How to get fancy number for vehicle: आजकाल रस्त्यावरून एखादी गाडी जाताना जर तिच्या नंबर प्लेटकडे सगळ्यांचं लक्ष वेधलं जात असेल, तर समजा त्या गाडीचा नंबर हा ‘व्हीआयपी’ किंवा ‘फॅन्सी’ आहे. अनेक जण आपल्या वाहनासाठी असा खास, लक्षवेधक आणि वैयक्तिक अर्थ असलेला क्रमांक शोधत असतात. पण त्यासाठी नेमकं काय करायचं, कुठे अर्ज करायचा, किती खर्च येतो, याचं नीट मार्गदर्शन न मिळाल्याने बऱ्याच वेळा त्यांची फसवणूक होते. म्हणूनच, जर तुम्हीही गाडी खरेदी केली असेल किंवा करणार असाल आणि तुम्हाला त्यासाठी खास ‘फॅन्सी नंबर’ हवा असेल, तर हा लेख (how to get fancy number for vehicle in Marathi) तुमच्यासाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहे.
व्हीआयपी नंबर म्हणजे नेमकं काय?
व्हीआयपी किंवा फॅन्सी नंबर म्हणजे असा वाहन क्रमांक जो खास, लक्षवेधक किंवा वैयक्तिक महत्त्व असलेला असतो. हे नंबर पैसे भरून मागून घ्यावे लागतात आणि सहज मिळत नाहीत.
उदाहरणार्थ:
- एकाच अंकाचा किंवा एकसारख्या अंकांचा क्रमांक (0001, 1111, 222, 007)
- धार्मिक किंवा विशेष संख्यात्मक महत्त्व असलेले क्रमांक (0786, 0909)
- खास सिरीज (5050, 1234, 1000)
अशा क्रमांकांसाठी विशेष लिलाव घेतले जातात किंवा थेट विक्री करण्यात येते.
व्हीआयपी नंबर कसा मिळवता येतो?
सध्या व्हीआयपी नंबर मिळवण्याचे (process of getting VIP number) दोन प्रमुख मार्ग आहेत, एक म्हणजे लिलाव प्रक्रियेद्वारे (E-Auction) आणि दुसरा थेट खरेदीद्वारे (Direct Allotment).
1. ऑनलाईन लिलावामार्फत | E-auction
पहिला आणि सगळ्यात जास्त वापरला जाणारा मार्ग म्हणजे ऑनलाईन लिलाव. भारत सरकारच्या परिवहन विभागाद्वारे https://vahan.parivahan.gov.in/fancy/ या अधिकृत पोर्टलवर ही प्रक्रिया अत्यंत पारदर्शक व सुलभ पद्धतीने उपलब्ध करून देण्यात आली आहे. तुम्ही यावर सार्वजनिक वापरकर्ता म्हणून नोंदणी केली की, तुम्हाला उपलब्ध फॅन्सी नंबरच्या यादीमधून तुमचा पसंतीचा नंबर निवडता येतो. एकदा नंबर निवडल्यावर तुम्ही त्या नंबरसाठी बोली लावू शकता. या बोलीमध्ये सर्वाधिक रक्कम लावणाऱ्या व्यक्तीला तो क्रमांक दिला जातो. यानंतर, संबंधित शुल्क भरून तो नंबर तुम्ही तुमच्या गाडीसाठी आरक्षित करू शकता.
2. थेट खरेदीद्वारे | Direct Allotment
दुसरा पर्याय म्हणजे थेट खरेदी. काही प्रकरणांमध्ये, डीलर्स किंवा RTO मध्ये विशिष्ट नंबर उपलब्ध असतात, तुम्ही गाडी खरेदी करताना तुमच्या डीलरकडे अशा नंबरबाबत विचारणा करू शकता. काही खाजगी विक्रेते किंवा एजंट्सदेखील आधी नोंदणी केलेले व्हीआयपी नंबर विक्रीसाठी ठेवतात. मात्र, अशा काही व्यवहारात सावधगिरी बाळगणं अत्यंत महत्त्वाचं आहे. पैसे भरण्याआधी त्या नंबरची वैधता तपासणं आवश्यक आहे. फसवणुकीचे प्रकार टाळण्यासाठी शक्यतोवर अधिकृत पोर्टल किंवा RTO कार्यालयाद्वारेच व्यवहार करा.
आवश्यक कागदपत्र
- वाहन नोंदणी प्रमाणपत्र (RC)
- आधार कार्ड आणि पॅन कार्ड
- पत्ता पुरावा (Electricity Bill, Ration Card)
- पासपोर्ट साईज फोटो
- लिलाव शुल्क भरायचे असल्यास त्याची तयारी
ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया | VIP number online application
- वर दिलेल्या पोर्टलवर लॉगिन करा.
- त्यांनतर याठिकाणी तुम्हाला तुमच्या पसंतीचा क्रमांक निवडायचा आहे.
- पुढे तुमचा अर्ज सादर करा व आवश्यक शुल्क भरा.
- अशा प्रकारे तुम्ही लिलावात सहभागी व्हाल.
- जर तुम्ही लावलेली बोली यशस्वी झाली तर तुम्हाला तुमचा नंबर आरक्षित करता येईल.
फॅन्सी नंबरसाठी किती शुल्क असेल? | VIP car number price
- सुपर एलिट नंबर (जसे कि 0001, 0786, 007): ₹5 लाख ते ₹25 लाख
- सिंगल डिजिट (जसे कि 1, 5, 9): ₹2 लाख ते ₹10 लाख
- सेमी-फॅन्सी (जसे कि 1234, 5050, 1000): ₹50,000 ते ₹2 लाख
- लक्षात घ्या हि किंमत प्रत्येक राज्यातील RTO प्रमाणे बदलू शकते.
लिलावाचा निकाल कसा पाहायचा?
- वर दिलेल्या पोर्टलवर भेट देऊन ‘Auction Result’ या ऑप्शन वर क्लिक करा.
- त्यांनतर आपले राज्य, RTO आणि तारीख निवडा.
- या ठिकाणी तुम्हाला तुमच्या क्रमांकाचा निकाल आणि प्रमाणपत्र बघायला मिळेल.
फॅन्सी नंबर घेताना घ्यायची काळजी | Online vehicle fancy number booking
- फक्त अधिकृत पोर्टल किंवा RTO कडूनच नंबर घ्या.
- खाजगी विक्रेत्यांकडून जर तुम्ही नंबर घेत असाल तर त्याआधी त्याची वैधता अवश्य तपासा.
- बजेट ठरवा आणि त्याप्रमाणेच नंबरसाठी बोली लावा.
- सगळ्यात महत्वाचं म्हणजे गाडीची नोंदणी व्यवस्थित पूर्ण करा.
तर मित्रांनो तुम्हाला सुद्धा गाडीसाठी खास, वैयक्तिक आणि इम्प्रेस करणारा नंबर हवाच असेल, तर आजच्या काळात ऑनलाईन पद्धतीने फॅन्सी नंबर घेणं अगदी सोपं झालं आहे. थोडा खर्च अधिक असला तरी तो नंबर तुमच्या स्टाईलचा आणि ओळखीचा भाग बनणार आहे. यासाठी वर सांगितलेली लिलाव प्रक्रिया पारदर्शक असून, तुमचा पसंतीचा नंबर तुमच्या नावावर करणे हे कायदेशीर पद्धतीने पूर्णपणे शक्य आहे.