ICICI bank home loan 2023: आयसीआयसीआय बँक देणार घर बांधण्यासाठी कर्ज | घरबांधण्यासाठी मिळवा बिनव्याजी कर्ज

ICICI bank home loan 2023

ICICI bank home loan 2023 स्वतःचे घर असावे असे प्रत्येक व्यक्तीला वाटत असते. आणि त्यात महत्त्वाचे म्हणजे शहरी भागात सर्व सुखसोयींनिशी घर घेणे हे एक वेगळेच अप्राप्य असे वाटणारे ध्येय असते. शहरांमधील वाढत्या इमातरींसोबत घरांचे देखील दर वाढत चालले आहे. तसेच ग्रामीण भागत देखील जमीनीच्या किंमती वाढत आहेत. जमीन घेऊन तेथे घर बांधणे हे अत्यंत महागडे काम झाले आहे. म्हणूनच सध्या अनेक बँका गृहकर्ज देण्यासाठी तयार असतात. बँकांसोबतच काही खाजगी संस्था देखील गृहकर्ज देतात परंतु गृहकर्जाच्या नावाखाली मोठा व्यवसाय करण्याचा त्याचा हेतू असतो. सामान्य माणसाच्या खिशाला कात्री लावत त्यांचे घराचे स्वप्न पूर्ण करुन देत या बँका आणि खाजगी कंपन्या स्वतःचे खिसे भरताना दिसतात. परंतु या सगळ्याला अपवाद ठरते ती ICICI बँक. ICICI bank home loan 2023

ICICI बँकेसंबंधीत माहिती

      ICICI बँक म्हणजेच Industrial Credit and Investment Corporation of India. आयसीआयसीआय बँक ही भारतातील  दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी बँक आहे. ग्राहकांना आर्थिक सेवा पुरविणारी ही एक बँक आहे. सन 1955 मध्ये या बँकेची स्थापना झाली. या बँकेचे मुख्यालय गुजरात राज्यातील वडोदरा येथे आहे. भारतात ICICI बँकेच्या 2883 इतक्या शाखा असून, 10021 इतके एटीएम आहेत. या बँकेची संपूर्ण भारताचा अर्थिक व्यवहार पाहता एकूण मालमत्ता रु. 3634.00 अब्ज आणि रु. 40.00 अब्ज  असा कर भरल्यानंतरचा नफा दिसून येतो. ICICI बँकेने आजपर्यंत अंदाजे 87000 लोकांना रोजगार दिला आहे.

ICICI बँकेचे गृहकर्ज मिळविताना पात्रता

  • अर्जदार भारताचा नागरिक असावा
  • अर्जदाराचे वय कमीत कमी 25  आणि जास्तीत जास्त 60  वर्षे असावे.
  • Icici बँकेच्या गृहकर्जासाठी मालकी, भागीदारी, एलएलपी आणि खासगी तसेच सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या आणि बहुराष्ट्रीय कंपन्यादेखील अर्ज करु शकतात.
  • मुळ अर्जदाराचे सहअर्जदार हे जोडीदार किंवा जवळचे कुटुंबिय असू शकतात.

ICICI bank home loan 2023 झटपट आणि सोपी कर्ज प्रक्रिया उपलब्ध

  • अर्जदाराने योग्य कागपत्रे जमा केल्यास आणि  पात्र असल्यास कमीत कमी 72 तासांमध्ये कर्ज मिळवू शकतात.
  • कागदपत्रांची पुर्तता झाल्यानंतर लगेचच गृहकर्जासंबंधी पुढील प्रक्रिया बँकेकडून केली जाते.

ICICI बँक कोणाला गृहकर्ज देते? ICICI Bank Home loan

एखाद्या व्यक्तिकडे जमीन आहे आणि घर बांधण्यासाठी पैसे नाहीत अशा व्यक्तींनी बँकेकडे घरासाठी अर्ज करायचा आहे. बँक अर्ज तपासून आणि व्यक्तीची गरज आणि कर्ज फेडण्याची आर्थिक क्षमता तपासून गृहकर्ज देते. गृहकर्ज देण्यासंबंधी बँकेचा तत्पर कारभार आजपर्यंत अनेक ग्राहकांच्या पसंतीस पडलेला आहे.

ICICI बँकेकडून गृहकर्ज मिळविण्या विषयीची वैशिष्ट्ये

  • ICICI बँकेकडून गृहकर्ज तंत्काळ मजूर केले जाते.
  • कर्ज मंजूरी पत्र हे 6 महिन्यांसाठी वैध मानले जाते
  • कर्जाची जास्तीत जास्त कालमर्यादा ही 30 वर्षांची आहे.

ICICI बँक गृहकर्ज व त्यावरील व्याजदर

ICICI  झटपट गृहकर्ज योजना हे ICICI ग्राहकांसाठी आहे ज्यांचे बँकेत पगार खाते आहे. हे पूर्व-मंजूर गृहकर्ज आहे जे बँकेच्या इंटरनेट पोर्टलद्वारे लागू केले जाऊ शकते. योजनेत फ्लोटिंग व्याज दर 8.75% p.a पासून सुरू 0.25% + कर कमी-प्रक्रिया शुल्कासह उपलब्ध आहे.

  • पगारदार व्यक्तीसाठी 8.80% – 9.10% तसेच प्रक्रिया शुल्क हा कर्जाच्या रकमेच्या 2% पर्यंत अधिक कर लावला जातो.
  • स्वयंरोजगार करणाऱ्या व्यक्तींसाठी  8.95% – 9.25% तसेच प्रक्रिया शुल्क हा कर्जाच्या रकमेच्या 2% पर्यंत अधिक कर लावला जातो.

 ICICI बँकेत गृहकर्जाविषयी अधिक माहितीसाठी संपर्क.

तुम्हाला तुमचे घराचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी गृहकर्ज हवे असेल तर ICICI बँक एक उत्तम पर्याय असू शकते. गृहकर्जाससंबंधी अधिक माहितीसाठी तुम्ही  बँकेच्या अधिकाऱ्यांशी 1800 267 4455 या क्रमांकावर संपर्क करु शकता. तसेच तुम्ही ICICI बँकेला ऑनलाईन अर्ज करू शकता. तुमच्या प्रश्नांचे निवारण करण्यासाठी तेथील अधिकारी नक्कीच तुम्हाला मदत करीतल.