Kadba Kutti Machine Yojana 2024: कडबाकुट्टी मशीन अनुदान योजना, तब्बल 20 हजार रुपयांपर्यंत मिळेल अनुदान

Kadba Kutti Machine Yojana 2024: ग्रामिण भागात दुग्धव्यवसायाला चालना देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार पुरस्कृत कडबाकुट्टी मशीन अनुदान योजना 2024 सुरु करण्यात आली आहे. ग्रामिण भागात रोजगार निर्मितीच्या उद्देशाने राबवण्यात येणारी ही एक अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना आहे. पशुपालकांना अत्यंत कामी येणारी कडबा कुट्टी मशीन 75% अनुदान देऊन खरेदी करण्यास शासनातर्फे प्रोत्साहित केले जाते. या मशीनमुळे दुभत्या जनावरांना चारा बारिक करुन देण्यास मदत होते, यामुळे दुधाच्या उत्पादनात वाढ होण्यास देखील मदत होते. ग्रामिण भागातील अनेकांकडे कडबा कुट्टी मशीन खरेदी करण्याची आर्थिक क्षमता नसते. त्यामुळे शासनाने ही योजने सुरु केली आहे. चला तर मग ही मशीन खरेदी करुन शासकीय अनुदान कसे मिळवायचे ते या लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊया.

कडबा कुट्टी मशीन म्हणजे काय?

कडबा म्हणजे चारा आणि कुट्टी म्हणजे कापणे. चारा कापण्याच्या मशीनला कडबा कुट्टी मशीन असे म्हटले जाते. या मशीनच्या मदतीने जनावरांचा चारा बारिक करता येतो. Kadba Kutti Machine Yojana 2024

कडबाकुट्टीचा शेतकऱ्यांना होणारा उपयोग

पशुपालक म्हणजे गाई, म्हशी यांचे पालन करुन दुधाचा व्यवसाय करणाऱ्यांना  ही मशीन अत्यंत उपयोगी असते, कारण गाई, म्हैस यांना दुध येण्यासाठी चारा द्यावा लागतो. हा चारा बारिक करण्याची गरज असते. त्यामुळे चारा पचवण्यास किंवा रवंथ करण्यास दुभत्या जनावरांना मदत होते. पशुपालकांना हा चारा बारिक करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. परंतु कडबा कुट्टी मशीन असेल तर चारा झटपट बारिक होतो आणि जनावरांना तो वेळच्या वेळी पुरवता येतो. Kadba Kutti Machine Yojana 2024

कडबा कुट्टी मशीनसाठी किती अनुदान मिळते?

कडबा कुट्टी मशीन खरेदी करण्यासाठी  शेतकऱ्याला किंवा पशुपालकाला शासनाने अनुदान जाहीर केले आहे. बाजारात कडबा कुट्टी मशीनची किंमत 30 ते 35 हजार इतकी आहे. लाभार्थ्याला ती मशीन सुरुवातीला खरेदी करावी लागते आणि त्यानंतर शासनाकडून अनुदान म्हणून खरेदी रकमेच्या 75% रक्कम म्हणजे 20 हजार रुपये लाभार्थ्यास मिळतात. Kadba Kutti Machine Yojana 2024

अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे

कडबा कुट्टी मशीन अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे अर्जदारांकडे खालील महत्त्वाची कागदपत्र असणे आवश्यक आहे.

  • शेतकऱ्यांचा आधारकार्ड
  • बँक पासबुक झेरॉक्स
  • जातीचा दाखला (आवश्यक असल्यास)
  • जमिनीचा सातबारा उतारा
  • जमिनीचा 8अ उतारा
  • शेतातील पिकांची माहिती
  • GST बिल, कोटेशन, हमीपत्र, करारनामा (लॉटरी पद्धतीने निवड झाल्यानंतर)

कडबा कुट्टी मशीन योजना 2024 अंतर्गत असा करा ऑनलाइन अर्ज.

कडबा कुट्टी मशीन योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करायचा असल्यास आम्ही तुमच्या मदतीसाठी स्टेप बाय स्टेप ऑनलाईन प्रक्रिया कशी करायची हे पुढील प्रमाणे सांगितले आहे. त्या माहितीच्या मदतीने तुम्ही ऑनलाईन अर्ज करु शकता.  Kadba Kutti Machine Yojana 2024

• सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या महाराष्ट्र राज्याच्या कृषी विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/Login/Login या लिंकवर क्लिक करुन देखील तुम्ही वेबसाईटला भेट देऊ शकता.

• यानंतर वेबसाइटचे होम पेज तुमच्या समोर ओपन होईल.

• वेबसाइटच्या मुख्यपृष्ठावर, तुम्हाला नवीन नोंदणीच्या पर्यायावर क्लिक करा.

• नोंदणीच्या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल. तिथे कडबा कुट्टी मशीन योजना हा पर्याय दिसेल त्यावर  क्लिक करा.

• योजनेच्या पर्यायावर क्लिक करताच, अर्जाचा फॉर्म तुमच्यासमोर ओपन होईल

• त्यानंतर अर्जामध्ये विचारण्यात आलेली आवश्यक माहिती ऑनलाइन पद्धतीने भरा.

• सर्व माहिती प्रविष्ट केल्यानंतर, तुम्हाला आवश्यक आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील.

• संपुर्ण ऑनलाईन अर्जात माहिती भरण्याची प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर सबमिट पर्यायावर क्लिक करा.

तुमचा ऑनलाईन अर्ज शासनाकडे तपासणीसाठी जाईल. त्यानंतर शासकीय अधिकारी तुमचा अर्ज तपासतील आणि तुम्हाला संपर्क केला जाईल, तुम्ही कडबा कुट्टी मशीन खरेदी केल्यानंतर तुम्हाला त्याची 75% रक्कम तुमच्या खात्यात जमा होईल. परंतु त्याआधी तुम्हाला तुमच्या पैशांतून मशीन खरेदी करावी लागेल.

अशापद्धतीने शेतकऱी आणि पशुपालकांसंबंधी शासकीय योजनांची माहिती मिळविण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या! Kadba Kutti Machine Yojana 2024