IBPS Bharati 2024: आयबीपीएसमार्फत विविध पदांसाठी पदभरती; शैक्षणिक आर्हता समजून घ्या आणि आजच आवेदन भरा

IBPS Bharati 2024 आयबीपीएस Institute of banking personnel selection मार्फत विविध पदांच्या 896 जागेसाठी मेगाभरती जाहीर करण्यात आली आहे.  सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत. ज्या पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे त्यांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात.

कोणत्या पदाच्या किती जागांवर भरती जाणून घ्या!!!

Institute of banking personnel selection मार्फत महत्त्वाची भरती जाहीर करण्यात आली आहे. कोणत्या पदासाठी किती जागांवर भरती जाहिर करण्यात आली आहे ते आपण पुढे पाहू.

  • आयटी अधिकारी स्केल – 1   170
  • ॲग्रीकल्चरल फिल्ड अधिकारी स्केल – 1  346
  • राजभाषा अधिकारी ( स्केल -1 )      25
  • विधी अधिकारी ( स्केल – 1) 125
  • एचआर / पर्सोनेल अधिकारी ( स्केल – 1 ) 25
  • मार्केटिंग अधिकारी ( स्केल – 1 )      205

 वरील विविध सात पदांसाठी एकुण पदांची 896 जागांवर भरती जाहिर करण्यात आली आहे.

आवश्यक शैक्षणिक अर्हता

  • आयटी अधिकारी स्केल – 1 या पदासाठी उमेदवार  बी.ई  किंवा बी.टेक असणे आवश्यक आहे.
  • ॲग्रीकल्चरल फिल्ड अधिकारी स्केल – 1 या पदासाठी उमेदवार  कृषी /फळबाग / पशुपालन / पशुवैद्यकीय विज्ञान / दुग्धवैद्यकीय विज्ञान / दुग्धशाळा विज्ञान / मत्स्य पालन विज्ञान / मत्स्यपालन / डेअरी तंत्रज्ञान  / शेती अभियांत्रिकी पदवी / अन्न विज्ञान / शेती व्यवसाय व्यवस्थापन / कृषी वानिकी / वानिकी / सहकार व बँकिंग / शेती अभियांत्रिकी पदवी असणे आवश्यक आहे.
  • राजभाषा अधिकारी स्केल 1  या पदासाठी उमेदवार  इंग्रजी विषयांसह हिंदी पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • विधी अधिकारी स्केल  1 या पदासाठी  उमेदवार एलएलबी शिक्षित असणे आवश्यक आहे.
  • एचआर, पर्सोनेल अधिकारी स्केल 1  या पदासाठी उमेदवार पदवीधर, मानव संसाधन विकास, कामगार कायदा पदव्युत्तर डिप्लोमा, सामाजिक कार्य संबंधीत शिक्षण घेतलेले असणे आवश्यक आहे.
  • मार्केटिंग अधिकारी स्केल 1 या पदासाठी उमेदवार पदवीधर तसेच MMS, MBA, PGDBM, PGPM, PGDM पदवी उत्तिर्ण असणे आवश्यक आहे.

आवश्यक वयोमर्यादा

वरील सर्व विभागातील जाहीर रिक्त पदांसाठी आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे दिनांक 01.08.2024 रोजी किमान वय 20-30 वर्षे दरम्यान तर SC / ST प्रवर्ग करीता वयांमध्ये 5 वर्षाची सुट तर OBC प्रवर्ग करीता 3 वर्षाची सुट देण्यात आली आहे. IBPS Bharati 2024

अर्ज करण्याची प्रक्रिया जाणून घ्या!!!

जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ibpsonline.ibps.in/crpsp14jul24   या संकेतस्थळावर सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता जनरल,  ओबीसी प्रवर्ग करीता 850/- रुपये परीक्षा शुल्क तर SC / ST / PWD प्रवर्ग करीता 175/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .

अर्ज करण्याची अंतिम तारीख

Institute of banking personnel selection जाहीर करण्यात आलेल्या पदभरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 ऑगस्ट 2024 असून तुम्ही या पदांसाठी अर्ज करण्यास इच्छूक असाल तर लवकरात लवकर ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करा.

शासकिय नोकरी मिळविणे हे अनेकांचे स्वप्न असते. काही विद्यार्थी तर यासाठी 3 ते 5 वर्षे कसून मेहनत करीत असतात. अत्यंत कसोशीने वेळ पाळून हा अभ्यास केला जातो. तुमच्याही नातेवाईकांमध्ये किंवा मित्रमंडळीमध्ये असे शासकीय नोकरीसाठी अभ्यास करणारे विद्यार्थी असतील तर त्यांना हा लेख जरुर पाठवा. 21 ऑगस्ट 2024 ही तारीख अंतिम तारीख आहे, त्यामुळे परीक्षेसाठी अर्ज भरण्यास वेळ अजून बाकी आहे. एकाद्या व्यक्तीचे चांगले होण्यासाठी तुमचा एक शेअर खूप महत्त्वाचा ठरु शकतो. IBPS Bharati 2024