच्या ऑफिशियल वेबसाइट https://bhlekh.mahahumi.gov.in/ वर जा आणि नंतर सगळ्यात वर असलेल्या तीन लाईन वर क्लिक करा.

तुम्ही अधिकृत पोर्टलवर जाताच तुम्हाला कॅटेगरी, जिल्हा, तालुका, गावाचे नाव अशी सर्व माहिती व्यवस्थित भरावी लागेल. त्यानंतर त्यात प्लॉट क्रमांक किंवा सर्वेक्षण गट क्रमांक टाका.

त्यानंतर स्क्रीन वर, तुम्हाला हवा असलेला प्लॉटफिल्ड नकाशा (भू नक्ष महाराष्ट्र) दिसेल,  त्या नकाशावर दर्शविलेल्या गट क्रमांकावर क्लिक करा आणि नंतर प्लॉट माहितीवर (इन्फो) क्लिक करा.

प्लॉट माहितीवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला गट क्रमांकावर आधारित जमिनीच्या मालकीची सर्व माहिती दिसेल. ते काळजीपूर्वक तपासा. त्यांनतर तुम्ही टाईप केलेली माहिती पूर्णपणे खरी असल्याचे सुनिश्चित करा आणि मगच पुढील प्रक्रियेकडे जा. यानंतर तुम्हाला मॅप रिपोर्टवर क्लिक करायचे आहे. Bhu Nakasha Maharashtra

जमिनीच्या मालकीची संपूर्ण पडताळणी करून मग तुम्हाला नकाशा अहवालावर क्लिक करायचे आहे, त्यांनतर तुम्हाला गट क्रमांकावर आधारित नकाशा दिसेल. आता पुढील प्रोसेस सुरू करा. मग तुम्ही तुमच्या जमिनीचा नकाशा डाउनलोड करू शकता.

आता तुम्ही ग्रुप नंबरसह जमिनीचा मॅप डाउनलोड करू शकता. या संपूर्ण प्रोसेस चा वापर करून तुम्ही महाराष्ट्रा (भू नक्ष महाराष्ट्र) राज्यातील सर्व जिल्ह्यांचे भू नकाशा ऑनलाइन तपासू शकता किंवा डाउनलोड करू शकता.

ई-मॅप प्रकल्प म्हणजे काय? | What is e-map project?

भूमी अभिलेख विभागाच्या, तालुका स्तरावरील कार्यालयामधे विविध प्रकारचे नकाशे आहेत. त्या नकाशांद्वारे जमिनीच्या/ ठिकाणाच्या सीमा आणि मर्यादा निश्चित करण्याचे निर्णय घेतले जातात. आणि म्हणूनच हे नकाशे अत्यंत महत्त्वाचे आहेत. असे असले तरीही, हे सर्व नकाशे 1880 पासूनचे आहेत, आणि यासाठी सरकारने ते डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून देण्यासाठी म्हणून ‘ई-मॅप’ नावाचा प्रकल्प सुरू केला आहे. सोबतच या प्रकल्पाअंतर्गत भू-उप अधीक्षक भू-विभागाचे/भूसंपादनाचे तालुका स्तरावरील अभिलेख कार्यालयातील सर्व नकाशे ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या प्रकल्पामुळे डिजिटल ७/१२, ‘आठ-अ’ तसेच डिजिटल नकाशे देखील ऑनलाइन पाहता येणार आहेत. Bhu Nakasha Maharashtra07:15 PM