Goat Sheep Farming Scheme Maharashtra: शेतीवर आधारलेलं अनेकांचं ग्रामीण आयुष्य आणि त्यात जर तुमच्याकडे शेतीसाठी पुरेसे साधन नसेल, तर रोजचा संघर्ष अजूनच वाढतो. आजही अनेक अल्पभूधारक, दारिद्र्य रेषेखालील आणि महिला शेतकरी स्वतःचा व्यवसाय उभारण्यासाठी धडपडत आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्यातील पशुसंवर्धन विभागाने अत्यंत उपयुक्त अशी ‘शेळी व मेंढी वाटप योजना’ सुरु केली आहे. ही योजना (Maharashtra livestock scheme) एकट्या व्यक्तीचा व्यवसाय उभा करण्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची आहे आणि तिची अर्ज प्रक्रिया आता ऑनलाईन सुरू झाली आहे. त्यामुळे जर तुम्हीही या निकषांमध्ये बसत असाल, तर हा तुमच्यासाठी ही योजना महत्वाची आहे.
ही योजना फक्त जनावरं देण्यासाठी नाहीये. तर या योजनेच्या माध्यमातून अनुसूचित जाती-जमातीतील लाभार्थ्यांना १० शेळ्या किंवा मेंढ्या आणि एक बोकड किंवा नरमेंढा असं एक गट स्वरूपात वाटप केलं जाणार आहे. आणि विशेष म्हणजे ही संपूर्ण प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन असणार आहे, म्हणजे अर्जदारांना कुठेही चकरा मारण्याची गरज नाही. अर्ज प्रक्रिया २ मे २०२५ पासून सुरू झाली असून, अंतिम मुदत आहे १ जून २०२५ पर्यंत आहे.
योजनेची वैशिष्ट्ये:
- लाभार्थ्यांना मिळणारे अनुदान: अनुसूचित जाती-जमातींसाठी ७५% आणि इतर सर्वसामान्य प्रवर्गासाठी ५०% अनुदान.
- वाटपाचा प्रकार: १० शेळ्या/मेंढ्या आणि १ बोकड/नर मेंढा यांचा एक गट.
- जातींची निवड: उस्मानाबादी, संगमनेरी, माडग्याळ, दख्खणी आणि इतर स्थानिक जातींचे प्राधान्य.
- विमा संरक्षण: तीन वर्षांसाठी विमा कवच उपलब्ध.
ही योजना राज्यातील विविध विभागांनुसार विभागली गेली आहे. पश्चिम महाराष्ट्र, खानदेश आणि मराठवाडा विभागात उस्मानाबादी व संगमनेरी जातीच्या शेळ्या व बोकड (animal husbandry subsidy) वाटप केले जातील. तर कोकण आणि विदर्भ विभागात स्थानिक हवामानाला अनुरूप आणि तगधार क्षमता असलेल्या स्थानिक जातींचे प्राणी दिले जातील. लाभार्थ्यांच्या निवडीत महिलांना ३० टक्के प्राधान्य देण्यात येणार आहे, ज्यामुळे ग्रामीण महिलांना स्वयंपूर्ण बनण्याची मोठी संधी मिळणार आहे.
या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो? त्यासाठी काही महत्त्वाचे निकष ठरवण्यात आले आहेत. यामध्ये दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील व्यक्ती, १ ते २ हेक्टर जमिन असलेले अल्पभूधारक शेतकरी, रोजगार नोंद असलेले सुशिक्षित बेरोजगार, तसेच महिला बचत गटातील सदस्य हे पात्र लाभार्थी ठरतील.
पात्रता निकष:
- दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी.
- अत्यल्प (१ हेक्टरपर्यंत) आणि अल्प (१ ते २ हेक्टर) भूधारक शेतकरी.
- रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात नोंद असलेले सुशिक्षित बेरोजगार.
- महिला बचत गटातील सदस्य.
- ३०% प्राधान्य महिलांना दिले जाणार.
