Driving License: जगातील प्रत्येक देशामधे रस्ता सुरक्षा लक्षात घेऊन त्यानंतरच वाहन कायदे बनवले गेले आहेत. आपल्याकडे भारतामधे देखील मोटार वाहन कायदा अस्तित्वात आहे. भारतात या कायद्यानुसार वाहन चालविण्याचा परवाना असणे बंधनकारक केले गेले आहे. Driving License
मात्र, ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्याची प्रक्रिया खूपच किचकट आहे. त्यामुळे मोठ्या अडचणींचा सामना सर्वसामान्यांना ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी करावा लागत आहे. पण आता मात्र ही ड्रायव्हिंग लायसन्स काढण्याची पद्धत खूपच सोपी झाली आहे.
सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठीच हे सगळं असल्याचं समजून येत आहे. तुम्हीही जर येत्या काही दिवसांमधे ड्रायव्हिंग लायसन्स काढण्याच्या तयारीमधे असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठीच असणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारने ड्रायव्हिंग लायसन्स जारी करण्याच्या नियमांमध्ये काही महत्त्वाचे बदल केले असल्याचं दिसून येत आहे. Driving License
नवीन नियमांमुळे ड्रायव्हिंग लायसन्स मिळण्याची प्रक्रिया खूपच सोपी झाली आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे अशी की हा नवा नियम 1 जून 2024 पासून लागू केला गेला आहे. आज आपण आजच्या या लेखामध्ये या नवीन नियमाबद्दल अधिक माहिती घेणार आहोत.
ड्रायव्हिंग लायसन्स बाबतीत बदललेले नियम | Driving License
आता सर्वसामान्य नागरिकांना नव्या नियमानुसार ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी आरटीओमध्ये जावे लागणार नाही. 1 जूनपासून रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाने नवीन नियम लागू केले आहेत.
या नवीन नियमानुसार आता अर्जदार ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी खासगी ड्रायव्हिंग ट्रेनिंग सेंटरमध्ये चाचणी देऊ शकतात. ड्रायव्हिंग चाचणी देण्यासाठी आधी आरटीओमध्ये जावे लागत होते, परंतु आता अर्जदार ड्रायव्हिंग चाचणी देण्यासाठी शासन मान्यताप्राप्त खाजगी ड्रायव्हिंग प्रशिक्षण केंद्रांशी संपर्क साधू शकतात.
ड्रायव्हिंग लायसन्सची किंमत किती आहे? | Driving License Fees
शिकाऊ लायसेन्स (फॉर्म 3): रु. 150.
नवीन शिकाऊ लायसेन्स चाचणी: 50 रु.
टेस्ट ड्राइव्ह (पुन्हा चाचणी): 300 रु.
ड्रायव्हिंग लायसन्स जारी करणे: 200 रु.
आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग लायसन्स: रु 1,000.
ड्रायव्हिंग लायसन्समध्ये दुसरी वाहन श्रेणी जोडण्यासाठी शुल्कः 500 रुपये.
ड्रायव्हिंग लायसन्सचे नूतनीकरण: 200 रु.
उशीरा लायसेन्स रीन्यू करणे: रुपये 300 + रुपये 1,000 प्रति वर्ष
कुठे अर्ज करायचा | Driving License Where to Apply?
नागरिक https://parivahan.gov.in/ या वेबसाइटला भेट देऊन ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज करू शकतात. तसेच, नागरिकांना आरटीओ कार्यालयात जाऊन देखील ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज करता येणार आहे. Driving License
परिवहन वेबसाइटवरून ड्रायव्हिंग लायसन्सची सॉफ्ट कॉपी खालील स्टेप्स फॉलो करून डाउनलोड करा:
स्टेप 1: अधिकृत वाहतूक वेबसाइट https://parivahan.gov.in/parivahan/ ला भेट द्या.
स्टेप 2: यानंतर तुम्हाला “ऑनलाइन सेवा” वर जायचे आहे आणि “ड्रायव्हिंग लायसन्स सर्व्हिसेस” वर क्लिक करायचे आहे. Driving License
स्टेप 3: तुम्हाला एका नवीन पेजवर नेण्यात येईल, आणि याठिकाणी तुम्हाला तुमचे राज्य निवडायचे आहे.
स्टेप 4: “ड्रायव्हिंग लायसन्स” विभागात, “ड्रायव्हिंग लायसन्स प्रिंट करा” वर तुम्हाला क्लिक करावे लागणार आहे.
स्टेप 5: त्यांनतर तुम्हाला तुमची जन्मतारीख, अर्जाचा क्रमांक आणि कॅप्चा प्रविष्ट करावा लागणार आहे.
स्टेप 6: यानंतर शेवटी तुम्हाला “सबमिट” वर क्लिक करावे लागेल.
यानंतर तुम्हाला तुमच ड्रायव्हिंग लायसन्स स्क्रीनवर दिसून येईल. तुम्ही हे लायसेन्स PDF म्हणून सेव्ह सुद्धा करू शकता किंवा ते प्रिंट देखील करून घेऊ शकता. Driving License