शेतजमीन असो किंवा बिगरशेतजमीन प्रत्येक जमिनीची नोंद ही शासकीय दफ्तरी झालेली असते, हा खूप आधिपासूनचा शासकीय नियम आहे. यानुसार ज्या व्यक्तीच्या नावावर ती जमीन आहे त्या व्यक्तीची माहिती आणि जमिनीची माहिती नोंदीमध्ये देण्यात आलेली असते, ही जमिनीसंबंधीत नोंद अत्यंत महत्त्वाची असते कारण जमीनीचा हक्स सिद्ध करण्यासाठी फेरफाराचे पुरावे कोर्टात मान्य करण्यात येतात. अनेकदा यावरुन ग्रामिण भागात विवाद होताना दिसून येतात. चला तर मग या फेरफार संबंधित अधिक माहिती मिळवूया आणि फेराफारातील चुकीच्या नोंदी दुरुस्त कशा करायच्या हे देखील जाणून घेऊया. Ferfar nondichi durusti
फेरफार म्हणजे काय?
प्रत्येक जमिनी संबंधीत नोंद करण्यासाठी गावाच्या शासकीय कार्यालयात एक नोंदवही असते. फेरफार म्हणजे गाव नमुना 1 ते 21 यांमधील गाव नमुना नं. 6 मधील नोंदी म्हणजेच हक्क संपादनाचे पत्रक व फेरफार नोंदवही यात जमिनीचे सर्व फेरफार, व्यवहार, खरेदी विक्री, वारस तारीख खरेदी रकमा संबंधित माहिती असते नोंदवहीमध्ये ठेवलेली असते, यालाच फेरफार नोंदवही असे म्हणतात. या फेरफार नोंदवहीवरील नोंदीच पुढे 7/12 वर येतात. तसेच सातबाऱ्यावर कोणतीही नोंद करण्यापूर्वी ती फेरफार नोंदवहीत नोंदवणे गरजेचे असते. किंबहून शासकीय नियमाप्रमाणे तसेच केले जाते. फेरफार ही शासकीय दप्तरी करण्यात येणारी आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त आशी ही नोंद आहे.कारण या नोंदी जर चुकीच्या झाल्या तर पुढे अनेकांना कोर्ट कचेऱ्यांमध्ये फेऱ्या देखील माराव्या लागू शकतात. Ferfar In Marathi
सातबाऱ्यावर येणाऱ्या नोंदी
सातबाऱ्यावर कोणतीही नोंद करण्यापूर्वी त्या बाबीची नोंद फेरफार नोंदवहीत करणे गरजेचे असते. यालाच गाव नमुना क्र. 6 फेरफाराची नोंदवही किंवा गाव नमुने नं. ‘ड’ असेही म्हटले जाते. Ferfar In Marathi
गाव नमुना नं. 6 चे किंवा फेरफाराचे प्रकार
- गाव नमुना नं 6 अ – विवादग्रस्त प्रकरणांची नोंदवही.
- गाव नमुना नं 6 ब – विलंब शुल्क नोंदवही.
- गाव नमुना नं 6 क – वारस प्रकरणांची नोंदवही
- गाव नमुना नं 6 ड – पोट हिस्स्यांची नोंदवही.
वरील सर्व फेरफाराचे प्रकार आहेत. चला तर मग जाणून घेऊया की फेरफार नोंदीमध्ये काही चुका झाल्या असतील तर त्या दुरुस्त कशा करायच्या? Ferfar In Marathi
फेरफार नोंदीतील चुकांची दुरुस्ती
फेरफार नोंद वहिमध्ये झालेल्या चुकीच्या नोंदी या तशाच पुढे सातबारामध्ये नोंद केल्या जातात त्यामुळे फेरफार नोंदवहीमध्ये सुरवातीलाच योग्य नोंदी होणे गरजेचे असते. कारण चुकीच्या नोंदी दुरूस्त करण्याची वेगळी प्रक्रिया आहे. ती प्रक्रिया आपण समजून घेऊ.