खालील तक्त्यात आपण शेळी-मेंढी पालन योजनेतील खर्च, दर व अन्य तपशील समजून घेऊ शकता. हे आकडे फक्त शासकीय योजनेंतर्गत अंदाजे आहेत:
अ) शेळी पालनासाठी खर्चाचे तपशील
तपशील | उस्मानाबादी/संगमनेरी जातीसाठी | अन्य स्थानिक जातींसाठी |
शेळ्या खरेदी (१० शेळ्या) | ₹ ८०,००० (₹८,००० प्रति शेळी) | ₹ ६०,००० (₹६,००० प्रति शेळी) |
बोकड खरेदी (१ बोकड) | ₹ १०,००० (उच्च दर्जाचा) | ₹ ८,००० (स्थानिक पैदासक्षम) |
३ वर्षांसाठी विमा (१२.७५% + १८% GST) | ₹ १३,५४५ | ₹ १०,२३१ |
खाद्य, चाऱ्याचा खर्च | लाभार्थीने स्वतः करणे अपेक्षित | लाभार्थीने स्वतः करणे अपेक्षित |
एकूण खर्च | ₹ १,०३,५४५ | ₹ ७८,२३१ |
ब) मेंढी पालनासाठी खर्चाचे तपशील
तपशील | माडग्याळ जातीसाठी | दख्खणी/इतर स्थानिक जातींसाठी |
मेंढ्या खरेदी (१० मेंढ्या) | ₹ १,००,००० (₹१०,००० प्रति मेंढी) | ₹ ८०,००० (₹८,००० प्रति मेंढी) |
नरमेंढा खरेदी (१ नरमेंढा) | ₹ १२,००० | ₹ १०,००० |
३ वर्षांसाठी विमा (१२.७५% + १८% GST) | ₹ १६,८५० | ₹ १३,५४५ |
खाद्य, चाऱ्याचा खर्च | लाभार्थीने स्वतः करणे अपेक्षित | लाभार्थीने स्वतः करणे अपेक्षित |
एकूण खर्च | ₹ १,२८,८५० | ₹ १,०३,५४५ |
शेळ्यांसाठी शासनाची (goat farming subsidy) एकूण मदत ही जातीवर अवलंबून असते. उदाहरणार्थ, उस्मानाबादी आणि संगमनेरी जातीच्या शेळ्यांसाठी प्रति शेळी ८,००० रुपये आणि बोकडासाठी १०,००० रुपये इतकी किंमत निश्चित करण्यात आली आहे. तर अन्य स्थानिक जातींसाठी थोडे कमी दर ठेवण्यात आले आहेत. तसंच तीन वर्षांसाठी विमा, व चाऱ्याचा खर्च लाभार्थीने स्वतः करायचा आहे.
मेंढ्यांच्या वाटपात (sheep farming scheme Maharashtra) माडग्याळ, दख्खणी अशा जातींचा समावेश असून, यांचे दर थोडे वेगळे आहे. माडग्याळ जातीसाठी प्रति मेंढी १०,००० आणि नरमेंढा १२,००० रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. तसंच या प्राण्यांचाही विमा, व्यवस्थापन खर्च आणि एकूण खर्चाच्या हिशोबानुसार शासन अनुदान देणार आहे. उर्वरित रक्कम लाभार्थ्यांनी स्वहिस्सा स्वरूपात भरायची आहे.
जर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल, तर काही आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणं अनिवार्य आहे.
आवश्यक कागदपत्रे:
- ओळखपत्र (आधारकार्ड, फोटो).
- सातबारा आणि ८ अ उतारा.
- अपत्य दाखला किंवा स्वयंघोषणा पत्र.
- रहिवासी प्रमाणपत्र.
- बँक खाते पासबुक.
- रेशनकार्ड/कुटुंब प्रमाणपत्र.
- जातीचा दाखला (जर लागू असेल तर).
- दारिद्र्य रेषेखालील प्रमाणपत्र (जर लागू असेल तर).
- दिव्यांग असल्यास प्रमाणपत्र.
- बचत गट सदस्य असल्याचे प्रमाणपत्र.
- जन्मतारखेचा पुरावा.
- शैक्षणिक पात्रतेचा दाखला.
- रोजगार, स्वयंरोजगार कार्यालयाचे नोंदणी कार्ड.
- प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्र.
- एकाच कुटुंबातील एकाच व्यक्तीस लाभ मिळणार आहे हे लक्षात ठेवावं.
अर्ज करण्यासाठी (online application goat scheme) तुम्ही https://ah.mahabms.com या संकेतस्थळावर जाऊ शकता किंवा गुगल प्ले स्टोअरवरून AH-MAHABMS हे मोबाईल अॅप डाउनलोड करू शकता. अर्ज करताना अर्जदार नोंदणी करा आणि आवश्यक माहिती भरून प्रक्रिया पूर्ण करा. कोणतीही तांत्रिक अडचण आली, तर तुम्ही पुढील माहितीच्या आधारे संपर्क करू शकता.
- पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पंचायत समिती.
- जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी
- जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त
- कॉल सेंटर: 1962 (सकाळी ७ ते सायंकाळी ६).
- तांत्रिक अडचणींसाठी: 8308584478 (सकाळी १० ते सायंकाळी ६).