Home Loan Latest Interest Rates: Home Loan EMI कमी होणार! या बँकांकडून व्याजदरात मोठी कपात, पाहा नवे दर

Home Loan Latest Interest Rates: घर खरेदी करणे हा जवळपास प्रत्येक व्यक्तीच्याच आयुष्यातील मोठा टप्पा असतो. मात्र, अनेकदा होम लोनच्या वाढत्या EMI मुळे ग्राहकांचे बजेट कोलमडून जाते. अशा वेळी आलेली बँकानी व्याजदर कमी केल्याची बातमी अनेक कुटुंबांसाठी दिलासा देणारी ठरणार आहे. ऑगस्ट 2025 मध्ये देशातील काही प्रमुख बँकांनी आपल्या MCLR (Marginal Cost of Funds Based Lending Rate) मध्ये कपात केली आहे. आणि त्यामुळे आता तुमच्या होम लोनच्या EMI मध्ये चांगलीच बचत होणार असल्याचं बघायला मिळत आहे.

SBI कडून दिलासा

देशातील सर्वात मोठी सरकारी बँक SBI (SBI Home Loan Latest Interest Rate 2025) ने आपल्या MCLR मध्ये 5 बेसिस पॉईंटपर्यंत कपात केली आहे. यानुसार, बँकेचा MCLR आता 7.9% ते 8.85% दरम्यान राहणार आहे. 15 ऑगस्ट 2025 पासून हे नवीन दर लागू झाले आहेत. SBI चे ग्राहक मोठ्या संख्येने असल्याने या निर्णयाचा फायदा लाखो लोकांना होणार आहे.

HDFC बँकेद्वारे उचलण्यात आलेली पावले

खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक HDFC Bank ने देखील आपल्या ग्राहकांना दिलासा दिला आहे. 7 ऑगस्टपासून हे दर लागू करण्यात आले असून, बँकेचा MCLR आता 8.55% ते 8.75% दरम्यान निश्चित करण्यात आला आहे. HDFC च्या होम लोन ग्राहकांना याचा थेट फायदा मिळणार आहे.

बँक ऑफ बडोदाने केलेले बदल

12 ऑगस्टपासून Bank of Baroda ने देखील आपले व्याजदर कमी केले आहेत. ओव्हरनाईट MCLR 8.10% वरून 7.95% वर आणण्यात आला आहे. तसेच, एका महिन्याचा MCLR 8.30% वरून 7.96% वर आणण्यात आला आहे. तीन व सहा महिन्यांच्या MCLR मध्येही थोडी कपात झाली असून त्यामुळे EMI कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पंजाब नॅशनल बँकेचे नवे दर

Punjab National Bank (PNB Home Loan EMI Cut 2025) ने सर्वप्रथम म्हणजे 1 ऑगस्टलाच आपल्या MCLR मध्ये कपात केली होती. त्यांचा ओव्हरनाईट MCLR 8.15%, एका वर्षाचा MCLR 8.85%, तर तीन वर्षांचा MCLR 9.15% असा निश्चित करण्यात आला आहे. PNB चे ग्राहक देखील आता कमी EMI चा लाभ घेऊ शकतात.

IOB कडून नवे दर जाहीर

15 ऑगस्टपासून Indian Overseas Bank (IOB) ने नवे दर लागू केले आहेत. त्यांचा ओव्हरनाईट MCLR आता 8.05%, तर वन-इयर MCLR 8.9% इतका आहे. यामुळे IOB च्या ग्राहकांनाही मासिक EMI मध्ये थोडा दिलासा मिळणार असल्याचं दिसून येत आहे.

कॅनरा बँक

याउलट Canara Bank ने मात्र या वेळी कोणताही बदल केलेला नाही. त्यामुळे त्यांच्या ग्राहकांना EMI मध्ये काहीही फरक जाणवणार नाही.

MCLR म्हणजे काय आणि त्याचा फायदा कसा होतो?

MCLR म्हणजे (MCLR meaning in Marathi) Marginal Cost of Funds Based Lending Rate. बँका आपल्या फ्लोटिंग रेट लोनचे व्याज ज्यावर ठरवतात, हा तोच दर असतो. यात होम लोन, कार लोन, पर्सनल लोन यांचा समावेश होतो. जेव्हा बँका MCLR मध्ये कपात करतात, तेव्हा दोन गोष्टी बघायला मिळतात, एक म्हणजे ग्राहकांचा मासिक EMI कमी होतो, नाहीतर लोनचा कालावधी (tenure) कमी होतो, आणि म्हणूनच MCLR कमी झाल्याने थेट ग्राहकांना फायदा मिळतो.

कोणत्या ग्राहकांचा EMI कमी होणार?

हा फायदा त्या ग्राहकांना होईल ज्यांचे कर्ज MCLR शी संबंधित आहे. परंतु, ज्या ग्राहकांचे लोन EBLR (External Benchmark Lending Rate) शी निगडीत आहे, त्यांचा EMI फक्त RBI च्या रेपो रेट मध्ये बदल झाल्यासच कमी होतो. त्यामुळे ही कपात सर्वांनाच लागू होत नाही.

सध्या महागाईच्या काळात EMI हा प्रत्येकाच्या बजेटमधील सगळ्यात मोठा खर्च असतो. अशा वेळी बँकांनी केलेली व्याजदरातील कपात (EBLR vs MCLR Home Loan 2025) ही गृहकर्जदारांसाठी दिलासा देणारी ठरणार आहे. SBI, HDFC, PNB, BOB आणि IOB सारख्या मोठ्या बँकांनी दिलेला हा फायदा अनेकांना आर्थिक सुटकेचा श्वास देणारा ठरेल. त्यामुळे जर तुमचे होम लोन MCLR शी संबंधित असेल, तर पुढच्या हप्त्यापासून तुमच्या EMI मध्ये नक्कीच फरक पडणार असल्याचं तुम्हाला दिसून येईल.