Cyber Fraud Alert: spam call हे स्मार्ट फोन वापरणाऱ्यांना काही नवीन नाही. सतत स्पॅम कॉलमुळे अनेकांना इरीटेड होत असते. परंतु आता हे नेहमीचे झाले आहे. यांमुळे अनेक लोक त्रस्त आहे. अनेकजण काहीही काम नसतांना उगाच कॉल करतांना दिसतात. एखादा व्यक्ती गरीब असेल तर त्यालाही अतिशय महागडे घर विकत घेण्यासाठी कॉल केले जातात. असे कॉल येणे ही अतिशय सामान्य बाब झाली आहे. दिवसभरात आपण विविध कामात गुंतलेलो असतो. अतिशय महत्वाच्या कामात असतांना असे कॉल मेसेज आपला भ्रमनिरास करतात. त्यांमुळे अनेकदा आपल्याला मनस्तापाला ही सामोरी जावे लागते. स्पॅम कॉल करणाऱ्या व्यक्तिंना दिवसभरात तब्बल 300 ते 500 लोकांना कॉल करण्याचे टार्गेट दिलेले असते. त्यांमुळे ते कधीही कुणालाही कॉल करतात. कधी लोनसाठी, इंन्शुरन्ससाठी काही कॉल कट केले किंवा ब्लॉक केले तरी ते दुसऱ्या नंबरवरुन सतत कॉल करत राहतात. एखादा ऍप तुम्ही डाउनलोड करता त्यावेळेस तुम्ही तुमची माहिती तिथे शेअर करता. त्याचवेळेस तुमचा नंबर अनेक कंपन्याकडे जातो. अशावेळी असे नंबर कसे ब्लॉक केले जातात. यासाठी विविध ऍप वापरले जातात ते पुढीलप्रमाणे- cyber fraud Alert
Truecaller- या ऍपचा वापर सर्वात जास्त स्पॅम ज्या लोकांनी मार्क केलेला कॉल लगेच ओळखता येतात. या ऍपच्या मदतीने Unknow number कोणाचा आहे हे ओळखता येते. तसेच या ऍपद्वारे तुम्ही नंबर ब्लॉक ही करु शकता.Cyber fraud alert
Calls Blacklist: हे सुध्दा एक चांगले ऍप आहे. या ऍपद्वारे आपण एसएमएस कॉल दोन्हीसाठी ब्लॉक करु शकता. Cyber fraud alert
Call Blocker: या ऍपद्वारे कॉल सेंटर, टेलिमार्केटिंग अशा कॉलला ब्लॉक करण्याचे काम करतात.cyber fraud alert
धोकादायक स्पॅम कॉल कसे टाळायचे?
स्पॅम कॉल धोकादायक असल्याचे भारत सरकाने जाहीर केले आहे. भारत सरकार अंतर्गत येणाऱ्या सायबर सेलमार्फत या स्पॅम कॉल्सला टार्गेट करण्यासाठी एक युनिट देखील तायर करण्यात आले आहे. मग हे असे धोकादायक स्पॅम कॉल नेमके टाळायचे कसे हे आपण पुढील काही मुद्द्यांच्या माध्यमातून जाणून घेऊया. cyber fraud alert
- कॉल-ब्लॉकिंग ॲप्स वापरा जे उच्च वारंवारता कॉलसह स्पॅम कॉल आणि नंबर स्वयंचलितपणे ब्लॉक करतील
- डू नॉट कॉल रेजिस्ट्रीची निवड करा जी तुम्हाला टेलीमार्केटिंग कॉल्स मिळण्यापासून थांबवेल
- तुमचा नंबर सुरक्षित असेल हे तुम्हाला माहीत असल्याशिवाय तुमचा फोन नंबर इंटरनेटवर किंवा अनोळखी व्यक्तींसोबत शेअर करू नका
- तुम्हाला कोण कॉल करत आहे हे जाणून घेण्यासाठी कॉलर आयडी ॲप डाउनलोड करा जेणेकरून तुम्ही अवांछित कॉल उचलणे टाळू शकता. तुम्ही ॲपवर नंबर देखील नोंदवू शकता
- तुमची वैयक्तिक माहिती किंवा सामाजिक सुरक्षा क्रमांक कोठेही कोणालाही प्रदान करण्यापासून परावृत्त करा cyber fraud alert
बनावट कॉल आणि मेसेजची तक्रार अशी करा
दुरसंचार विभागाने बनावट कॉल आणि एसएमएस टाळण्यासाठी युजर्सना काही सुचना दिल्या आहेत. त्यासाठी दुरसंचार विभागाने तक्रार नोंदविण्यासाठी एक पोर्टल सुरु केले आहे. तसेच दुरसंचार विभाग आणि TRAI ने दुससंचार ऑपरेटर्सना त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कडक सुचना दिल्या आहेत. तीन अतिशय सोप्या पध्दतीने आपण या पोर्टलचा वापर करु शकतो.cyber fraud alert
या तीन स्टेप्स फॉलो करा.
- संचार साथी पोर्टलला भेट दया.
- Citizen Centric Services यावर क्लिक करा. त्यावर दिसणाऱ्या पहिल्याच Chakshu ब्लॉकवर क्लिक करा,
- Report suspected fraud and unsolicited commercial communication यामध्ये तुम्हांला येणारे स्पॅम कॉल्स आणि मेसेजचे डिटेल्स भरा.
या माध्यमाद्वारे जवळपास १ कोटीहुन अधिक सिमकार्ड ब्लॉक केले आहेत. जर आता तुम्हीही त्रस्त असाल तर तक्रार करुन यापासुन सुटका मिळवू शकाल. Cyber fraud alert