How to record WhatsApp call आजकाल सर्रास सर्वांच्यात हातात ऍन्ड्रॉईड मोबाईल फोन असल्याते आपल्यास दिसून येते. या फोनध्ये आणि आधिच्या साध्या फोनमध्ये देखील डिफॉर्ट कॉल रेकॉर्डिंगचा पर्याय सुरु ठेवल्यास आपण ज्या ज्या व्यक्तींना कॉल करतो किंवा ज्या ज्या व्यक्तींचे कॉल घेतो त्या सर्वांचेच कॉल रेकॉर्ड होत असत. परंतू कालांतराने या प्रक्रियेवर बंदी घालण्यात आली आणि ऍन्ड्रॉइड फोनमधून हे फिचर काढण्यात आले. परंतू तुम्हाला माहिती आहे का की आता तुम्ही तुमचा कॉल व्हॉट्सऍपच्या माध्यमातून रेकॉर्ड करु शकणार आहात. अनेकदा सेफ कॉलींग म्हणून व्हॉट्सॲप कॉल केला जातो. पुर्वी हा व्हॉट्सॲप कॉल रेकॉर्ड करणे शक्य नव्हते परंतू आता तसे अजीबात नाही. तुम्ही पुढील प्रक्रिया करुन व्हॉट्सॲप कॉल रेकॉर्ड करु शकता. How to record WhatsApp call
असा करा व्हॉट्सॲप कॉल रेकॉर्ड
तुम्हाला तुमचा व्हॉट्सॲप कॉल रेकॉर्ड करायचा असल्यास तुम्ही पुढील प्रक्रीयेच्या माध्यमातून तुमचा व्हॉट्सॲप कॉल रेकॉर्ड करु शकणार आहात. How to record WhatsApp call
- पहिली पायरी: cube ACR, Salestrail आणि ACR Call Recorder सारखी ॲप्स Google Play Store वरून डाउनलोड करावी.
- दुसरी पायरी: हे ॲप्स इन्स्टॉल केल्यानंतर, तुम्हाला आवश्यक परवानग्या द्याव्या लागतील.
- तिसरी पायरी : नंतर काही ॲप्समध्ये, तुम्हाला कॉल रेकॉर्डिंग व्यक्तिचलितपणे सक्षम करावे लागेल.
- चौथी पायरी: या सेटअपनंतर, ॲप तुमचे WhatsApp कॉल सुरू होताच ते आपोआप रेकॉर्डिंग सुरू करेल.
- पाचवी पायरी: कॉल संपल्यानंतर, तुम्ही ॲपमध्ये रेकॉर्डिंग ऐकू शकता.
हे आहेत थर्ड पार्टी ॲप्स
- Cube acr
हे लोकप्रिय कॉल रेकॉर्डिंग ॲप WhatsApp कॉल तसेच इतर प्लॅटफॉर्मवरील कॉल रेकॉर्ड करू शकते.
- Salestrail
मुख्यतः हे व्यावसायिकांसाठी डिझाइन करण्यात आलेले प्रीमियम कॉल रेकॉर्डिंग ॲप आहे.
- ACR Call Recorder
हे मोठ्या प्रमाणावर वापरले जाणारे ॲप असून या ॲपचा इंटरफेस वापरकर्त्यांना अगदी क्षणार्धात समजू शकतो इतका सोपा आहे. त्यामुळे ते वापरण्यास अगदी सोपे आहे. How to record WhatsApp call
कॉल रेकॉर्डिंग संदर्भात हायकोर्टाचा निर्णय
गोपनियतेचा भंग होत असल्याचे सांगत ज्यांच्यासोबत आपण कॉलवर बोलत आहोत त्यांच्या परवानगीशिवाय कॉल रेकॉर्ड करणे हे गुन्हा असल्याचे हायकोर्टात सांगण्यात आले आहे. त्यासंबंधी हायकोर्टाने निर्णय जाहीर देखील केला आहे. कॉल रेकॉर्डिंग करणे हे घटनेच्या कलम 21 चे उल्लंघन आहे. How to record WhatsApp callआयटी कायदा 2000 च्या कलम 72 अंतर्गत कोणतीही व्यक्ती परवानगीशिवाय इलेक्ट्रॉनिक उपकरणावर कोणतेही वैयक्तिक संभाषण रेकॉर्ड करु शकत नाही. तसेच सर्वजनिक करु शकत नाही असे करणे गोपनियतेच्या नियमाचे उल्लंघन आहे. How to record WhatsApp call
ऍन्ड्रॉईड स्मार्टफोनमधील इनबिल्ट कॉल रेकॉर्ड फीचर बंद
हायकोर्टाच्या निर्णयामुळे आणि कलम 21 चे उल्लंघन असल्याचे न्यायालयात निर्णय झाल्याने 11 मे 2022 पासून थर्डपार्टी कॉल रेकॉर्डिंग ऍप्ससाठी गुगल ने फीचर बंद केले आहे. Google च्या नवीन पॉलिसीनुसार, अॅप्सना प्ले कॉल रेकॉर्डिंगसाठी Accessibility API वापरण्याची परवानगी दिली जाणार नसल्याचे सांगण्यात आले, पॉलिसी लागू झाल्यानंतर Truecaller वरील फ्री कॉल रेकॉर्डिंग हे फीचर काढून गुगलने काढून टाकले. परंतू काही व्यवसायिक कारणांसाठी किंवा काही वैयक्तित कारणांसाठी समोरच्या व्यक्तीची परवानगी घेऊन हे कॉल रेकॉर्डिंग करता येणार आहे. How to record WhatsApp call
व्हॉट्सॲप कॉल रेकॉर्ड करताना घ्यावयाची काळजी
तुम्हाला कोणत्याही खाजगी कारणासाठी किंवा व्यवसायिक कारणासाठी कॉल रेकॉर्डिंग करायची असल्यास सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्या व्यक्तीचा कॉल रेकॉर्ड करायचा आहे त्या व्यक्तीची परवानगी घेणे अत्यंत आवश्यक असते. समोरील व्यक्तीची परवानगी न घेताच तुम्ही व्हॉट्सॲप कॉल किंवा नॉर्मल कॉल देखील रेकॉर्ड करणार असाल आणि त्याचा उपयोग पुढे कोणत्याही खाजगी कामासाठी करणार असाल तर त्याबाबत तुमच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो. How to record WhatsApp call