Google Maps Add Address: गुगल मॅपवर आपल्या घराचा किंवा बिसिनेसचा पत्ता ॲड करा, यासाठी या स्टेप्स फॉलो करा

Google Maps Add Address

Google Maps Add Address: गुगल मॅपची लोकप्रियता खूप वाढलेली आहे. कोणत्याही नवीन ठिकाणी पोहचायचे असो किंवा थेट रहदारीची स्थिती पाहणे असो, हे सर्व Google Maps मुळे शक्य झाले आहे. गुगल मॅप्स तुम्हाला फक्त मार्गच दाखवत नाही, तर अतिवेगाने जर तुम्ही जात असाल तर दंड न होण्यापासून देखील वाचवते.

वापरकर्त्याचा अनुभव अधिक मजेदार आणि चांगला बनवण्यासाठी गुगल काही ना काही नवीन करत असते. आता Google नकाशे अपडेट केले आहेत. Google Map ने इतर सेवा आणि उत्पादनांप्रमाणे AI देखील नकाशामध्ये आणला आहे. (google maps add home address)

गुगल काही ना काही युजर्स करिता नवीन काही करण्याचं प्रयत्न करत असतात. तसेच अनेक लोक गुगल मॅप्सवर आपल्या कामाची जागेची माहिती अपडेट करतात. गुगल मॅप्सच्या सर्व्हिसचा वापर तुम्ही तुमच्या घर, दुकान किंवा ऑफिसचा पत्ता अपडेट करण्यासाठी देखील करू शकता.

घराचा पत्ता अपडेट केल्यानंतर तुम्हाला वारंवार गुगल मॅप्सवर घराचा पत्ता शोधावा लागणार नाही. तुम्ही बिझनेस पत्ता अपडेट करून तुमचा व्यवसाय अजून मोठा करू शकता. गुगल मॅपवर बिझनेस पत्ता अपडेट केल्यानंतर ग्राहक तुमच्या बिजनेस लोकेशनवर सहज पोहोचतील. how to add address in google map

जर तुमचे घर अशा ठिकाणी असेल‌ ज्या ठिकाणी लोकांना पोहचण्यास अडचण येत असेल आणि यामुळे लोकांना रस्ताच कळत नाही. तर आता तुमच्यासाठी जबरदस्त उपाय आहे. कारण आता तुम्ही गुगल मॅपवर तुमचे लोकेशन ॲड करू शकता. यामुळे गुगल मॅपवर शोधून तुमच्या घरी सहजपणे पोहोचतील.

Google Maps Add Location गुगल मॅपवर तुम्ही कोणतेही लोकेशन ॲड करू शकता. यामुळे लोकांना कोणतीही जागा सापडण्यासाठी अडचण येणार नाही. Google Map ने जबरदस्त सुविधा युजर्स करिता सुरू केली आहे. आपण या आर्टिकल मध्ये गुगल मॅप मध्ये घरचा पत्ता व बिझनेस पत्ता कसा ॲड करायचा याबाबत जाणून घेणार आहोत.

Google Maps वर घरचा पत्ता ॲड करा
1) सर्वप्रथम मोबाईलवर गुगल मॅप्स अ‍ॅप ओपन करा.
2) आता Manage your Google Account वर जा.
म्हणजे तुम्ही गुगल अकाऊंटवर पोहोचाल, तिथे Personal info पर्याय निवडा.
3) येथे तुम्हाला Addresses ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करा.
4) ज्यामध्ये तुम्हाला Home, Work आणि Other Addresses चा ऑप्शन मिळेल.
5) तुम्ही तुमच्या गरजेनुसार घर, ऑफिस, दुकान इत्यादी पत्ते ॲड करू शकता.

Google Maps वर बिझनेस पत्ता कसा ॲड करायचा?
1) सर्वप्रथम Google Maps ॲप ओपन करा.
2) ॲप उघडल्यानंतर खाली Contribute पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
3) यानंतर, Add Place या पर्यायावर क्लिक करा.
4) आता तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल.
5) जिथे तुम्हाला व्यवसायाचे नाव, प्रकार इत्यादी माहिती द्यावी लागेल.
6) मोबाईल नंबर टाका. तुम्हाला आलेला OTP टाकून तो सबमिट करून व्हेरिफिकेशन प्रोसेस पूर्ण करा.
7) आता बिझनेसचं लोकेशन सेट करा. google map add business location
8) कार्यकालीन वेळ आणि वेबसाइटची माहिती टाका.
9) आता बिझनेस ऑफिसचे फोटो अपलोड करा.
10) त्यानंतर बिजनेस अ‍ॅड्रेस अ‍ॅड करण्याची रिक्वेस्ट सबमिट करा.
11) गुगल जेव्हा तुमची रिक्वेस्ट व्हेरिफाय करेल तेव्हा गुगल मॅप्सवर तुमचा बिजनेस अ‍ॅड्रेस दिसू लागेल.

अशाप्रकारे तुम्ही गुगल मॅप्स ॲपवर घरचा पत्ता आणि बिझनेस पत्ता ॲड करू शकता. यामुळे तुम्हाला कुणालाही पत्ता सांगण्याची गरज पडणार नाही. तुम्ही कोणताही पत्ता गुगल मॅप्सवर ॲड करू शकता. ही माहिती इतरांना देखील माहित व्हावी या करिता ही माहिती पुढे नक्की पाठवा.