Har Ghar Tiranga Once Again: हर घर तिरंगा मोहिम 2024 मध्ये सहभागी व्हा! प्रमाणपत्र मिळवा

Har Ghar Tiranga Once Again भारत सरकारने भारतीय नागरिकांसाठी हर घर तिरंगा अभियान जाहीर केले आहे. या अभियानांतर्गत जगभरातील भारतीय त्यांच्या घरोघरी राष्ट्रध्वज फडकवतील.  दिनांक 9 ते 15 ऑगस्ट 2024 पर्यंत ही मोहिम सुरु राहिल. तसेच या मोहिमेमध्ये कसा भाग घ्यायचा, त्याबद्दल भारत सरकारमार्फत प्रमाणपत्र मिळविण्यासाठी नेमके काय केले पाहिजे ते आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

का आहे हर घर तिरंगा 2024 मोहीम; जाणून घ्या

हर घर तिरंगा 2024 मोहीम हा भारत सरकारचा  राष्ट्रव्यापी उपक्रम आहे. या उपक्रमांतर्गत घराघरात तिरंगा फडकवला जाईल आणि त्यासोबत सेल्फी काढून अपलोड करायची आहे.  त्यासाठी नागरिकांना प्रमाणपत्र देखील देण्यात येणार आहे. प्रत्येक घराघरात राष्ट्रध्वज म्हणजेच आपला तिरंगा फडकवून भारतीयांमध्ये देशभक्ती आणि राष्ट्रीय अभिमान वाढवणे आहे हा या उपक्रमाचा मुळ उद्देश असा आहे की,   भारताच्या स्वातंत्र्याला यावर्षी 77 वर्षे पूर्ण होत आहेत, त्यानिमित्त भारतियांनमध्ये तिरंग्याप्रती अभिमान जागृत करण्याच्या हेतूने ही मोहीम सुरू करण्यात आली आहे.

सेल्फी विथ तिरंग

हर घर तिरंगा 2024 या मोहिमेअंतर्गत भारतातील आणि भारताबाहेर राहणाऱ्या भारतीय नागरिकांनी राष्ट्रध्वजाशी असलेले नाते औपचारिकतेतून वैयक्तिक असे बदलणे अपेक्षित आहे. ज्यामुळे नागरिकांना त्यांच्या राष्ट्राच्या प्रतीकाशी खोलवर संपर्क साधता येईल. हर घर तिरंगा 2024 मोहिमेअंतर्गत, भारतातील नागरिकांना 9 ते 15 ऑगस्ट 2024 या कालावधीत ध्वजारोहणासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. यावेळी नागरिकांनी घरात फडकवलेल्या तिरंग्या सोबत सेल्फी काढून फोटो अपलडो करणे अपेक्षित आहे. सोशल मिडियावर हा फोटो अपलोड केल्या त्यापुढे #HarGharTirangaOnceAgain हा हॅशटॅग लिहिणे आवश्यक आहे.  तसेच हरघर तिरंगा मोहिमेच्या अधिकृत वेबसाइटवर हा सेल्फी सबमिट केल्यानंतर ते सहभागाचे प्रमाणपत्र  नागरिकांना डाउनलोड करता येणार आहे. हर घर तिरंगा अभियान भारताच्या विविधतेतील एकतेचे प्रतिनिधित्व म्हणून तिरंग्याचे महत्त्व अधोरेखित करते. #HarGharTirangaOnceAgain

हर घर तिरंगा अभियानाचे ऑफिशिअल गाणे

https://www.youtube.com/watch?v=lEsGzupQmEM या लिंकवर क्लिक करुन तुम्ही हर घर तिरंगा मोहिमेसंबंधीचे युट्यूबवरील ऑफिशिअल गाणे देखील पाहू शकता.

हर घर तिरंगा 2024 महत्वाच्या तारखा

हर घर तिरंगा 2024 अभियान दिनांक 9 ऑगस्ट 2024 रोजी सुरू झाली असून ही मोहिम 15 ऑगस्ट 2024 पर्यंत सुरु राहील.  मोहिमेअंतर्गत  पाच दिवस घर, कार्यालये आणि संस्थांवर अभिमानाने राष्ट्रध्वज प्रदर्शित करून भारताच्या स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करण्यासाठी समर्पित आहेत.  Har Ghar Tiranga Once Again

हर घर तिरंगा 2024 मोहिमेसाठी नोंदणी कशी करावी?

हर घर तिरंगा 2024 मोहिमेत सहभागी होण्यासाठी, व्यक्ती अधिकृत मोहिमेच्या वेबसाइटद्वारे ऑनलाइन नोंदणी करू शकतात. खालील चरणांमध्ये नोंदणी प्रक्रियेचा समावेश आहे:

  • ‘https://harghartiranga.com/’ वर अधिकृत हर घर तिरंगा 2024 वेबसाइटवर जा.
  • नोंदणी सुरू झाल्यावर एक फॉर्म दिसेल, नोंदणी फॉर्म भरा.
  • तुमच्या स्थानावर आभासी ध्वज पिन करण्यासाठी, तुम्हाला तुमचे नाव, मोबाइल नंबर आणि स्थान तपशील प्रदान करणे आवश्यक आहे.
  • पुढे, ‘हर घर तिरंगा’ मोहिमेच्या प्रतिज्ञासाठी मोफत नोंदणी पूर्ण करा.
  • यशस्वी नोंदणी झाल्यावर, तुम्हाला एक पुष्टीकरण ईमेल प्राप्त होईल.

हर घर तिरंगा 2024 प्रमाणपत्र डाउनलोड करण्यासाठी प्रक्रिया Har Ghar Tiranga Once Again

मोहिमेत सहभागी झाल्यानंतर, तुम्ही मोहिमेच्या वेबसाइटवरून तुमच्या सहभागाचे प्रमाणपत्र डाउनलोड करू शकता. हर घर तिरंगा 2024 प्रमाणपत्र मिळविण्याची प्रक्रिया येथे आहे:

  1. मोहिमेदरम्यान harghartiranga.com या वेबपोर्टल ला भेट द्या
  2. होम पेजवर  upload selfie with flag अपलोड सेल्फी विथ फ्लॅग बटणावर क्लिक करा.
  3. राष्ट्रध्वज व्यवस्थित फडकवताना तुमचा सेल्फी अपलोड करा. पुढे तुमचे नाव टाका आणि तुमचा इमेल आयडी भरा.
  4. तुमची संमती दिल्यानंतर चेकबॉक्समधील सबमिट बटणावर क्लिक करा.
  5. तुमच्या नावाचे हर घर तिरंगा प्रमाणपत्र त्याच वेबसाईटवर तयार करण्यात येईल.  
  6. तुमचे प्रमाणपत्र सेव्ह करण्यासाठी डाउनलोड पर्याय निवडा.

हर घर तिरंगा मोहिमेतील हे प्रमाणपत्र तुमच्या योगदानाची आणि तुमच्या देशभक्तीची आठवण करुण देण्याचे काम करेल. #HarGharTirangaOnceAgain

1 thought on “Har Ghar Tiranga Once Again: हर घर तिरंगा मोहिम 2024 मध्ये सहभागी व्हा! प्रमाणपत्र मिळवा”

Comments are closed.