Download Pan Card Online: मोबाईल वरुन फक्त 5 मिनिटांत पॅनकार्ड डाऊनलोड करा.

Download Pan Card Online भारतातील प्रत्येक नागरिकासाठी पॅनकार्ड हे अत्यंत महत्त्वाचे ओळखपत्र मानले जाते. आर्थिक व्यवहार करताना पॅनकार्ड हे आवर्जुन विचारण्यात येते,  शासकीय किंवा निमशासकीय कामांसाठी  पॅनकार्ड अतिशय महत्वाचे कागदपत्र मानले जाते.  मग ते शासकीय योजना चा लाभ असो, सरकारी नोकरी असो, बँकेचे काम असो किंवा इतर कोणतेही काम यामध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे पॅनकार्ड हे कागदपत्र विचारले जाते. जर तुमचे पॅनकार्ड हरवले असेल किंवा घरी विसरले असेल तर तुम्ही फक्त 5 मिनटात तुमच्या मोबाईल वरून पॅनकार्ड डाऊनलोड करू शकता. या पॅनकार्ड ची PDF किंवा सॉफ्ट कॉपी तुम्हाला मोबाईलवर मिळते. त्याचा वापर करुन तुम्ही तुमची पुढील कामे करु शकता. पण मग अनेकांना प्रश्न असतो की हे ई पॅनकार्ड डाऊनलोड कसे करायचे आणि त्याचे फायदे काय काय आहेत? म्हणूनच आम्ही आजचा हा लेख तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. Download Pan Card Online

ई पॅनकार्ड म्हणजे काय?

परमनंट अकाऊंट नंबर (PAN) हा 10 अंकी अल्फा-न्यूमरिक क्रमांक आहे. तो सर्व भारतीय नागरिकांसाठी विशेष ओळख क्रमांक असून त्याद्वारे नागरिकांची करासंबंधीत माहिती साठवली जाते. ई- पॅन कार्ड म्हणजे इलेक्ट्रॉनिक पॅन कार्ड होय. प्राप्तीकर विभागाने आपल्याला ई-पॅन कार्ड डाऊनलोड करणे सुलभ केले  आहे. सध्या भारत सरकारने डिजिटल इंडिया या चळवळीअंतर्गत प्रत्येक नागरिकाला लागणारी महत्त्वाची कागदपत्रे, त्यांची ओळखपत्रे ऑनलाईन स्वरुपात उपलब्ध होतील अशी सुविधा सुरु केली आहे. त्यामुळे आता आपण ऑनलाईन पद्धतीने डाऊनलोड करुन आपले पॅनकार्ड देखील डिजिटल कॉपी स्वरुपात वापरु शकतो. लोक ई-पॅन कार्डचा वापर मोठ्या प्रमाणात करतात.  कारण ते वापरण्यास आधीच्या पॅनकार्ड पेक्षा जास्त सोयिस्कर आणि सोपे आहे. प्रवासात सोबत ठोवण्याची गरज वाटत नाही, कधीही आपण हे ई पॅनकार्ड डाऊनलोड करुन आपले ओळखपत्र म्हणून वापरात आणू शकतो. Download Pan Card Online

ई पॅनकार्ड वापरण्याचे फायदे

 • ई पॅनकार्ड आपल्याला कधीही केव्हाही डाऊनलोड करुन ओळखपत्र म्हणून वापरता येते.
 • ई पॅनकार्ड डिजिटल स्वरुपात असल्याने हरवण्याची भीती नसते.
 • मोबाईल किंवा इमेलच्या माध्यमातून कधीही आपण ई पॅनकार्ड वापरु शकतो
 • सध्या आपल्याला अनेक योजनासाठी किंवा परिक्षांसाठी ऑनलाईन कागदपत्रे किंवा ओळखपत्रे अपलोड करायची असतात, तेव्हा ई पॅनकार्डची कॉपी ओळखपत्र म्हणून आपण सहज आपल्या अर्जासोबत अपलोड करु शकतो. Download Pan Card Online

पॅनकार्डमार्फत मिळणारे लाभ

 • कोणत्याही प्रकारचे कर्ज घेण्यासाठी पॅनकार्ड चा उपयोग होतो.
 • पॅनकार्ड वापरुन आपण आपला सीबिल स्कोअर तपासू शकतो. जो आपल्याला कोणतेही कर्ज घेताना अत्यंत महत्त्वाचा असतो.
 •  तुम्हाला बँकेत नवीन खाते उघडण्यासाठी पॅनकार्ड चा उपयोग होतो.
 • विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी पॅनकार्ड आवश्यक असते. Download Pan Card Online

मोबाईल वरून पॅनकार्ड  फक्त 5 मिनिटात डाऊनलोड कसे करायचे त्याची प्रक्रिया पहा How To Download NSDL E Pan Card In Mobile

 • सर्वात प्रथम तुमचे पॅनकार्ड डाऊनलोड करण्यासाठी तुमच्या आधीच्या पॅनकार्डच्या मागच्या बाजूला पत्ता दिसेल त्यामध्ये NSDL किंवा UTITSL या 2 पैकी कोणता एक पर्याय आहे तो तपासा.
 •  ज्या ऑफिस चा पत्ता दिला असेल त्याप्रमाणे तुम्हाला पॅनकार्ड डाऊनलोड प्रक्रिया करायची  आहे.
 • जर तुमच्या पॅनकार्ड वरती NSDL चा पत्ता असेल तर तुम्हाला गूगल वरती NSDL असे सर्च करावे लागेल. NSDL पॅनकार्ड असेल तर खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून वेबसाईट वरती जा. https://www.onlineservices.nsdl.com/paam/requestAndDownloadEPAN.html
 • लिंक उघडल्या नंतर तुमच्या समोर 2 पर्याय दिसतील एक्नॉलेजमेंट  आणि पॅनकार्ड नंबर.
 • पॅनकार्ड नंबर द्वारे पॅनकार्ड डाऊनलोड कसे करावे हे आपण पाहू.
 • समोर दिसत असलेल्या रकान्यात तुमचा पॅनकार्ड क्रमांक टाका व नंतर आधार क्रमांक टाकावा
 • तुमची जन्मतारीख भरा आणि कॅपचा कोड नमूद करा.
 • ‘सबमिट’ वर क्लिक करा.
 • तुम्हाला तुमचा इमेल आयडी किंवा मोबाइल क्रमांकावर OTP मिळेल.
 • समोरील रकान्यात OTP भरा आणि  आणि तुमचे ई- पॅन कार्ड डाऊनलोड करा.

UTITSL या वेबसाइटवरुन पॅन कार्ड डाऊनलोड करण्यासाठी

यूटीआयआयएसएल वेबसाइटवरून ई- पॅन डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला खालील टप्प्यांचे पालन करणे आवश्यक आहेः Download Pan Card Online

 • यूटीआयआयएसएल वेबसाइटवर जा. apply for pan card चा पर्याय निवडा.
 • ई- पॅनकार्ड डाऊनलोड करण्यासाठी तुमचे नाव, जन्मतारीख, लिंग, वडिलांचे नाव, आधार कार्ड क्रमांक असे आवश्यक तपशील भरा.
 • तुमची स्कॅन केलेली स्वाक्षरी आणि छायाचित्र अपलोड करा.
 • तुमच्या नोंदणीकृत इमेल पत्ता आणि दूरध्वनीवर वन टाइम पासवर्ड  म्हणजेच OTP पाठवला जाईल.
 • ओटीपी नमूद करा.
 • आता तुम्ही ई- पॅनकार्ड डाऊनलोड करू शकता.