Jaggery Adulteration: रसायनयुक्त गुळ कसा ओळखायचा? या 3 टिप्सच्या मदतीने गुळात भेसळ नाही हे सहज ओळखा

Jaggery Adulteration: हिवाळा ऋतू सुरु झाला की, गुळाची मागणी वाढते. यावेळी गुळाच्या व्यावसायात भरपुर नफा असतो. त्यामुळे पर्यायाने बाजारात भेसळयुक्त गुळ देखील दिसू लागते. हिवाळ्यातील थंडीच्या दिवसांमध्ये गुळ उष्ण असल्याने जास्त खाल्ले जाते. गुळामध्ये असलेल्या नैसर्गीक पोषक तत्वांमुळे ते शरीराला आतून उबदार ठेवण्यास आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करते. परंतु दरवर्षी बाजारात दिसणाऱ्या भेसळयुक्त गुळामुळे अनेकांचे आरोग्य बिघतान दिसून येत आहे. म्हणूनच आज भेसळयुक्त गुळ कसे ओळखायचे याबाबत सविस्तर माहिती आम्ही या लेखाच्या माध्यमातून घेऊन आलो आहोत.

गुळामध्ये भेसळ कशी केली जाते.

भेसळयुक्त गुळामध्ये कॅल्शियम कार्बोनेट आणि सोडियम बायकार्बोनेट ही रसायने टाकली गेल्यामुळे हे गुळ आपल्या शरीराला  हानिकारक असते.गुळामध्ये भेसळ करताना वजन वाढण्यासाठी गुळामध्ये कॅल्शियम कार्बोनेट टाकला जातो, तर सोडियम बायकार्बोनेट योग्य रंग येण्यासाठी वापरला जातो. मग शुद्ध गुळ आणि भेसळयुक्त गुळ कसा ओळखायचा असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर पुढे त्याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.

भेसळयुक्त गुळाची कशी करावी ओळख

बाजारात येणारे भेसळयुक्त गुळ ओळखण्यासाठी पुढील काही टिप्स देण्यात आले आहेत त्यांच्या मदतीने तुम्ही तुमचे आरोग्य चांगले राखू शकता आणि बाजारात भेसळयुक्त गुळाचा व्यवसाय करणाऱ्यांपासून स्वतःला वाचवू शकता.

  • गुळाची चव खारट असू नये

तुम्ही बाजारात जेल्हा गुळ खरेदीसाठी जाल  तेव्हा त्याची चाचणी जरुर  करा. गुळाची चव फक्त गोड असेल तरच ते विकत घ्या. त्याची चव जराही खारट असेल तर समजून घ्या की ते गुळ भेसळयुक्त आहे.

  • गुळ पाण्यास पूर्णतः विरळला पाहिजे

 आपण तो बनावटी गुळ पाण्यात टाकला तर, त्यातील भेसळयुक्त पदार्थ पाण्याच्या तळाशी बसतील आणि शुद्ध गुळ पाण्यात पूर्णपणे विरघळून जाईल. त्यामुळे गुळ घेताना नेहमी पाण्यात टाकून त्याची शुद्धता तपासाजर गूळ पाण्यात पूर्णपणे विरघळला नाही तर असा गूळ भेसळयुक्त आहे.

  • शुद्ध गुळ वर्णाने तपकिरी

गुळाची खरेदी करत असताना, नेहमी रंगाने जास्त तपकिरी असलेला गुळ फक्त विकत घ्या.  भेसळयुक्त गुळ म्हणजे पिवळसर किंवा हलका तपकिरी रंग असलेला गुळ निवडू नका. ऊसाच्या रसात असलेले अशुद्ध पदार्थ उकळल्यामुळे होणारी रासायनिक अभिक्रिया यामुळे त्याचा रंग गडद लाल किंवा तपकिरी झालेला असतो.  त्यात काही नैसर्गिक गोष्टी घालून गुळाची अशुद्धता दूर केली जाते.

शुद्ध गूळ खाण्याचे फायदे

  • गुळमध्ये फॉलिक अॅसिड,  सोलेनियम, लोह, कॅल्शियम आणि पोटॅशियम असते. हे सर्व घटक आरोग्यासाठी फायदेशीर आहेत.
  • थंडीच्या दिवसात गुळ हा उष्ण असल्याने शरीराला ऊर्जा देतो.  
  • शरीरातील चयापचय क्रियाही मजबूत होते.
  •  शरीरात लोहाची कमतरता होत नाही.
  • त्यात कॅल्शियम असल्याने ते हाडांसाठी खूप चांगले मानले जाते.
  • याच्या सेवनाने सर्दी खोकलाही बरा होतो.

गुळापासून बनवण्यात येणाऱ्या 60 पेक्षाही जास्त पदार्थांची नावे

गुळापासून विविध प्रकारचे पदार्थ बनवले जाता.  त्यामध्ये गूळ पावडर,  गुळाची ढेप, गुळाचे कॅडबरीसदृश चॉकलेट्स, काकवी, मोदक, गुळाचे ग्रॅन्युल्स, गुळाचे सरबत, गुळाची बिस्किटे, नाचणी-गुळाची बिस्किटे, गूळ चहा प्रि-मिक्स, गूळ कॉफी प्रि-मिक्स, गूळ लिंबूपाणी, चिक्की- शेंगदाणे, चणा डाळ, गूळ सुजी, डार्क चॉकलेट, गूळ कँडी ज्यात इलायचीसह नऊ वेगवेगळे फ्लेवर उपलब्ध आहेत. गुळाचा वापर करून बनाना आईस्क्रीम, मँगो आईस्क्रीम तयार केले आहे. चुरमुरा लाडू, राजगिरा लाडू, बुंदीचे लाडू, नाचणीचे लाडू, गुळाची रेवडी बनवले जातात. हळद आणि गुळ पावडर एकत्र करून त्यापासून कॅप्सूल तयार केली आहे, जी चेहऱ्याच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. मिकी माऊस, ससा, बैल, हत्ती आदी खेळणी आणि भेटवस्तूही गुळापासून बनविता येतात. अशा प्रकारे गुळापासून विविध पदार्थ तयार केले जातात.