blue aadhar card in Marathi: लहान मुलांसाठी निळे आधार कार्ड कसे काढायचे, पहा संपूर्ण माहिती

Blue Aadhar Card

Blue Aadhar Card : आपल्या भारत देशात आधार कार्ड हे एक  अत्यंत महत्त्वाचे ओळखपत्र आहे.  आपण भारताचे नागरिक  सरकारी तसेच गैर-सरकारी कारणांसाठी अनेक ठिकाणी आयडी प्रूफ म्हणून या आधारकार्डचा वापर करीत असतो.  आता 5 वर्षांखालील मुलांसाठी देखील आधार कार्ड बनवले जात आहे, त्याला ब्लू आधार कार्ड असे म्हटले जाते.  हे ब्लू आधार कार्ड म्हणजे त्या लहान नवजात बालकाची ओळख असेल. चला तर मग सविस्तकर माहिती जाणून घेऊया या ब्लू आधार कार्ड संदर्भातील. जेणेकरुन ज्यांच्या घरात 5 वर्षांपेक्षा कमी वयाची मुले आहेत त्यांना हे ओळखपत्रं काढताना सोपे होईल. तुमच्या देखील नात्यात कोणाच्या घरी नवजात बालक किंवा 5 वर्षाखालील मुल असेल तर तुम्ही ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवा.  Blue Aadhar Card

काय आहे  Blue Aadhar Card.

भारत देशातील 5 वर्षांखालील मुलांसाठी खास  ब्लू आधार कार्ड बनववण्यात येते. या Blue Aadhar Card ला  बाल आधार कार्ड असेही म्हटले जाते. त्यासाठी लहान बाळाच्या पालकांनी  युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) च्या वेबासाईटवर नोंदणी आणि अर्ज करणे आवश्यक असते. किंवा आपल्या जवळील UIDAI सेंटरला भेट द्या.   या आधार कार्डची अर्ज प्रक्रिया अत्यंत सोपी केली आहे. याआधी लहान मुलांसाठीचे हे आधार कार्ड बनवण्यासाठी जन्माचा दाखला आवश्यक असे परंतु आता जन्म प्रमाणपत्र नसल्यास देखील लहान मुलांचे  ब्लू आधार कार्ड बनवता येणार आहे. इतकेच काय तर  तुम्ही घरी बसूनही ऑनलाईन पद्धतीने  या आधार कार्डसाठी अर्ज करू शकता. blue aadhar card in Marathi

पालकांनो असा करा तुमच्या मुलाच्या ब्लू आधार कार्डसाठी ऑनलाईन अर्ज

  • सर्वप्रथम UIDAI च्या www.UIDAI.gov.in या अधिकृत पोर्टलवर जा.
  • त्यानंतर एक नवीन विंडो उघडेल.
  • तुमच्या मुलाची संपुर्ण माहिती जसे की मुलाचे नाव, मोबाईल नंबर, ईमेल आयडी भरा.
  • भरलेली माहिती एकदा तपासून फॉर्म सबमिट करा.
  • यानंतर तुम्हाला UIDAI केंद्रात जाऊन एकदा तुमच्या मुलाच्या ब्लू आधार कार्डबद्दल चौकशी करा, कार्ड आले असेल तर घेऊन या.

ब्लू आधारकार्डसाठी कोणत्याही बायोमेट्रिक डेटाची आवश्यक नाही! :

प्रौढांचे आधार कार्ड बनवताना बायोमॅट्रिक डेटा गोळा केला जातो. हि वैयक्तिक माहिती त्या त्या आधारकार्डसोबत असते. परंतु लहानमुलांसाठीचे ब्लू आधारकार्ड बनवताना तशी बायोमॅट्रिक माहिती गोळा करण्याची गरज भासत नाही. UID सोबत जोडलेल्या  पालकांचे छायाचित्र पुरेसे असते ब्लू आधारकार्ड मिळविण्यासाठी.  मूल 5 वर्षांचे झाल्यानंतर  बोटांसाठी बायोमेट्रिक डेटा अपडेट करणे तसेच डोळे स्कॅन करुन लाईव छायाचित्रे देणे आवश्यक असते. इतकेच नाही तर  बायोमेट्रिक डेटा अपडेट करणे हे किशोरवयीन आधार कार्डधारकांसाठी विनामूल्य आहे. blue aadhar card in Marathi

पालक  अशाप्रकारे ऑफलाईन पद्धतीने नवजात बालकाच्या आधारकार्डसाठी अर्ज करू शकतात! : Blue Aadhar Card

नवजात बालकाचे जन्म प्रमाणपत्र किंवा हॉस्पिटल डिस्चार्ज स्लिपचा वापर करून वैध नोंदणी दस्तऐवज म्हणून पालक नवजात बाळासाठीचे  बाल आधार कार्डसाठी अर्ज करू शकतात. याशिवाय मुल 3 वर्षाचे झाल्यानंतर ज्या नर्सरी मध्ये किंवा प्ले ग्रुपमध्ये जात असेल तेथील शाळेचा आयडी नावनोंदणीसाठी वापरला जाऊ शकतो. Apply Blue Aadhar Card

खालील क्रमांकावर मिळवा अधिक माहिती

ब्लू आधार कार्ड संबंधीत अधिका माहिती मिळविण्यासाठी तुम्ही UIDAI हेल्पलाइन क्रमांक 1947 वर UIDAI सोबत  संपर्क साधू शकता. तुम्ही या नंबरवर सोमवार ते शनिवार सकाळी 7.00 ते रात्री 11.00 या वेळेत कधीही  फोन करुन बोलू शकता. फक्त रविवारी सकाळी 8.00 ते सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत संपर्क साधू शकता.