Government Schemes for Womens : महिलांसाठी सरकारच्या ‘या’ खास 10 योजना, वाचा एका क्लिकवर

Women Government Schemes : देशात गरीब आणि गरजू लोकांसाठी सरकार अनेक योजना राबवत आहे. समाजातील प्रत्येक घटकांसाठी शासन योजना आखताना आहे. यामध्ये महिलांसाठी देखील सरकारच्या अनेक योजना आहेत. केंद्र व राज्य सरकार दोघांनी महिलांसाठी खास योजना आणल्या आहेत. या योजनेचा फायदा घेऊन महिला स्वावलंबी होत आहे.

महिलांना स्वावलंबी व आत्मनिर्भर बनवणं हा सरकारचा या मागचा उद्देश आहे. महिलांसाठी वेगवेगळ्या योजना सुरू करण्यात आल्या असून या माध्यमातून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. महिलांसाठी राज्य व केंद्र शासन अनेक योजना (government scheme) राबवत आहे. mahilansathi sarkari yojana 

मात्र, या योजनेबाबत अनेकांना माहीत नाही. यामुळे योजनेचा लाभ घेण्यापासून वंचित आहे. मात्र आम्ही तुम्हाला या आर्टिकल मध्ये महिलांसाठी राबवत असलेल्या 10 योजनांची माहिती देणारं आहोत. women government yojana आपण या आर्टिकल मध्ये सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

Women Government Schemes 2024
1) मोफत शिलाई मशीन योजना (mofat shilai machine yojana)
केंद्र सरकार महिलांना मोफत शिलाई मशीन देत आहे. या योजनेचं नावं देखील मोफत शिलाई मशीन योजना असं आहे. तुम्हीही या योजनेचा लाभ घेऊन फ्री शिलाई मशीन मिळवू शकता. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांचे वय 20 ते 40 वर्षे दरम्यान असावे. तसेच महिलांचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाख 20 हजार रुपयांपेक्षा जास्त नसावे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागेल. योजनेच्या अधिक माहितीसाठी तहसील कार्यालयात भेट द्या.

2) प्रधानमंत्री उज्वला योजना (pm ujjawala yojana)
प्रधानमंत्री उज्वला योजनेअंतर्गत पात्र महिलांना मोफत गॅस सिलिंडर आणि शेगडी दिली जाते. ही देखील केंद्र सरकारची योजना आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार ही महिला असणं आवश्यक आहे. तसेच अर्जदार महिलेचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त नसावे. महिलेकडे बीपीएल कार्ड आणि रेशन कार्ड देखील असणं आवश्यक आहे. अगोदर महिलेच्या नावावर कोणते एलपीजी कनेक्शन नसावे. तरच महिलेला या योजनेचा लाभ घेता येईल. या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर pmuy.gov.in/ujjwala2.html या वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा लागेल.

3) मोफत पिठाची गिरणी योजना (mofat pithachi girni yojana)
महिलांना फ्री मध्ये पिठाची गिरणी देण्यासाठी सरकार मोफत पिठाची गिरणी नावाची योजना सरकार राबवत आहे. या योजनेतून महिलांना मोफत पिठाची गिरणी दिली जात आहे. सरकारच्या या योजनेअंतर्गत 100% अनुदान दिले जात आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन व ऑफलाइन दोन्हीही पद्धतीने अर्ज करू शकता. ऑफलाइन अर्ज करायचा असेल तर तुम्ही पंचायत समितीला भेट द्या. जर ऑनलाइन अर्ज करायचा असेल तर एखाद्या नेट कॅफेला भेट द्या.

4) लाडली बहन योजना (ladli behen yojana)
महिलांना सक्षम बनविण्यासाठी आणि सशक्त करण्यासाठी सरकारने लाडली बहन योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला 1000 रुपये दिले जातात. ही योजना मध्य प्रदेश सरकारकडून सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी मध्य प्रदेश सरकारने अनेक ठिकाणी कॅम्प लावले आहेत, जेथे तुम्ही महिला फॉर्म व आवश्यक कागदपत्रे जोडून अर्ज भरू शकतात.

5) नारी सन्मान योजना (nari samman yojana)
नारी सन्मान योजना माननीय माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी जाहीर केली आहे. राज्यातील महिलांना या योजनेमार्फत दर महिन्याला 2000 मिळणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत जर राज्यात काँग्रेसचे सरकार आले तर नारी सन्मान योजना राबविण्यात येणार आहे.

6) प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना
पीएम मातृत्व वंदना योजना या योजनेअंतर्गत गरोदर महिलांना 6000 रुपये दिले जातात. देशातील सर्व गरोदर महिलांना या योजनेचा लाभ घेता येतो. शासकीय सेवेवर रुजू असलेल्या गरोदर महिलांना या योजनेचा लाभ घेता येत नाही. ही योजना केंद्र सरकारची असून महाराष्ट्रात 2017 पासून सुरू करण्यात आली.

7) सखी वन स्टॉप सेंटर 
हिंसेमुळे पीडित महिलांना साहाय्य आणि मदतीसाठी भारत सरकारने 1 एप्रिल 2015 पासून वन स्टॉप सेंटर सुरू केले आहे. ही योजना सखी या नावाने ओळखली जाते.  या योजनेअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात वन स्टॉप सेंटर सुरू करण्यात आले आहे. वन स्टॉप सेंटर महिला व बालविकास विभागाच्या जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, भारत सरकार आणि राज्य सरकारच्या सहकार्याने घालवले जाते.

8) अंगणवाडी लाभार्थी योजना
अंगणवाडी लाभार्थी योजना मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सुरू केली आहे. या योजनेचा लाभ 6 वर्षांपर्यंतच्या बालकांना आणि गरोदर मातांना देण्यात येत आहे. कोरोना काळात कामकाजावर परिणाम झाला होता. त्यामुळे बालके व मातांना पोषण आहारापासून वंचित राहावे लागत होते. हे लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी लाभार्थ्यांच्या खात्यात दर महिन्याला 1500 रुपये टाकण्याचा निर्णय घेतला.

9) मुख्यमंत्री सामूहिक कन्या विवाह योजना
या योजनेअंतर्गत मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलींच्या लग्नासाठी राज्य सरकारकडून 50 हजार रुपये दिले जातात. मुख्यमंत्री सामूहिक विवाह अंतर्गत, शेकडो मुला-मुलींचे लग्न एकाच मंडपात होतात. ही मिळालेली रक्कम विवाह साहित्य आणि भेटवस्तू वर खर्च करावी लागते.

10) प्रधानमंत्री समर्थ योजना  (pm samarth scheme)
या योजनेमार्फत महिलांना भरतकाम, विणकाम, टेलरिंग, मेहंदी आणि ब्युटी पार्लर इत्यादींचे प्रशिक्षण दिले जाते. हे प्रशिक्षण मिळाल्यानंतर तुम्ही तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता. या योजनेच्या अधिक माहितीसाठी अंगणवाडी सेविका किंवा महिला व बालविकास विभागाशी संपर्क साधावा.