Free Solar Rooftop Subsidy Yojana 2024 विजेचे वाढते दर आणि विज निर्मितीसाठी होणारा खर्च पाहता भारत सरकार शाश्वत उर्जास्त्रोतांचा वापर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे यासाठी विविध योजना राबवित आहे. त्यापैकीच एक योजना म्हणजे प्रधानमंत्री मोफत सुर्यघर योजना. या योजनेच्या लाभार्थ्यांना घरावर सोलर सिस्टिम बसविण्यासाठी शासन सबसिडी देत आहे. चला तर मग जाणून घेऊ नक्की कशा पद्धतीने शासन सौर ऊर्जा वापराबाबत नागरिकांना प्रोत्साहित करीत आहेत.
Free Solar Rooftop Subsidy Yojana म्हणजे नक्की काय हे जाणून घेऊया.
सदया आपण पाहतो की, दिवसागणिक विजेच्या मागणीत प्रचंड वाढ होत आहे. आणि विजेची निर्मिती करण्यासाठी कोळसा मोठया प्रमाणात लागतो. परंतु कोळशाचे साठे हे अल्प प्रमाणात आहे आणि ते शाश्वत नाही. त्यांच्या निर्मितीसाठी दिर्घ कालावधी लागतो. त्यांमुळे देशातील नागरीकांनी सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त वापर करावा यांसाठी केंद्र सरकारने ही योजना आणली आहे. या योजने अंतर्गत नागरिकांनी स्वत च्या घरावर सोलर बसविण्यासाठी सुरू केली आहे. सोलर पॅनल खरेदी करण्यासाठी सरकार कडून अनुदान दिले जाते. वीज कंपन्यावर आलेला अतिरिक्त भार कमी करणे हे या योजनेचे मुख्य उदिष्ट आहे. Free Solar Rooftop Subsidy Yojana 2024
सोलार रुफटॉप सबसिडी योजनेची उदिष्टे पुढीलप्रमाणे-
- देशातील नागरिकांच्या घरावर सोलर पॅनल बसविण्यासाठी सोलर पॅनलच्या खरेदीसाठी अनुदान उपलब्ध करुन देणे.
- नागरिकांच्या घर, कार्यालय, कारखाने यांच्या छतावर सोलर पॅनल बसवुन विजेची बचत करणे. हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
- कमी दरात वीज उपलब्ध करुन देणे. व पैश्यांची बचत करणे.
- नागरिकांना मोफत ऊर्जा स्त्रोत उपलब्ध करुन देणे. Free Solar Rooftop Subsidy Yojana 2024
सोलार रुफटॉप सबसिडी योजनेचे फायदे पुढीलप्रमाणे-
- सोलार पॅनल बसविल्यामुळे वीज बिलात ३०-५० टक्के बचत होऊ शकते.
- दिवसभर तुम्हांला सोलर पॅनलमधुन मोफत वीज मिळू शकते.
- एकदा सोलर पॅनल बसवला तर पुढील २५ वर्षासाठी त्याचा लाभ घेऊ शकता.
- तसेच पर्यावरणांसाठी ते अत्यंत फायदेशीर आहे.
- या योजनेमुळे नागरीकांना लोडशेडिग पासुन दिलासा मिळेल.
- तसेच या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने असल्यामुळे कुठलाही शासकीय कार्यालयात फेऱ्या मारण्याची आवश्यकता नाही. Free Solar Rooftop Subsidy Yojana 2024
सोलार पॅनलची रक्कम
सोलर रुफ टॉप योजनेच्या माध्यमातून देण्याच येणाऱ्या अनुदानाचे टप्पे पाडण्यात आलेले आहे. सोलर सिस्टिम ज्या क्षमतेचा असेल त्या क्षमतेप्रमाणे त्या सिस्टिमची किंमत बाजारभावाप्रमाणे ठरविण्यात आलेली आहे. ती पुढील प्रमाणे
१ किलोवॅट | ४६,८२० रुपये |
१ ते २ किलोवॅट | ४२,४६० रुपये |
२ ते ३ किलोवॅट | ४१,३८० रुपये |
३ ते १० किलोवॅट | ४०,२९० रुपये |
१० ते १०० किलोवॅट | ३७,०२० रुपये |
सोलार रुफ टॉप योजनेची पात्रता
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा महाराष्ट्राचा मुळ रहिवासी असणे आवश्यक आहे.
- घराच्या वर सोलर सिस्टिम बसविण्यासाठी योग्य आकाराचे छप्पर असावे.
- व्यक्ती 21 वर्षे पूर्ण असलेली तसेच जास्तीत जास्त 65 वर्षा पर्यंत अर्ज करु शकेल. Free Solar Rooftop Subsidy Yojana 2024
या योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे-
- आधारकार्ड, पॅनकार्ड, रेशनकार्ड
- रहिवाशी प्रमाणपत्र
- उत्पन्नाचे प्रमाणपत्र
- जमिनीचा ७/१२ उतारा
- बॅंक खाते पासबुक
- मोबाईल नंबर
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- विजेचे बिल
- ज्या जागेवर सोलार पॅनल बसवायचा आहे. त्या जागेचा तपशील. Free Solar Rooftop Subsidy Yojana 2024
योजनेसाठी रजीस्ट्रेशन करा
https://registration.pmsuryaghar.gov.in/ या लिंकवर क्लिक करुन PM सूर्य घर मोफत वीज योजनेच्या वेबसाइटला भेट द्या आणि Apply for Rooftop Solar वर क्लिक करा. तुमचे राज्य, जिल्हा आणि वीज पुरवठादार निवडा. तुमचा ग्राहक खाते क्रमांक प्रविष्ट करा आणि पुढे जा. नोंदणी पूर्ण करण्यासाठी तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल द्या
पीएम सूर्य घर योजनेसाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा?
- PM सूर्य घर मोफत वीज योजनेच्या वेबसाइटला भेट द्या https://www.pmsuryaghar.gov.in/ आणि Apply for Rooftop Solar वर क्लिक करा.
- तुमचे राज्य, जिल्हा आणि वीज पुरवठादार निवडा. तुमचा ग्राहक खाते क्रमांक प्रविष्ट करा आणि पुढे जा.
- नोंदणी पूर्ण करण्यासाठी तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल द्या.
- त्यानंतर, ऑनलाइन फॉर्म वापरून रूफटॉप सोलरसाठी अर्ज करा.
- एकदा डिस्कॉमने तुमचा अर्ज मंजूर केल्यावर, तुम्ही त्यांच्या यादीतून सोलर पॅनेल स्थापित करण्यासाठी विक्रेता निवडू शकता.
- अर्ज केल्यानंतर नेट मीटरसाठी अर्ज करा. डिस्कॉम तपासणीनंतर, कमिशनिंग प्रमाणपत्र तयार केले जाईल.
- पोर्टलद्वारे तुमचे बँक तपशील आणि रद्द केलेला चेक सबमिट करा. अनुदान ३० दिवसांच्या आत जमा केले जाईल..
अशा पद्धतीने जास्तीत जास्त नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतला पाहिजे. जेणेकरुन ग्रीडच्या विजेचा वापर कमी होईल आणि शाश्वत असलेल्या सौर उर्जेचा वापर वाढेल. Free Solar Rooftop Subsidy Yojana 2024