Health Tips: आपल्या आरोग्यासाठी काही कंदमुळे ही खूप फायदेशीर असतात. याशिवाय आहारतज्ञ देखील त्यांच्या सेवनाची शिफारस करतात कारण ते आरोग्यासाठी पूरक आहेत. रताळ हे हिवाळ्यातील सर्वात जास्त खाल्ल्या जाणार कंदमूळ आहे. मधुमेही रुग्णांना हे कंदमूळ खाताना संभ्रम निर्माण होतो कारण त्याला इंग्रजीत स्वीट पोटॅटो सुद्धा म्हणले जाते. मधुमेही रुग्णांनी रताळे खाणे योग्य आहे का?, हा प्रश्न त्यांना नेहमीच सतावतो.
रताळे हे असे कंदमूळ आहे जे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडते कारण रताळ्याची चव गोड लागते. त्याचप्रमाणे रताळ्यापासून मुलांना आवडणारे अनेक पदार्थ बनवले जातात. रताळे चवीला गोड असल्याने मधुमेहींनी रताळे खाऊ नयेत, असे अनेकजण म्हणतात, पण तसे काही नाही. रताळ्याचा समावेश अमेरिकन डायबिटीज असोसिएशन द्वारे प्रसिद्ध करण्यात आलेल्या मधुमेहासाठीच्या टॉप 10 सुपर फूड्सच्या यादीत केला गेला आहे. Sweet Potato for Diabetic Patients
याचाच अर्थ रताळे मधुमेह नियंत्रणात खूप गुणकारी आहे. भारतात रताळ्याची लागवडही मोठ्या प्रमाणावर केली जाते. बटाट्याच्या अर्धा ग्लायसेमिक इंडेक्स स्टार्च आणि फायबरने समृद्ध रताळ्यामध्ये असतो. याव्यतिरिक्त, रताळे वजन कमी करु इच्छिणाऱ्या लोकांसाठी आणि मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहेत कारण त्यात कार्बोहायड्रेट्स असतात.
2004 मध्ये केलेल्या अभ्यासात असे दिसून आले आहे की रताळे टाइप 2 मधुमेह असलेल्या रुग्णांमध्ये रक्तातील साखरेची पातळी कमी करू शकतात, ज्यामुळे ग्लुकोज नियंत्रणात राहते. अनेक अभ्यासांमध्ये असेही आढळून आले आहे की यामुळे मधुमेहाचा धोका बऱ्याच प्रमाणात कमी होतो. त्याच वेळी, रताळे वेगवेगळ्या प्रकारे खाल्ले जातात आणि या कारणाने रताळ्याच्या ग्लायसेमिक इंडेक्सवर सुद्धा परिणाम होत असल्याचं दिसून येतं. अशा परिस्थितीत रताळे उकळणे किंवा ते बारीक करणे योग्य नाही, कारण ते लवकर पचतात (Health Tips) आणि यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. त्यामुळे हलके तेलात तळलेले रताळे मधुमेहाच्या रुग्णांनी साल काढून खावेत.
मधुमेहींनी (Diabetic Patients) रताळ खावे का?
तज्ज्ञ आणि आहारतज्ञांच्या मते रताळ्यामध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असते. त्यात मॅग्नेशियम आणि फायबरही मुबलक प्रमाणात असते. जे शरीरातील इन्सुलिन रेझिस्टन्सच काम करते आणि त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. यामध्ये असलेले बीटा-कॅरोटीन आणि इतर मिनरल, टाइप 2 मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहेत.
मधुमेहाच्या रुग्णांसाठी रताळे खाण्यास मनाई नाही. पण आहारतज्ञ ते योग्य पद्धतीने खाण्याचा सल्ला देतात. हे रताळ कच्च किंवा सलाडमध्ये खाण्याची शिफारस केली जाते. तुम्ही स्मूदीमध्ये सुद्धा याचा वापर करू शकता.
रताळ्याचे फायदे | Benefits of Sweet Potato
दृष्टीदोष दूर करते – रताळ्यामध्ये असलेले बीटा-कॅरोटीन आणि काही अँटीऑक्सिडंट्स त्याची गुणवत्ता सुधारतात. यामुळे डोळ्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्या दूर होतातच पण दृष्टीदोष सुद्धा दूर होतात.
हृदयाचे आरोग्य – रताळ्यामध्ये फायबर आणि अँटीऑक्सिडंट घटक असल्यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते आणि तत्सम आजार होत नाहीत.
पचन सुधारते – रताळे हे फायबरचा उत्तम स्रोत आहे. त्यामुळे पोटाचे आरोग्य सुधारते आणि पचन क्रिया व्यवस्थित राहते. रताळ्याचे सेवन केल्याने बद्धकोष्ठता होत नाही.
त्वचेचे सौंदर्य – रताळ्यामध्ये ए, सी, ई हे व्हिटॅमिन असतात तर इतर काही अँटिऑक्सिडंट सुद्धा असतात. त्यामुळे केस आणि त्वचेला या पोषक तत्वांमुळे थेट फायदा होत असतो. रताळ्याच्या सेवनाने त्वचेचा पोत टिकून राहण्यास मदत होते.