How to send fake live location in WhatsApp: फेक लाईव्ह लोकेशन पाठवायचंय? हा लेख नक्की वाचा

How to send fake live location in WhatsApp

तुम्हाला तुमच्या मित्रांसोबत किंवा एखाद्या नातेवाईकासोबत प्रँक करायचाय आणि तुम्हाला त्यांना तुमचं लाईव्ह लोकेशन फेक पाठवून त्यांच्यासोबत गंमत करायची असल्यास आम्ही तुमच्यासाठी एक भन्नाट माहिती घेऊन आलो आहोत. हा लेख वाचा आणि तुमच्या मस्तीखोर मित्रांसोबत प्रँक करा परंतु कधीही चुकीच्या ठिकाणी हा ट्रिक वापरु नका. कारण तुम्ही खरोखरच एखाद्या अडचणीत असाल आणि दुसऱ्यांना तुमची लाईव्ह लोकेशन चुकीची गेली तर मात्र तुम्ही अडचणीत येऊ शकता. How to send fake live location in WhatsApp

इतरांना तुमचे फेक लोकेशन शेअर करा अशा पद्धतीने

  • सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमधील Play store मध्ये जा आणि location changer Fake GPS हे ऍप डाउनलोड करा.
Oplus_131072
  • डायरेक्ट तुम्ही या ऍपला वापरण्याचा प्रयत्न कराल तर ते काम करणार नाही त्यासाठी तुम्हाला तुमच्या फोनच्या सेटिंगमध्ये जावे लागेल आणि तुम्हाला तुमच्या फोनमधील developer ऑप्शन enable करावा लागणार आहे. डेव्हलपर ऑपशन ऑन करणे फार महत्वाचे आहे. याची माहिती तुम्ही यूट्यूब वर घेऊ शकता. Video link- https://youtu.be/C-pyYk6Mfjs?si=alAExsY5pLp_nT2x
  • त्यांनंतर प्ले स्टोअर मधून डाऊनलोड केलेले location changer Feck GPS हे ऍप ओपन करा.
  • ते ऍप तुमच्याकडे location चे परमिशन मागेल ते तुम्ही देणे आवश्यक आहे.
  • त्यानंतर तुम्ही हे ऍप तुमचे रिअल लोकेशन काढून टाकेल.
  • तेथेच खाली search हा पर्याय दिसेल तेथे जाऊन तुम्हाला जिथे जायचे आहे ते  लोकेशन टाईप करा.  उदा. तुम्ही महाराष्ट्रात आहात आणि तुम्ही या ऍपमध्ये सर्च करुन तुमचे लोकेशन दिल्ली असे दाखवले आणि तुमच्या मित्राला ते लोकेशन व्हॉट्सऍपवर पाठवले तर तुमचे फेक लोकेशन म्हणजे दिल्ली हे लोकेशन तुमच्या मित्राला मिळणार.
  • अशा पद्धतीने तुम्ही तुमचे फेक लोकेशन दाखवून इतरांसोबत प्रँक करु शकता. How to send fake live location in WhatsApp

मित्रांसोबत मज्जा मस्ती करण्यासाठी फेक लोकेशन ऍपचा वापर

हल्ली मित्रांसोबत मज्जा मस्ती करण्यासाठी फेक लोकेशन ऍपचा खूप जास्त वापर केला जातो. बरेचदा सरप्राईज देण्यासाठी देखील या ऍपचा वापर केला जातो म्हणजे. आपण आपल्या एखाद्या मित्राला आपण दिल्लीमध्ये असल्याचे लोकेशन पाठवून आपण मुंबईत असलेल्या मित्राला सरप्राईज देऊ शकतो. आणि आपल्या मित्राला खूश करु शकतो. परंतु या location changer Feck GPS या ऍपचा उपयोग आपण मज्जा मस्ती करण्यासाठीच करावा. How to send fake live location in WhatsApp

मोबाईल लोकेशन आपल्या जवळील व्यक्तीशी शेअर का केले जाते?

स्मार्टफोनमध्ये सध्या अनेक फिचर्स उपलब्ध आहेत त्यामध्ये तुम्ही तुमचे रिअल टाईम लोकेशन इतरांसोबत शेअर करु शकता. म्हणजे नेहमीसाठी आपले मोबाईल लोकेशन आपण आपल्या जवळच्या घरातील व्यक्तीसोबत त्याच्या मोबाईलवर शेअर करुन ठेवावे. Google map मध्ये अशा पद्धतीची सेटिंग केल्यास आपले लोकेशन आपल्या जवळच्या व्यक्तीला मिळत राहते. अनेकदा मोबाईल चोरीस गेल्याच हे फिचर अत्यंत कामी येते. तसेच मुलांकडे मोबाईल दिल्यास त्यांच्या मोबाईलचे लोकेशन आपण आपल्या मोबाईलवर शेअर करुन ठेवावे जेणेकरुन मुले अडचणीत असतील किंवा मुले शाळा किंवा क्लासचे कारण देऊन दुसरीकडे जात असतील तर पालकांना संपूर्ण माहिती मिळत राहिल. How to send fake live location in WhatsApp