How To Check Cibil Score: हल्ली बँकेतून कर्ज मिळवणं तितकंसं सोपं राहिलेलं नाही. बँका कर्ज देण्याआधी अनेक गोष्टींची तपासणी करतात आणि त्यानंतरच तुमचं कर्ज मंजूर केलं जातं. तुम्ही घेतलेल्या जुन्या कर्जाची परतफेड कशी केली आहे, आर्थिक स्थिती कशी आहे, हफ्ते वेळेवर भरले आहेत का, हे सगळं बँकेद्वारे व्यवस्थितरीत्या तपासल जातं आणि त्यानंतरच कर्जाची मंजुरी किंवा नामंजुरी मिळते. आणि हे कर्ज मिळवण्यासाठीची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे CIBIL Score.
आता, सिबिल स्कोर म्हणजे काय? तो किती असायला हवा? बँका किती सिबिल स्कोरवर कर्ज मंजूर करतात? सिबिल स्कोर कसा सुधारायचा? असे अनेक प्रश्न आपल्या मनात येतात. चला तर मग आजच्या या लेखात, याचा सविस्तर आढावा घेऊया.
Cibil Score किती असावा? | What should be the Cibil Score?
कर्ज मंजूर करण्यापूर्वी बँक तुमचा सिबिल स्कोर तपासते. हा स्कोर 300 ते 900 या दरम्यान असतो. पण, बँक सहज कर्ज मंजूर करेल यासाठी सिबिल स्कोर 750 किंवा त्यापेक्षा अधिक असावा लागतो. जर तुमचा स्कोर 750 च्या खाली असेल, तर बँका कर्ज देताना विचार करतात आणि काही वेळा जास्त व्याजदर लावतात.
300 ते 600 दरम्यानचा सिबिल स्कोर हा खराब मानला जातो आणि अशा स्कोरसह बँका कर्ज मंजूर करण्यास टाळाटाळ करतात. काही वेळा अशा व्यक्तींना जरी कर्ज मिळालं तरी त्यावर मोठ्या प्रमाणात व्याज आकारलं जातं. म्हणूनच, जर तुम्हाला बँकेकडून कर्ज घ्यायचं असेल, तर तुमचा सिबिल स्कोर 750 च्या वर ठेवणं गरजेचं आहे.
सिबिल स्कोर सुधारण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स | Important Tips to Improve CIBIL Score
नवीन कर्जासाठी वारंवार अर्ज करू नका
वारंवार कर्जासाठी अर्ज केल्यास तुमच्या क्रेडिट स्कोअरवर नकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे सतत नवीन कर्जासाठी अर्ज करणं टाळा.
क्रेडिट रिपोर्ट नियमित तपासा
तुमच्या क्रेडिट रिपोर्टमध्ये काही चूक झाली असेल, तर तो तपासून दुरुस्त करा. बँक किंवा वित्तीय संस्था चुकीच्या माहितीवर आधारित सिबिल स्कोर कमी करू शकतात.
क्रेडिट कार्ड वापर मर्यादित ठेवा
तुम्ही जर क्रेडिट कार्ड वापरत असाल, तर त्याचा वापर 30% पेक्षा जास्त होणार नाही याची काळजी घ्या. जास्त वापर केल्यास तुमच्या स्कोअरवर परिणाम होतो.
कर्जाचे हफ्ते वेळेवर भरा
तुमच्याकडे आधीच कर्ज असेल, तर त्याचे हफ्ते वेळच्या वेळी भरायला विसरू नका. हफ्ते वेळेवर भरल्याने तुमचा सिबिल स्कोर सुधारतो आणि बँका तुम्हाला भविष्यात सहज कर्ज मंजूर करतात.
क्रेडिट कार्ड बिल वेळेवर भरा
क्रेडिट कार्ड वापरत असाल, तर त्याची बिले वेळेवर भरणं अत्यंत महत्त्वाचं आहे. ही बिले भरण्यात उशीर झाला, तर तुमच्या क्रेडिट स्कोअरवर वाईट परिणाम होतो.
आधी घेतलेलं कर्ज पूर्ण फेडा
तुमच्याकडे एकाहून अधिक कर्ज असतील, तर आधी ज्या कर्जावर जास्त व्याज लागतं ते कर्ज संपवा. यामुळे आर्थिक भार कमी होईल आणि सिबिल स्कोर सुधारेल.
बँकेकडून कर्ज घ्यायचंय? मग आधी सिबिल स्कोर चेक करा!
जर तुम्ही Home Loan, Personal Loan, Car Loan किंवा कोणतंही कर्ज घेण्याचा विचार करत असाल, तर आधी तुमचा सिबिल स्कोर तपासा. कमी स्कोअर असेल, तर वरील टिप्स फॉलो करून तो सुधारण्याचा प्रयत्न करा. सिबिल स्कोर चांगला असेल, तर बँका तुम्हाला कर्ज मंजूर करतात आणि त्यावर व्याजदरही तुलनेने कमी असतो. त्यामुळे, योग्य आर्थिक शिस्त पाळा आणि तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला ठेवा!