IBPS: PO/MT पदांच्या जवळपास ४४५५ जागांसाठी महाभरती, लगेचच अर्ज करा. IBPS मार्फत PO/MT पदांच्या तब्बल ४४५५ जागेसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. सदर पदांकरीता पात्र उमेदवारांकडुन निश्चित कालावधीत ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. (Institute of banking personnel selection recruitment for probationary officer/Management Trainee post, Number of post vacancy 4455) मेगाभरतीचा तपशिल अधिक सविस्तरपणे जाणून घेऊ
पदाचे नाव व पदांची संख्या
यांमध्ये प्रोबेशनरी ऑफीसर (PO) / मॅनेजमेंट ट्रेनी (MT ) पदांच्या एकुण ४४५५ जागेसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे (Recruitment for probationary officer/ Management Trainee post, Number of Post vacancy-4455)
बँकनिहाय रिक्त जागा तपशील:
- बँक ऑफ इंडिया (BOI): 885 पदे
- कॅनरा बँक: 750 पदे
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया (CBI): 2,000 पदे
- इंडियन ओव्हरसीज बँक: 260 पदे
- पंजाब नॅशनल बँक: 200 पदे
- पंजाब अँड सिंध बँक: 360 पदे
आवश्यक शैक्षणिक पात्रता
Institute of Banking Personnel Selection अंतर्गत जाहीर करण्यात आलेल्या पदभरतीसाठी अर्जदार उमेदवार कला, वाणिज्य किंवा विज्ञान यापैकी कोणत्याही शाखेतील पदवी उतीर्ण असणे आवश्यक आहे असे जाहीरातीत सांगण्यात आले आहे. त्यामुळे जास्तीत जास्त तरुणांनी या संधीचा फायदा घ्यावा.
आवश्यक वयोमर्यादा
Institute of Banking Personnel Selection अंतर्गत जाहिर करण्यात आलेल्या पदभरतीसाठी अर्ज भरण्यासाठी उमेदवाराचे १ ऑगस्ट २०२४ रोजी किमान वय २०-३० वर्षाच्या दरम्यान असणे गरजेचे आहे. तसेच SC व ST प्रवर्गासाठी ५ वर्षाची सुट देण्यात आली आहे. व OBC प्रवर्गासाठी ०३ वर्षाची सुट देण्यात आली.
अर्ज करण्याची प्रक्रिया
जाहिरातीमध्ये नोंद केलेल्या पात्रताधारक व्यक्तींनी IBPS च्या अधिकृत संकेतस्थळावर आपले अर्ज दिनांक २१.०८.२०२४ पर्यत सादर करावेत किंवा https://ibpsonline.ibps.in/crppo14jul24/ या लिंकवर क्लिक करुन अधिक माहिती घ्यावी.
अर्जाचे शुल्क किती आहे?
या मेगाभरती करीता जनरल व ओबीसी प्रवर्गासाठी ८५०/- रुपये परिक्षा शुल्क आकारण्यात येइल तर एसी, एसटी, पीडब्ल्युडी प्रवर्गा करीता १७५/- रुपये परिक्षा शुल्क आकारण्यात आले आहेत. तरी तरुणांनी जास्तीत जास्त या संधीचा उपयोग करावा.
निवड प्रक्रियेमध्ये समाविष्ट पातळ्या
Institute of Banking Personnel Selection अंतर्गत जाहिर करण्यात आलेल्या विविध बँकांमधील भरतीसाठी अर्ज भरुन परिक्षा देऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या पुढील 5 पातळ्यावर निवड प्रक्रिया पूर्ण केली जाईल.
- प्राथमिक लेखी परीक्षा
- मुख्य लेखी परीक्षा
- मुलाखत
- दस्तऐवज पडताळणी
- वैद्यकीय तपासणी
अर्ज करण्याची अंतिम तारीख
Institute of Banking Personnel Selection बँकेअंतर्गत जाहीर करण्यात आलेली पदभरती संपूर्ण भरातभरातील जगांसाठी आहे त्यामुळे निवड झालेल्या उमेदवारास बँकेची शाखा जिथे असेल तेथे नोकरीची संधी मिळेल. किंवा तुम्ही ज्या राज्यातून अर्ज दाखल करणार आहात त्या राज्यातील बँकेच्या शाखेत देखील नोकरीच संधी तुम्हाला मिळू शकेल. त्यामुळे जास्तीत जास्त उमेदवारांनी अर्ज दाखल करावा. कारण या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 ऑगस्ट 2024 ही आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.