- अनेकदा फेरफार वहीमध्ये नावाच्या चुका हमखास होतात. एखादा गट नंबर वगळला जातो किंवा व्यक्तीचे नाते किंवा नाव चुकीचे लिहिले जाते. अशा वेळी महसूल खात्याने नव्याने नोंद घेण्याची आवश्यकता नसते. लेखन प्रमादानातील चूक दुरुस्त करतेवेळी खातेदाराने थेट संबंधित तहसीलदारांकडे अर्ज करणे नियमबद्ध आहे.
- अर्जदाराला कलम 155 महाराष्ट्र महसूल अधिनियमाखाली संबंधित रेकॉर्ड दुरुस्त करून घेण्याचे अधिकार असतात.
- महसूल खात्याची ज्या प्रकरणामध्ये चूक असते अशा केसेसमध्ये तहसीलदार निर्णय घेऊन चूक दुरुस्ती करून घेऊ शकतात.
- मात्र योग्य ती कार्यवाही करावी; असा आदेश खालील महसूल कर्मचाऱ्यांना देऊ नये तर जमीन महसूल कायद्यातील संबंधित तरतुदीखाली चूक दुरुस्त व्हावी असे आदेश द्यावेत. Ferfar In Marathi
व्यक्तीच्या हक्काबाबत फेरफारात झालेल्या चुका व त्याची दुरुस्ती.
- जमिनीच्या मालकी हक्क ,कुल ,वारसा, उत्तराधिकारी इत्यादी हक्कांमध्ये आपल्याला स्थान देण्यात आले नाही असे वाटणाऱ्या व्यक्तीला योग्य त्या पुराव्याच्या आधारे आपणास सादर बाबत हक्क आहे. यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे फेरफार नोंदी विरुद्ध न्यायालयात अपील किंवा फेर तपासणीसाठी अर्ज दाखल केला पाहिजे. Ferfar In Marathi
जमीन व्यवहारा संदर्भात फेरफारमध्ये झालेल्या चुका व त्याची दुरुस्ती
- फेरफार नोंदवहीमध्ये याआधी झालेल्या नोंदीमध्ये दुरुस्ती संबंधी नोंदणी दुबार होणे अशी अपील करावी लागते. असा अर्ज केल्यानंतर पुन्हा एकदा जमिनीची तपासणी केली जाते आणि त्यानंतरच दुरुस्ती संबंधी निर्णय घेण्यात येतो. जमीन मालक शेतकरी तहसीलदार कार्यालयात तक्रार दाखल करुन फेरफार नोंदीमध्ये दुरुस्ती करण्यासाठीचा आग्रह धरु शकतात.
फेरफार कसा नोंदवावा जाणून घ्या
कोणत्याही जमिनीच्या 7/12 उताऱ्यावर जमिनी संबंधित सर्व माहितीची नोंद करण्यापूर्वी फेरफार वहीमध्ये सर्वप्रथम नोंदी केल्या जातात. गावदप्तरी याला गाव नमुना नं.6 – फेरफाराची नोंदवही असे म्हटले जाते. फेरफाराची नोंदवही ही वास्तविक फेरफाराची दैनंदिनी असल्याचे समजले जाते. जमीनीबाबतच्या माहितीमध्ये म्हणजेच मालक, खरेदीदार यांची नावे जसजशी बदलतात तसतसे जमीनीच्या फेरफार नोंदवहीमध्ये त्याबद्दल बदल होत जातात. हे बदल योग्य होणे अत्यंत गरजेचे असते. तसे न झाल्यास पुढे तेच चुकीचे बदल सतबारा उताऱ्यामध्ये दिसून येतात आणि मुख्य अडचणी येथून सुरु होतात.
जमिनीची नोंद करण्यासाठी महत्त्वाचे कायदे
- कायदा : भारतीय नोंदणी कायदा कलम 17; महाराष्ट्र जमीन महसूल अधिनायम 1966, कलम 149 क 150;
- मालमत्ता हस्तांतरण कायदा 1882. Ferfar In Marathi