Download RC in mobile: गाडीचे RC कागदपत्रं सोबत घेऊन फिरण्याची गरज नाही, जेव्हा गरज लागेल तेव्हा Digilocker ची मदत घेऊन गाडीचे RC डाऊनलोड करा.

Download RC in mobile कोणत्याही प्रकारचे वाहन चालवताना वाहनासंबंधित कागदपत्र सोबत असणे अत्यंत महत्वाचे असते. त्यामध्ये अत्यंत आवश्यक कागदपत्र म्हणजे गाडीचे Registration certificate म्हणजेच RC बुक. जर का एखाद्या वाहन चालकाने RC शिवाय वाहन चालवले आणि एखाद्या वाहतुक पोलिकांनी विचारल्यास  वाहन चालकाला खूप त्रास होऊ शकतो. RC बुक म्हणजे एक पुरावा असतो की तुम्ही कायदेशीर नोंदणीकृत वाहन चालवत आहात. त्यामुळे कोणतेही वाहन चालवताना मग ते कार असो की बाईक RC बुक सोबत ठेवलेच पाहिजे.  

RC बुक बद्दल अधिक माहिती

आरसी बुक म्हणजेच Registration certificate हे भारत सरकारच्या माध्यांतून देण्यात येणारी अधिकृत कागदपत्रं आहे. RTO म्हणजेच regional transport office कडे आपण वापरत असलेले वाहन रजिस्टर्ड असल्याचे ते एक प्रमाणपत्र असते.  सध्या RC book हे स्मार्ट कार्ड  स्वरुपात दिले जाते. त्यामध्ये आपण वापरत असलेल्या वाहनाची आणि वाहन मालकाची माहिती दिलेली असते. पुढील मुद्द्यांच्या माध्यमातून तुम्ही समजून घेऊ शकता की RC मध्ये कोणकोणती माहिती दिलेली असते.  Download RC in mobile / rc book in digilocker

  • गाडीची रजिस्ट्रेशन तारीख आणि नंबर
  • गाडीचा इंजिन क्रमांक
  • गाडीचा चेसिस नंबर
  • वाहनाचा रंग आणि मॉडेल नंबर
  • टू-व्हीलर किंवा फोर-व्हीलरचा प्रकार
  • गाडीमधील कमाल आसन क्षमता
  • इंधनाचा प्रकार
  • टू-व्हीलर किंवा फोर-व्हीलरचा उत्पादन तारीख
  • वाहन मालकाची वैयक्तिक माहिती जसे की नाव आणि पत्ता देखील  असतो.

RCकार्ड किंवा RC प्रत नसेल तर काय करावे?

सध्या प्रत्येक वाहनाचे RC कार्ड मिळते. परंतु हे कार्ड जर का एखादा वाहन चालक घरीच विसरला असेल तर मग काय करायचे असा प्रश्न असतो. यासाठी सरकारने डिजीलॉकरची ऑनलाईन प्रणाली तयार केली आहे, ज्याच्या मदतीने नागरिक त्यांचे महत्त्वाचे कागदपत्र हवे तेव्हा डाउनलोड करून घेऊ शकतात. या डिजीलॉकरमध्ये  सर्व दस्तऐवज सुरक्षित राहतात आणि वाहनचालकांना RC  सारख्या कागदपत्रांच्या प्रत्यक्ष प्रती बाळगण्याची गरज नाही. पण मग पुढे प्रश्न येतो की हे डिजिलॉकर कसे डाऊनलोड करायचे आणि त्यामध्ये आपले महत्त्वाचे कागदपत्रं कसे अपलोड करुन ठेवायचे? तुमच्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या लेखामध्ये मिळतील. Download RC in mobile online

मोबाईलमध्ये डिजीलॉकर डाऊनलोड करा

सर्वप्रथम तुम्ही  खालील लिंकवर क्लिक करुन तुमच्या मोबाईलमध्ये digilocker  हे ऍप डाऊनलोड करुन घ्या.

https://play.google.com/store/apps/details?id=com.digilocker.android&pli=1

डिजीलॉकरमध्ये RC कशी डाउनलोड करावी?

पुढील ऑनलाईन प्रोसेसच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला हवे तेव्हा तुमच्या मोबाईलमध्ये RC डाऊनलोड करुन उपयोगात आणू शकता. Download RC in mobile

  • मोबाईल नंबरच्या मदतीने साइन इन करा. मोबाईल OTP च्या मदतीने  सिक्युरिटी पासवर्ड तयार करा. म्हणजे तुमच्या व्यतिरिक्त कोणी तुमच्या डिजिलॉकर वापरणार नाही.
  • Get More Issued Documents हा पर्याय निवडा.
  • येथे तुम्हाला सरकारी विभागांची यादी दर्शविली जाईल, रस्ते आणि वाहतूक मंत्रालय हा पर्याय  निवडा.
  • यानंतर वाहन नोंदणी या पर्यायावर क्लिक करा.
  • तुमच्या नावावर असलेल्या वाहनाचा नोंदणी क्रमांक आणि चेसिस क्रमांक टाकण्यास सांगितले जाईल तो तेथे  बिनचुक भरा.
  • माहिती भरल्यानंतर तुम्हाला Get Document चा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
  • तुम्हाला दिसत असलेल्या डॉक्युमेंटवर  परत आल्यानंतर RC book  डाउनलोड करा असा पर्याय येईल. तेथे क्लिक करुन तुम्ही तुमचे RC बुक तुमच्या मोबाईलमध्ये डाऊलोड करु शकता. Download RC in mobile