Credit Card Pros and Cons: हे आहेत क्रेडिटकार्ड वापराचे फायदे आणि तोटे

हल्ली आपण अनेकांना विविध वस्तूंची खरेदी किंवा सेवा मिळविताना क्रेडिट कार्ड वापरताना पाहतो. अनेक बँकिंग संस्था आणि वित्तिय खाजगी कंपन्या देखील त्यांच्या ग्राहकांना विविध ऑफर्स देऊन क्रेडिट कार्ड विकतात. परंतु हे क्रेडिट कार्ड कशासाठी वापरायचे, त्याच्या वापराचे आणि खर्चाचे नेमके गणित कसे आहे, त्याचे फायदे किती आणि तोटे किती हे अनेकांना माहितीच नसते. त्यामुळे अनेकजण या आर्थिक मायाजाळात अडकतात आणि नंतर पश्चाताप करीत बसतात. क्रेडिट कार्डचे जसे फायदे आहेत तसेच त्याच्या अतीवापराचे तोटे देखील आहेत. या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला त्याबद्दल सविस्तर माहिती देत आहोत.

क्रेडिट कार्डची सुरुवात कशी झाली?

1928 मध्ये क्रेडिट सिस्टिम वापरण्याची संकल्पना उदयास आली. अमेरिकेसारख्या देशांमध्ये 1930 ते 1950 च्या दशकाच्या उत्तरार्धात क्रेडिट सिस्टिम नागरिक वापरू लागले. VISA या कंपनीने जगातील पहिले क्रेडिट कार्ड सेवा ग्राहकांना उपलब्ध करुन दिली. या कंपनीची  स्थापना 18 सप्टेंबर 1958 रोजी झाली होती. सर्वात पहिले ATM मशीन सुरु करण्याचे श्रेय देखील याच कंपनीला जाते. अमेरिकेतील या कंपनीने कालांतराने जगभरात ही संकल्पना रुजवण्यास सुरुवात केली.  जून 2018 पर्यंत संपूर्ण जगात 7.753 अब्ज ग्राहक क्रेडिट कार्डे चा वापर करीत होते. Credit Card Pros and Cons

क्रेडिट कार्ड वापराचे आर्थिक तंत्र

क्रेडिट म्हणजेच उधारी. ज्या कंपनीचे क्रेडिट कार्ड असते त्यावर 1 लाख ते 10 लाखापासून पुढे क्रेडिट उपलब्ध असले. हे कार्ड वापरुन आपण आपल्याला हवी असलेली वस्तू किंवा सुविधा घेऊ शकतो. आणि महिनाअखेर आपल्याला एकत्रितरित्या खर्च केलेले बिल भरायचे असते. अनेकांना सॅलरी उशीरा मिळते काहीकडे दोन महिन्यांनंतर पैसे बँक खात्यात येणार असतात अशावेळी सध्यपरिस्थितीत खर्च करण्यासाठी क्रेडिट कार्डचा पर्याय उत्तम ठरतो. Credit Card Pros and Cons

क्रेडिट कार्ड वापराचे फायदे

  • क्रेडिट कार्डच्या वापरामुळे आपण रोख पैसे नसतानाही खरेदी करु शकतो
  • क्रेडिट कार्डशी संबंधीच ॲप्सच्या मदतीने ग्राहकां त्यांच्या स्मार्टफोनवरून देखील खरेदी सुरु ठेवू शकतात.
  • काही कंपन्यांच्या क्रेडिट कार्ड वापरामुळे वापरकर्त्याला विमा देखील मिळतो. त्यामुळे खरेदी केलेल्या वस्तूची चोरी किंवा नुकसान झाल्यास त्याची भरपाई करून मिळते.
  • काही बँका तसेच क्रेडिट कार्ड कंपन्या कार्डचा वापर वाढावा यासाठी रिवॉर्ड प्रोग्राम ऑफर करतात.
  • क्रेडिट कार्डच्या रिवॉर्ड्स ऑफरमुळे एअरलाइन माइल्स आणि निवडक व्यापाऱ्यांवरील विशेष सवलती उपभोगता येतात.
  • क्रेडिट कार्डच्या वापरानंतर काही कंपन्या कॅशबॅक सुद्धा देतात. Credit Card Pros and Cons

क्रेडिट कार्ड वापराचे तोटे

  • क्रेडिट कार्ड ग्राहकांना मासिक पेमेंट करण्यासाठी दोन पर्याय देतात. कमीत कमी भरण्याची रक्कम आणि त्या महिन्यात देण्याची पूर्ण रक्कम. तसेच क्रेडिट कार्ड कंपन्या ही रक्कम भरण्यासाठी 45 ते 50 दिवसांचा कालावधी देते आणि त्यानंतर पैसे भरल्यास मोठ्या रकमेचे व्याज लावले जाते.
  • क्रेडिट कार्ड वरील एकूण थकबाकीच्या कमीत कमी पाच टक्के एवढी रक्कम भरणा करण्याची मुभा असते पण कोणत्याही परिस्थितीत ही सवलत आपण वापरू नये कारण उरलेल्या 95% रकमेवरती महिना अडीच टक्के एवढे व्याज आकारले जाते जे साधारण वार्षिक 40% पेक्षा जास्त असू शकते.
  • क्रेडिट कार्डचा वापर जास्त असेल आणि वापरकर्ता त्याचे बील भरण्यास असमर्थ असेल तर त्याचा सिबिल स्कोअरवर परिणाम होतो आणि होमलोन, कारलोन सारखे इतर लोन मिळवताना अडचणी येऊ शकतात.

क्रेडिट कार्डच्या वापराने आपले  जीवन सुखकर आणि सोयीस्कर झाले असले तरी क्रेडिट कार्ड वापरामध्ये आर्थिक धोकाही तितकाच आहे. त्यामुळे अनेकदा आर्थिक सल्लागारांकडून क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांना कमी खर्चाचा सल्ला दिला जातो. वेळोवेळी ही रक्कम क्रेडिट लिमिटच्या वरती जाऊ नये यासाठी देखील अनेक आर्थिक नियोजनावर रिसर्च करणारे तज्ञ सांगत असतात. Credit Card Pros and Cons