Har Ghar Tiranga Abhiyan Certificate Download 2024: या सोप्या पद्धतीने करा हर घर तिरंगा अभियानाचे प्रमाणपत्र डाउनलोड…

Har Ghar Tiranga Abhiyan Certificate Download

Har Ghar Tiranga Abhiyan Certificate Download 2024: मित्रांनो, जर तुम्ही देखील तुमच्या घरी ध्वजारोहण करून हर घर तिरंगा या मोहिमेमधे स्वतःचा सहभाग नोंदवला असेल, तर तुम्ही या सहभागाचे प्रमाणपत्रही डाउनलोड करू शकणार आहात. हे प्रमाणपत्र डाउनलोड करण्याची पद्धत तशी खूपच सोपी आहे. तुम्ही हर घर तिरंगा या मोहिमेतून मिळालेले हे प्रमाणपत्र सोशल मीडिया आणि इतर ठिकाणी शेअर देखील करू शकणार आहात. हे प्रमाणपत्र डाउनलोड कसे करायचे ते आता आपण बघुया.

‘हर घर तिरंगा अभियान’ हे अभियान भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याद्वारे सुरू करण्यात आले आहे. यामध्ये सर्वांना घरी तिरंगा लावण्यास सांगण्यात आले. तुम्हीही या मोहिमेचा भाग असाल तर, तुम्ही याबद्दलचे प्रमाणपत्रही डाउनलोड करू शकता. Har Ghar Tiranga Abhiyan Certificate Download 2024

हर घर तिरंगा मोहिमेत सहभागी होणारे लोक त्यांच्या घरी तिरंगा ध्वज फडकावू शकतात, या अभियानात सहभागी झाल्याचे प्रमाणपत्र डाउनलोड किंवा प्रिंट करू शकतात आणि घरी ठेवू शकतात. त्याची प्रक्रिया खूप सोपी आहे. आम्ही तुम्हाला आजच्या या लेखात याबद्दलची संपूर्ण पद्धत सांगत आहोत.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव म्हणून स्वातंत्र्याचा ७५ वा वर्धापन दिन हा साजरा केला जातो. प्रत्येक घरात फडकवण्यात येणारा तिरंगा हा देखील त्याचाच एक भाग आहे. तुमचा तिरंगा फडकवल्यानंतर तुम्ही प्रमाणपत्र पिन करून डाउनलोड करू शकणार आहात. तुम्ही हे प्रमाणपत्र तुमच्या सोशल मीडिया अकाऊंट वर शेअर करू शकता आणि इतर लोकांना देखील याबाबत माहिती देऊ शकता.

अशी करा हर घर तिरंगाची नोंदणी | Har Ghar Tiranga Abhiyan Certificate Download 2024

यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या फोन किंवा लॅपटॉपवर https://harghartiranga.com/ या वेबसाइट ला भेट देऊन ती उघडावी लागेल. किंवा मग तुम्ही वर दिलेल्या या लिंक वर क्लिक करून देखील ही लिंक थेट उघडू शकता. यानंतर तुम्हाला “पिन ए फ्लॅग” पर्यायावर क्लिक करावे लागेल जे केशरी रंगात दिसेल. त्यानंतर तुम्हाला तुमच्या लोकेशन चा ॲक्सेस देण्यास सांगितले जाईल, हा ॲक्सेस तुम्हाला द्यावा लागणार आहे.

यानंतर तुम्हाला तुमचा एक प्रोफाईल फोटो टाकावा लागणार आहे. हा प्रोफाईल फोटो अपलोड केल्यानंतर तुम्हाला तुमचे नाव आणि मोबाईल नंबर टाकण्यास सांगितले जाईल. तुमची इच्छा नसल्यास तुम्ही हा प्रोफाईल फोटो अपलोड न करता सुद्धा तुम्ही पुढील प्रक्रिया करू शकता. त्यानंतर तुम्हाला Next वर क्लिक करावे लागेल. Har Ghar Tiranga Abhiyan Certificate Download

पुढील स्टेप मधे, तुम्हाला तुमच्या तिरंग्याचे स्थान मार्क करावे लागेल. या स्थानाची पडताळणी केल्यानंतर, तुमचे एक प्रमाणपत्र यापुढे तयार केले जाईल. ही प्रक्रिया झाल्यानंतर तुम्हाला हे प्रमाणपत्र डाउनलोड करता येईल किंवा इच्छा असल्यास तुम्ही ते शेअर सुद्धा करू शकता. PNG इमेज फॉरमॅटमध्ये हे प्रमाणपत्र तुमच्या फोनवर डाउनलोड केले जाईल. Har Ghar Tiranga Abhiyan Certificate Download 2024