Digital land map एका क्लिकवर मिळवा तुमच्या जमिनीचा नकाशा;  निवासी जमिनीच्या डिजीटलायझेशनचे  काम ६०% पूर्ण होत आले आहे.

Land record: तुम्ही शेतकरी आहात किंवा किंवा  तुमची निवासी जमीन असल्यास ही बातमी तुमच्यासाठी आहे.  शासनाने जिल्ह्यातील शेती व निवासी जमिनींचे अभिलेख नकाशे हे संगणकीय करण्यावर भर दिला आहे. शेतकऱ्यांना आता मोबाईलवर किंवा संगणकावर घरीच्या घरी आपल्या शेतीचा नकाशा किंवा जमिनीचा नकाशा पाहता येणार आहे.  त्या अनुषंगाने जमीन स्कॅनिंगचे काम प्रगतीपथावर आहे. माहितीनुसार, सात लाख जमिनींचे नकाशे तयार झाले असून पाच लाख नकाशे तयार करण्याचे काम अद्यापही सुरू आहे.

महाराष्ट्र राज्य भूमी अभिलेख विभाग

जमीन मोजणीचे किंवा सर्वेक्षणाचे काम महाराष्ट्र राज्यांतर्गत असलेल्या भूमी अभिलेख विभागामार्फत केले जाते. हे काम आधुनिक तंत्रज्ञानाने व मूळ नकाशांच्या आधारावर होत असते. तालुका उपाध्यक्ष भूमी अभिलेख कार्यालयात जुन्या अभिलेखांचे स्कॅनिंगचे काम सुरू असल्याने नकाशांचे स्कॅनिंग करून डिजिटलायझेशन केले जाते.  त्यामुळे आता जमीन मोजणी प्रकरणे लांबणीवर पडणार नाहीत. डिजिटल स्वरुपात नकाशे जमीन धारकांना उपलब्ध झाल्यास जमीन मोजण्याच्या कामांना वेग येईल. शेतकऱ्यांना व जमीन धारकांना याचा फायदा होणार आहे. Land record

जमिनी नकाशांच्या डिजिटलायझेशनमुळे होणारा फायदा

  • जमिनीच्या जुन्या आवृत्या सुधारून नकाशांचे आयुष्य वाढेल.
  • जमिनीच्या नकाशांची नक्कल सहज मिळेल. 
  • डिजिटल नकाशे शासनाच्या ई महाभूमी संकेतस्थळावरून मिळतील
  • शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे थांबवता येतील.

जमीन धारकांना जमिनीच्या नकाशाची असते आवश्यकता

भूधारकांना निवासी जमिनींच्या जुन्या नकाशांची विविध कारणांसाठी आवश्यकता भासत असते. या भू-धारकांना नकाशा सहज मिळण्यासाठी डिजिटलायझेशन होत असून जिल्ह्यात बारा लाख नकाशे डिजिटल स्वरूपात मिळतील. Land record

कागदोपत्री असलेले अभिलेख जुने आणि जिर्ण होत आहेत

नकाशांचे अभिलेख दिवसेंदिवस जीर्ण होत आहेत. त्यामुळे त्यावर तातडीने उपाययोजना करणे गरजेचे होते. शिवाय मूळ नकाशांचे अभिलेख डिजिटल स्वरूपात नसल्याने कर्मचाऱ्यांना संबंधित नकाशा अभिलेख कक्षात शोधण्यात भूमापकांचा खूप वेळ व कष्ट वाया जातात. जुने अभिलेख शोधून नकाशे देणे जिकिरीचे व वेळ खाऊ काम आहे. यावर उपाययोजना म्हणून ई अभिलेख कार्यक्रमातून अभिलेख कक्षांचे संगणीकरणाचे काम हाती घेतले आहे. अभिलेखांचे स्कॅनिंग करून ते डिजिटल स्वरूपात पाठविले जात आहेत त्यामुळे नागरिकांना घरबसल्या नकाशांच्या प्रती ऑनलाइन मिळतील अशी माहिती खात्रीशीर सूत्रांनी दिली.

नकाशे स्कॅनिंग प्रक्रिया

भूमी अभिलेख कार्यालयात असलेले सोळा प्रकारचे नकाशे स्कॅनिंग केले जात आहेत. प्रत्येक गावानुसार टिपण, काटे फाळणी, सविस्तर भूमापन मोजणी, नकाशा सर्वे नंबरचे, मूळ नकाशे, कापडी सर्वे नंबरचे नकाशे, भूसंपादन नकाशे, सिटी सर्वे नकाशे बिनशेती नकाशे यांसारख्या नकाशांचा समावेश आहे.महाराष्ट्र शासनांतर्गत येणाऱ्या भूमी अभिलेख विभागांतर्गत जमिनीच्या नकाशांचे डिजिटलायझेशन करण्याचे काम आता 60% पूर्ण होत आले आहे. आता आपण आपली जमीन आणि त्याचा नकाशा ऑनलाईन पद्धतीने सहज पाहू शकणार आहोत. ही नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि सोयीची बात आहे. Land record

जमीनीच्या डिजिटल नकाशांची गरज कुठे असते

शेतकरी असो किंवा जमीन मालक, व्यावसायिक यांना जमिनिच्या नकाशाची विविध कारणांसाठी गरज भासते. अशावेळी जमिनीचा नकाशा ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध होत असेल तर शेतकरी, जमीन मालक, व्यवसायिक यांचा वेळ वाचेल.

  • शेतकऱ्यांना जमिनीवरील हक्क सिद्ध करण्यासाठी, पिक विमा किंवा शेतीविषयक योजनांचा लाभ घेण्यासाठी देखील जमिनीच्या नकाशाची गरज असते.
  • व्यापारी किंवा जमिन मालकांना जमिनीचे खरेदी विक्रीचे व्यवहार करण्यासाठी जमिनीच्या नकाशाची गरज असते.
  • शासकीय कार्यालयांना देखील शासनाच्या मालकीची कोणकोणती जमीन आहे तेथे कोणकोणते विकासाचे प्रकल्प राबवता येतील हे समजून घेण्यासाठी जमिनीच्या नकाशाची गरज असते.

आता या सर्वांचा प्रश्न कायमचा सुटला आहे आणि ऑनलाईन पद्धतीने जमिनीचे नकाशे आता काही महिन्यांतच 100% डिजिटल पद्धतीने उपलब्ध होतील यात काहीच शंका नाही. Land record