CIDCO Job News: CIDCO मध्ये सरकारी नोकरीची मोठी संधी! हजारो जागा रिक्त, भरती लवकरच सुरू होणार

CIDCO Job News: आजच्या काळात सरकारी नोकरी करणे म्हणजे फक्त पगारच नाही, तर त्याद्वारे समाजात मिळणारा मान, भविष्यातील स्थैर्य, घरासाठी कर्ज, काही आरोग्य सुविधा, आणि निवृत्तीनंतरची सुरक्षितता, या सगळ्यांचा मिळून निर्माण होणारा मिळकतीचा एक परिपूर्ण स्रोतच झाली आहे. विशेष करून अशा नोकऱ्यांसाठी जिथे भरती ही सिडकोसारख्या प्रतिष्ठित संस्थेद्वारे जाहीर केली जाते, तेव्हा ती नोकरी मिळवण्यासाठी एक सुवर्णसंधीच ठरते. आणि आता हीच संधी उपलब्ध झाली असल्याचं बघायला मिळत आहे.

महाराष्ट्रातील निमशासकीय आणि एक अत्यंत महत्त्वाची संस्था म्हणजे सिडको (City and Industrial Development Corporation), ही संस्था गेल्या अनेक वर्षांपासून राज्याच्या शहरी विकासाचा कणा ठरली आहे. नवी मुंबई, पनवेल, औरंगाबादसारख्या शहरांच्या पायाभूत सुविधा उभारणं, नियोजनबद्ध वसाहती उभ्या करणं, आणि नागरिकांना स्वस्तात घरे उपलब्ध करून देणं, हे काम सिडको आतापर्यंत (CIDCO Homes) यशस्वीपणे करत आलं आहे.

सध्या परिस्थिती काय आहे?

सिडकोकडे सध्या एकूण मंजूर 2797 पदांपैकी तब्बल 1619 पदं रिक्त आहेत. म्हणजेच निम्म्याहून अधिक जागा अजूनही भरायच्या आहेत. ही गोष्ट लक्षात घेता, कामाचा अतिरिक्त भार हा सध्या असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांवर पडतोय आणि संस्थेच्या विकासाच्या गतीवर देखील त्याचा परिणाम होत आहे. हीच समस्या ओळखून, सिडकोने भरतीसाठीच्या हालचाली सुरू केल्या आहेत. नुकतीच 160 पदांसाठी (CIDCO recruitment 2025) ऑनलाईन परीक्षा पार पडली असून, यामध्ये सहायक विकास अधिकारी आणि अभियंता संवर्गातील 130 जागा प्रमुख आहेत. ही भरती प्रक्रिया यशस्वी पार पडल्याने आता उर्वरित रिक्त पदांसाठीही टप्प्याटप्प्याने भरती जाहीर केली जाणार आहे.

ही संधी कोणासाठी आहे?

सिडकोमध्ये विविध पदांसाठी भरती होत असते, जसे कि, अभियंता, स्थापत्य तज्ज्ञ, प्रशासनिक सहाय्यक, लेखापाल, कंत्राट अधिकारी, योजना सहायक, आणि लघुलेखक यांसारखी पदं ही सर्वसामान्य व शिक्षित तरुणांना अर्ज करण्यासाठी खुली असतात.

ज्यांनी नुकतीच पदवी (CIDCO jobs for graduates) घेतली आहे किंवा ज्या तरुणांना सरकारी नोकरीसाठी अर्ज करण्याची संधी हवी आहे, त्यांच्यासाठी ही वेळ आणि संधी दोन्ही अगदी योग्य आहे. तसेच, ज्यांना शहरी विकास, गृहयोजना आणि सार्वजनिक बांधकाम क्षेत्रात काम करायची इच्छा आहे, त्यांच्यासाठी सुद्धा सिडको द्वारे सुरु होणारी भरती ही एक आदर्श संस्था आहे.

कामाचा वाढता व्याप आणि भरतीची गरज

सिडकोने गेल्या काही वर्षांमध्ये अनेक मोठे प्रकल्प हाती घेतले आहेत. सिडकोचा जलसिंचन, मेट्रो, स्मार्ट सिटी, निवासी योजना प्रकल्प अशा विविध गोष्टींमध्ये मोठा सहभाग आपल्याला बघायला मिळतो. मात्र या सर्व योजनांची अंमलबजावणी करताना मनुष्यबळाची सततची कमतरता भासत होती. यामुळेच आता मोठ्या प्रमाणात भरती करण्याचा सिडकोचा हा निर्णय, केवळ उमेदवारांसाठीच नव्हे, तर महाराष्ट्राच्या विकासासाठीही एक मोठं पाऊल ठरणार आहे.

उमेदवारांनी काय करावं?

  • तुम्ही जर पदवीधर असाल आणि तुम्हाला सरकारी नोकरीसाठी एकदा प्रयत्न करून बघायचा असेल, तर ही संधी अजिबात सोडू नका.
  • सिडकोच्या अधिकृत वेबसाईटवर लक्ष ठेवा.
  • तुमची आवश्यक कागदपत्रं, शिक्षण प्रमाणपत्र, ओळखपत्र, पासपोर्ट फोटो इ., आधीच व्यवस्थित तयार ठेवा.
  • यासोबतच मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करा.
  • स्पर्धा परीक्षेसाठी तयारी सुरू ठेवा, कारण भरतीची प्रक्रिया (CIDCO official website apply) टप्प्याटप्प्यानेच होणार आहे.

सिडकोने घेतलेला हा निर्णय केवळ संस्थेतील तुटवडा भरून काढणारा नाही, तर राज्यातील हजारो तरुणांसाठी (CIDCO government jobs) एक नवी संधी उपलब्ध करून देणारा आहे. ही संधी केवळ नोकरीपुरती नाही, तर तुमचं भविष्य घडवणारी देखील ठरू शकते. त्यामुळे वेळ वाया न घालवता आताच तयारीला लागा.