Har Ghar Tiranga 2025: या सोप्या पद्धतीने “हर घर तिरंगा” मोहिमेत सामील होऊन मिळवा विशेष सर्टिफिकेट……

Har Ghar Tiranga 2025: आपला भारत देश यावर्षी 79 वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्याच्या तयारीत आहे आणि त्याच जोशात पुन्हा एकदा संपूर्ण देशात “हर घर तिरंगा” हा राष्ट्रीय उपक्रम रंगत आहे. या मोहिमेचा मुख्य उद्देश प्रत्येक भारतीय नागरिकाच्या मनात राष्ट्राबद्दल अभिमान, एकता आणि देशभक्तीची भावना अधिक दृढ करणे हा आहे.

ही मोहीम फक्त शाळेत किंवा आपल्या घरावर तिरंगा फडकवण्यापुरती मर्यादित नाही, तर ती एक सामाजिक चळवळ सुद्धा आहे, जी घराघरातून देशप्रेमाचा संदेश पसरवते आणि हे आपण लक्षात घ्यायला हवं. यावर्षी सांस्कृतिक मंत्रालयाच्या स्वयंसेवक कार्यक्रम आणि स्वयंसेवा गटांच्या (SHGs) सक्रिय सहभागामुळे या उपक्रमाचा विस्तार अधिक वाढवण्यात आला आहे. विशेष म्हणजे, देशभरातील हजारो महिला स्वतः हाताने तिरंगा तयार करत आहेत. यामुळे त्यांना आर्थिक सक्षमीकरण मिळत आहे आणि सोबतच स्थानिक उत्पादनांना देखील चालना मिळत आहे.

या मोहिमेत का सहभागी व्हावे?

“हर घर तिरंगा” ही मोहीम फक्त आपला ध्वज फडकवणे या पुरतीच मर्यादित नाही, तर आपल्या राष्ट्राशी (Har Ghar Tiranga campaign details) असलेल्या नात्याला प्रत्यक्षात जगण्याचा एक मार्ग आहे. यातून आपण आपल्या शेजाऱ्यांमध्ये, समाजात आणि भावी पिढ्यांमध्ये देशप्रेमाची जाणीव निर्माण करू शकतो. ही एक संधी आहे की जिथे आपण स्वातंत्र्य संग्रामातील बलिदानांची आठवण ठेवून, त्यांच्या प्रति असलेला आदर हा प्रत्यक्ष कृतीतून दाखवू शकतो.

सहभागी होण्याची पद्धत

तुम्ही अगदी सहज सोप्या पद्धतीने या मोहिमेत तुमचा सहभाग नोंदवू शकता. त्यासाठी तुम्हाला फक्त खाली आम्ही दिलेल्या काही स्टेप्स (How to participate in Har Ghar Tiranga) पूर्ण कराव्या लागणार आहेत:

  • तर सगळ्यात आधी तुमची नोंदणी करा. यासाठी अधिकृत पोर्टलवर (Har Ghar Tiranga official website) जाऊन तुमचे नाव, मोबाईल नंबर आणि देश/राज्याची माहिती भरा.
  • त्यानंतर तिरंगा फडकवा, म्हणजेच आपल्या घरावर, छतावर किंवा परिसरात तिरंगा अभिमानाने फडकवा.
  • पुढे आपल्या राष्ट्रध्वजासोबतचा आपला फोटो किंवा सेल्फी घ्या.
  • शेवटी तुमचा हा फोटो अपलोड पोर्टलवर अपलोड करा. तसेच तुम्ही हा फोटो ड्रॅग-ड्रॉप, ब्राउझ किंवा थेट कॅमेऱ्यातून सुद्धा क्लिक करून अपलोड करू शकता.

या काही स्टेप्स पूर्ण केल्यावर तुम्हाला अधिकृत सर्टिफिकेट मिळेल, जे तुमचा सहभाग दाखवणारे स्मरणचिन्ह असेल.

मोहिमेचा सामाजिक आणि आर्थिक फायदा

ही मोहीम देशभक्तीची भावना जागवण्याबरोबरच समाजात सकारात्मक बदल सुद्धा घडवत असल्याचं दिसून येत आहे. महिला स्वयंसहाय्यता गट तिरंगा तयार करून त्यातून उत्पन्न मिळवत आहेत. यामुळे ग्रामीण व शहरी भागातील महिलांना रोजगाराची संधी निर्माण होत असून, त्याचबरोबर ‘वोकल फॉर लोकल’ या संकल्पनेला देखील चालना मिळत आहे.

या मोहिमेत सामील होऊन तुम्ही काय साध्य कराल?

  • याद्वारे तुम्हाला राष्ट्रप्रेम आणि एकतेचा संदेश पसरवता येईल.
  • तसेच तुम्ही स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देऊन महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला हातभार देखील लावत आहात.
  • सोबतच तुम्हाला स्वातंत्र्यदिन साजरा करण्याचा एक अनोखा, स्मरणीय अनुभव सुद्धा मिळणार आहे.

“हर घर तिरंगा” हा फक्त एक सरकारी उपक्रम नसून, तो आपल्या मनातील देशभक्तीची भावना प्रत्यक्ष कृतीतून दाखवण्याची संधी आहे. या वर्षी आपल्या स्वातंत्र्यदिनी तुम्ही तिरंगा फडकवून, त्याचा फोटो काढून आणि शेअर करून, तुमचं प्रमाणपत्र (Har Ghar Tiranga certificate download) घेऊन आपला स्वातंत्र्यदिन आणखी खास बनवू शकणार आहात.